महत्वाच्या बातम्या
-
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन
बिल गेट्स यांचे मित्र आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे ६५ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. मागील अनेक वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते. अॅलन यांनी त्यांचे लहापणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासोबत जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
'अब की बार' सामान्यांच्या खिशावर जास्तच भार; पेट्रोलची नव्वदीकडे
इंधन दरवाढ कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाईच्या भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आज सुद्धा कायम आहे. मुंबईत पेट्रोल ११ पैशांनी वाढले आहे. परंतु, डिझेलच्या दरात २४ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८८.२९ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७९.३५ रुपये मोजावे लागत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
दसरा-दिवाळीत महागाई अजून भडकणार, इंधन दरवाढीचा भडका कायम!
इंधन दरवाढ कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाईच्या भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आज सुद्धा कायम आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात आज वाढ झालेली नाही. परंतु, डिझेलच्या दरात ९ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८८.१८ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७९.११ रुपये मोजावे लागत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार 'पी-तू' मोहीम राबविणार...आता दारु सुद्धा घरपोच मिळणार?
दारूच्या शौकिनांसाठी राज्य सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र सरकार आता एक नवीन धोरण अंमलात आणण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी सुद्धा थेट तुमच्या घरपोच दिली जाईल. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे असं समजत. त्यामुळे दारू घरपोच देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरू शकत.
7 वर्षांपूर्वी -
संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी फ्रान्स दौरा, राहुल गांधींचं प्रश्नचिन्ह?
राफेल लढाऊ विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या न्यूज पोर्टलने केला होता आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
एस-४०० करार : भारताला लवकरच CAATSA निर्बंधांबाबतचा कळेल : डोनाल्ड ट्रम्प
काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट अर्थात CAATSA अंतर्गत अमेरिकेकडून घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारत सरकारला लवकरच माहिती कळेल, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे कालांतराने भारताच्या आर्थिक अडचणी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.
7 वर्षांपूर्वी -
राफेल करारासाठी दसॉल्टला रिलायन्ससोबत व्यवहाराची अट घालण्यात आली होती? मीडियापार्टचा गौप्यस्फोट
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल या लढाऊ विमान खरेदी करारावरून फ्रान्सच्या प्रसार माध्यमांकडूनच नवे खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा फ्रान्समधील मीडियापार्ट या नामांकित डिजिटल न्युजने केला होता. दरम्यान, दसॉल्ट एव्हिएशनने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, आम्ही केवळ स्वायत्तमपणे भागीदार म्हणून रिलायन्सची निवड केल्याचे स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेअर बाजारात कोसळला , सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी घसरला
आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधील घडामोडींमुळे आज भारतीय शेअर बाजारात तीव्र पडसाद उमटले आहेत. सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला आणि काही मिनिटात गुणवणूकदारांचं अरबो रुपयाचं पाणी झालं आहे. त्यात भर म्हणजे भारतीय रुपयाची घसरण सुद्धा सुरुच असून रुपयाने गुरूवारी ऐतिहासिक तळ गाठला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च दणका! राफेल विमान खरेदी प्रक्रियेची पूर्ण माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे मोदी सरकारला आदेश
राफेल विमान करारावरून मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी आधीच राफेल करारातील व्यवहाराची माहिती सामान्यांना उघड करावी अशी मागणी केली होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव मोदी सरकारने ती फेटाळली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टातूनच मोदी सरकारला आदेश गेल्याने केंद्र सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात
दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तशी महागाईसुद्धा सीमा ओलांडणार असं चित्र आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले असून इंधन दरांनी पुन्हा नौवदीच्या दिशेने कूच केली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरच्या सरकारी कर्मचाऱ्यांना अनिल अंबानींच्या 'आरोग्य विमा' कंपनीचा विमा अनिवार्य? राहुल गांधी
राफेल करारावरून आधीच चर्चेत आलेले अनिल अंबानी आणि मोदी सरकार पुन्हा नव्या वादात येण्याची शक्यता. कारण अनिल अंबानींच्या मालकीची रिलायन्स जनरल इन्शुरन्स लिमिटेडकडून आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
महागाई नियंत्रणात असून मध्यमवर्गाची स्थिती सुधारत आहे: नरेंद्र मोदी
भारताची अर्थव्यवस्था मागील काही वर्षांपासून अत्यंत स्थिर असून आर्थिक तूट सुद्धा कमी झाली आहे. दरम्यान, महागाई नियंत्रणात असून देशातील मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले. भारत सध्या महत्वाच्या सामाजिक तसेच आर्थिक बदलातून जात आहे. परंतु, त्या बदलातून निर्माण झालेला नवा भारत हा जागतिक विकासासाठी उत्प्रेरक ठरेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान केले. उत्तराखंड इव्हेस्टर्स समिटमध्ये रविवारी मोदी उपस्थितांना संबोधित करत होते.
7 वर्षांपूर्वी -
रशियाकडून एस-४०० खरेदी केल्यास अमेरिका भारतीय उत्पादनांवर कर लादणार?
भारताने रशियासोबत महत्वाकांक्षी असा एस-४०० वायु संरक्षण प्रणाली खरेदी करार केल्यास अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन भारतातील उत्पादनांवर मोठे कर लादण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजून आर्थिक संकटात जाईल अशी शक्यता आहे. भारतीय लष्कराला हवाई सुरक्षेसाठी रशियाकडून मिळणारी एस-४०० वायु संरक्षण प्रणाली सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. त्यात आधीच अमेरिका आणि रशिया यांच्यात पूर्वीपासून तणावाचे संबंध राहिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भारत मोठ्या आर्थिक संकटात: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं वक्तव्यं खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरत असून देशात महागाई प्रचंड वाढत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी या मुलाखतीदरम्यान दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज भारतीय रुपया आशियातील सर्वात कमजोर चलन; बघा मोदी २०१२ मध्ये काय बोलले होते?
गेल्या अनेक दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सुरू झालेली घसरण अजूनही सुरूच आहे. आज सुद्धा डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी भारतीय रुपयाच्या तुलनेत एका डॉलरची किंमत तब्बल ७३.६० रुपये इतकी झाली आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारात नकारात्मक परिणाम उमटत आहेत. सेन्सेक्समध्ये तब्बल ५८० अंकांनी घसरण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २ दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम खरेदी कराराच्या दृष्टीने पुतिन यांचा हा भारत दौरा महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत रशियाकडून ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणार असून या खरेदी कराराला गुरुवारी भारतीय अधिकारी आणि रशियन अधिकारी स्वाक्षऱ्या करून अंतिम स्वरूप देतील असं म्हटलं जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना देश सोडून जाऊ देऊ नका, स्वीडिश कंपनी इरिक्सनची सर्वोच्च न्यायालयात धाव
स्वीडिश टेलिकॉम कंपनी इरिक्सनने भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनी विरुद्ध कायदेशीर लढाई तीव्र केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही अनिल अंबानी यांच्या कंपनीने अजून ५५० कोटी रुपयांची भरपाई इरिक्सनला दिलेली नाही. त्यामुळेच अखेर अनिल अंबानीसह रिलायन्सच्या इतर २ बड्या अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका इरिक्सनने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरमागे तब्बल ७३ ची पातळी ओलांडली
अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रुपयाचे विनिमय मूल्य रोज नवे नीचांक गाठताना दिसत आहे. सर्व प्रमुख आशियाई देशांच्या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य खूप वेगाने घसरत आहे. आज बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया ३४ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर ७३.३४ असा विक्रमी निच्चांकी तळ रुपयाने गाठला आहे, परिणामी महागाईमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजीव गांधी बोफोर्सच्या चौकशीला सामोरे गेले, तसे मोदी सरकारने राफेलच्या चौकशीला सामोरे जावे
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून मोदी सरकारला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या काळातील बोफोर्स तोफांच्या करारातील व्यवहाराची चौकशी व्हावी अशी विरोधी पक्षांची मागणी होती आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सुद्धा बोफोर्सच्या चौकशीला सामोरे गेले होते याची आठवण त्यांनी मोदींच थेट नाव न घेता करून दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला आयात शुल्कावरून 'टेरिफ किंग' असं संबोधलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. आता भारत सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER