महत्वाच्या बातम्या
-
जेव्हा रुपया प्रति डॉलर ५८ रुपये होता तेव्हा ICU'त होता | आता ७५.९१ आहे तर मजबूत?
अमेरिकन डॉलरच्या (US dollar) तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे भारतीय रुपयाने गेल्या 9 महिन्यांतील निच्चांक पातळी गाठत 75.4 रुपयांवर पोहोचला आहे. मागील तीन आठवड्यांत भारतीय रुपयात जवळपास 4.2 टक्क्यांनी घसरण झाली असून ही अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात 32 पैशांनी घसरण झाली आणि रुपया गेल्या नऊ महिन्यांच्या निच्चांक पातळीवर पोहोचला.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI मध्ये 328 पदांसाठी भरती
भारतीय स्टेट बँक भरती २०२१. एसबीआय भरती २०२१. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि १४९ विविध पदांसाठी अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 03 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र लॉकडाऊन | दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज
देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास लॉकडाऊन लागणार हे निश्चित झालंय. त्यामुळे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आर्थिक गणितांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती, महागाई, बेरोजगारी | ब्राझीलमध्ये 2 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर
ब्राझीलमध्ये कोरोना वाढत आहे. एकीकडे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. स्मशानात जागा शिल्लक नाही. दुसरीकडे, दोन कोटी लोक कोरोनामुळे निर्माण स्थितीमुळे भुकेचा सामना करत आहेत. स्थिती अशी आहे की, एकूण २१.१ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना व्यवस्थित जेवणही मिळत नाहीये. ब्राझीलच्या अन्न सार्वभौमत्व आणि पोषण सुरक्षा संशोधन नेटवर्कच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना देशभर वाढतोय | शेअर बाजार कोसळला | गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बाजारात सोमवारी जोरदार घसरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स 1700 अंकांनी खाली घसरून 48 हजारांच्या खाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले. यापूर्वी 1 फेब्रुवारीला हा निर्देशांक 48 हजारांवर आला होता.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन वेळी न पडलेले प्रश्न अनमोल अंबानींना राज्यातील निर्बंधांनंतर पडू लागले
कोरोना रुग्णांच्या वाढीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याक कडक निर्बंध आणले आहेत. पण, महाराष्ट्रातील याच लॉकडाउनमुळे देशाला 40 हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक परिणाम ट्रेड, हॉटेल आणि ट्रांसपोर्ट सेक्टरवर पडेल. हा अंदाज केअर रेटिंग एजंसीने व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राफेल डील मधील ते दलाल कोण? | आम्हाला सत्य समजू शकेल का? - प्रियांका चतुर्वेदी
राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राफेल लढाऊ विमान खरेदीत बोगस व्यवहार | भारतातील दलालांना करोडोचे गिफ्ट - फ्रेंच मीडिया
राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वतःविरुद्धच्या न्यायालयातील दाव्याला देखील किरीट सोमैय्या यांनी 'वसुली' संबोधलं
सध्या सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA आणि राज्य ATS करत आहेत. त्यासंबंधित विषय न्यायालयात देखील असून त्याबाबतीत पुरावे गोळा करण्याचं देखील काम चौकशी यंत्रणांकडून सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणात ज्या आर्थिक घडामोडी समोर आल्या आहेत त्याचा देखील तपास अजून सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील फरक कळतो? पॅकेज निमित्ताने भलतेच सल्ले
सध्या देशभरात कोरोनामुळे चिंता वाढताना दिसत आहे. मात्र परदेशात भारतापेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं दिसत आहे. परिणामी मागील अनुभव पाहता तिथल्या देशातील सरकारने लॉकडाउन करण्यापूर्वी सामान्यांच्या दृष्टीने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. एका बाजूला अशी स्थिती असताना स्वतःला अभ्यासू नेते म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील नेते देखील सल्ले देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. फडणवीसांनी देखील तसाच सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला आहे. मात्र फडणवीसांना सल्ला आठवला तेव्हा त्यांना देशातील सरकार आणि राज्य सरकार यातील फरक समजला नसल्याची टीका सुरु झाली आहे. कारण जो सल्ला त्यांनी मोदी सरकारला द्यायला हवा होता तो ते राज्य सरकारला देताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
AXIS बँकेचा ग्राहकांना झटका | आता SMS सह अनेक सेवांसाठी भरमसाठ शुल्क वाढ
मुंबई, ०२ एप्रिल: खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने SMS शुल्कामध्ये बदल केलाय. दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर अॅक्सिस बँकेने या शुल्कात बदल केलाय. अन्य प्रकारच्या शुल्काबद्दल बोलताना या बँकेने रोख पैसे काढण्याची फी वाढविलीय. तसेच खात्यातील किमान सरासरी शिल्लक रक्कमही वाढवलीय. अॅक्सिस बँकेने अटेस्टेशन फीस कमी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटक सरकार | ऑपरेशन लोटस’ची चौकशी करण्यास न्यायालयाची परवानगी
देशाच्या राजकारणात बहुचर्चित ठरलेल्या कर्नाटकातील ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बेंगळुरू उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांच्यासमोरील अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
गलती से मिस्टेक! | PPF व्याजदर संदर्भातील आदेश चुकून निघाला - अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. बचत योजनांवर जे व्याज आहे ते जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. नजरचुकीमुळे व्याजदर कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्राकडून देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेडीरेकनर दरात वाढ नाही | मुद्रांक शुल्क सूट संपुष्टात
करोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलेल्या वार्षिक मूल्यदरांना (रेडीरेकनर) अद्याप सहाच महिने झाले असल्याने यंदा रेडीरेकनर दरांत वाढ न करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षासाठी सध्याचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढ | ही आहे नवी अंतिम तारीख
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आज 31 मार्च शेवटची तारीख होती, पण ती तारीख आता वाढवण्यात आलीय. मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 पर्यंत वाढविली. आयकर अधिनियम 1961 च्या कलम 148 अन्वये नोटीस बजावण्याची तारीख, विवाद निवारण पॅनेलने (DRP) जारी केलेल्या निर्देशासाठी निकालाचा आदेश मंजूर करणे आणि समानता आकारणी निवेदनांवर प्रक्रिया करण्यासाठीही 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
4 वर्षांपूर्वी -
डान्सबार बंदी | आर आर आबांनी ते संघर्षातून शक्य केलं | ते फडणवीस सरकारच्या त्रुटींमुळे वाया गेलं
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिना १०० कोटीच्या टार्गेटचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र त्यानंतर पुन्हा डान्स बार सारखे मुद्दे समोर आले आहेत, ज्यामुळे पुन्हा त्याच गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ज्या पक्षाच्या नेत्यावर हे आरोप करण्यात आहेत त्याच पक्षातील एका नेत्याची तळमळ काही वर्षांपूर्वी पाहायला मिळाली होती. जसे आज मराठा आरक्षणावरून भाजप सत्ताधाऱ्यांवर न्यायालयात कमकुवत बाजू मांडत असल्याचा आरोप होतं आहे तसाच आरोप त्यावेळी डान्सबार वरील बंदीवरून भाजपने केला होता. मात्र प्रत्यक्षात भाजप सत्तेत आल्यावर देखील तेच घडलं ज्यावरून ते तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर आरोप करत होते. त्यावेळी सर्वाधिक तळमळ पाहायला मिळाली होती ती दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची असं म्हणता येईल.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंहांच्या पत्नी 5 कंपन्यांमध्ये डायरेक्टर | TRP प्रकरणानंतर LIC हाउसिंगच्या बोर्डवरुन हटवलं
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधार-पॅन कार्ड 'या' तारखे आधी करा लिंक | अन्यथा भरावा लागेल १० हजार रुपयांचा दंड
तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्डची गरज भासते. त्याचबरोबर ही भारतीय असल्याची ही दोन महत्त्वाची ओळखपत्रे ही एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. अजूनही तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर ताबडतोब करा. कारण सरकार या अशा लोकांवर कडक कारवाई करणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने अंतिम तारीख दिली आहे. त्या तारखेआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा
4 वर्षांपूर्वी -
AXIS बँक | यापूर्वीच ईडीकडे तक्रार आणि न्यायालयात याचिका | म्हणून त्या एकेरी भाषेत संतापल्या?
महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत ‘राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं’ असा थेट सवाल विचारला.
4 वर्षांपूर्वी -
ए भाई जगताप! मला डिवचू नको, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय - अमृता फडणवीस
राज्यात सध्या परमवीर सिंग यांच्या लेटरने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालाय,परंतु राजीनामा होणार नाही असा निकाल पवारांनी कालचं दिला.दुसरीकडे महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC