महत्वाच्या बातम्या
-
IT Returns | आयकर परतावा भरण्यास मुदत वाढ | मिळाले एवढे दिवस
आयकर परतावा अर्थात Income Tax Returns भरायची गुरुवारी म्हणजे 31 डिसेंबर ही शेवटची मुदत होती. पण तुमच्यापैकी ज्यांनी आर्थिक वर्ष 2019-2020 साठीचे टॅक्स रिटर्न्स अद्याप फाइल केले नसतील, तर एक दिलासादायक बातमी आहे. आयकर विभागाने IT Returns भरायची मुदत पुन्हा एकदा 10 दिवसांनी वाढवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याची पोलखोल | शेतकऱ्यांशी करार करून २ कोटींचा चुना | कंपनी पसार
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. दरम्यान या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. मोदी सरकारने हे कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहे. यामुळे हे कायदे रद्द करणे सरकारला कठीण होत आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी, लौटा दो हमारे बुरे दिन | महिला महागाईला कंटाळल्या
मागील दोन महिन्यांपासून वारंवार सुरू असलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. दरवाढीच्या निषेधार्थ सांगली येथे महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
राज्यांशी चर्चा न करताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटले | पवारांचं टीकास्त्र
नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा ३४वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी इतके दिवस मुक्काम ठोकला आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. उद्या ३० डिसेंबरला पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंजाबमध्ये Jio मोबाईलच्या १३०० टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित | शेतकरी आक्रमक
मोदी सरकारने ३ कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. परंतु, आता आम्ही Jio SIM पासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहोत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही”, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी यापूर्वीच दिला दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारची माय स्टँप योजना | टपाल तिकिटावर गँगस्टर छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी
भारत सरकार अनेक योजना लागू करतं त्यातून सरकारचा आणि सामान्यांचा काही लाभ करून घेणं हा हेतू असतो. त्याप्रमाणेच २०१७ मध्ये केंद्रातील मोदी सरकारनं माय स्टँप योजना सुरू केली होती. सदर योजनेच्या माध्यमातून एखादी भारतीय व्यक्ती ३०० रुपये शुल्क भरून स्वत:चा किंवा स्वत:च्या कुटुंबीयांचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेऊ शकते. शुल्क जमा केल्यावर भारत टपाल विभाग १२ तिकिटं जारी करतो. ही तिकिटं इतर टपाल तिकिटांप्रमाणेच असतात. त्यांचा वापर करून तुम्ही देशात कोणाला देखील पत्र पाठवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
PMC बँक घोटाळा | वर्षा राऊत यांना नोटीस | दुसरीकडे PNB बँक घोटाळा मुख्य आरोपी मोदींसाठी हमारे मेहुलभाई
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणाचा कळस | विरोधकांच्या पत्नी रडारवर | संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस
भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचा फंडिंगसाठी हातभार | काल शेतकऱ्यांना पाठविलेले पैसे आंदोलनासाठी दान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण आणि कृषी मंत्रालयाच्या सचिवांनी पाठवलेल्या चिठ्ठीनंतर, रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी किसान संयुक्त मोर्चाने बैठकीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण केलं. यावेळी मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिल्लीतील आंदोलनावर भाष्य केलं. “काही राजकीय पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. कोणतेही मुद्दे असतील तर चर्चेला या, मात्र माथी भडकवू नका” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही ज्युनिअर असोसिएट्स भरतीसाठी झालेली मुख्य परीक्षा दिली होती त्यांनी आपला निकाल sbi.co.in या संकेतस्थळावर पाहावा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | LIC हाउसिंग फायनान्समध्ये भरती
एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती २०२०. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने त्यांच्या संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचना जारी केली असून २० सहाय्यक व्यवस्थापक व व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसी एचएफएल भरती २०२० साठी ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि एलआयसी एचएफएल भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी फडणवीस सरकारने खडसेंना क्लीन चिट दिली होती....मग?
भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली होती. मे २०१८ च्या सुरुवातीलाच तसा अहवालच एसीबीने न्यायालयात सादर केला होता.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंनी लोटसचं ऑपरेशन सुरु करताच दिल्ली भाजप सतर्क | धाडली ED नोटीस
भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली असल्याचे वृत्त आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, खडसे यांनी मात्र आपल्याला अद्याप अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
आदोलनामुळेच PM किसान सन्मान निधीच्या एका हप्ता वाटपाचा एवढा प्रचार केला - शेतकरी संघटना
पीएम किसान सन्मान निधीचा एक हप्ता वाटण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा एवढा प्रचार करण्याची आज गरज नव्हती. देशातील सहा टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. सर्व पिकांना हमी भाव मिळेल, यासाठी सरकारने कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी दर्शनपाल सिंह यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हा कायदा कसा योग्य आहे, त्यात शेतकऱ्यांचे कसे हित दडले आहे. ते सविस्तरपणे समजावून सांगितले. केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीय. तिथलं सरकार राजकीय कारणांमुळे हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीय असं मोदी म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरातील दि सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना आरबीआय'कडून रद्द
ठेवीदारांच्या हिताला बाधा येण्याचा धोका आणि बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूरातील दि सुभद्रा लोकल एरिया बँकेचा रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केला आहे. पण दुसरीकडे ठेवीदारांनी हावालदिल होवू नये ठेवी परत करण्या इतपत बँकेची आर्थिक परिस्थिती असल्याचं देखील रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात म्हटलंय.. त्यामुळे बँकेच्या ठेवीदाराना एका अर्थाने दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एका मूर्ख वकिलाकडून ते लेटर ड्राफ्ट केलं आहे | त्या नोटीसला काहीच अर्थ नाही - मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि अॅमेझॉन (Amazon)यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला अॅमेझॉननं कायदेशीर नोटीस बजवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | IDBI बँकेत 134 पदांसाठी भरती | मोठी संधी
आयडीबीआय बँक भरती 2020. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरती काढली आहे. पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. सदर भरतीबाबत अधिक माहिती तुम्ही खाली वाचू शकता आणि अर्ज कसा करावा याबाबत माहिती प्राप्त करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ | शापूरजी पालनजीकडून भाजपला निवडणूक फंडिंग | म्हणून कांजूरमार्ग प्लॉटवर?..
कांजूरमार्ग येथील जमीन जर केंद्र सरकारच्या मालकीची असेल तर मग फडणवीस सरकारने या जागेवर एक लाख घरे बांधण्याचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिक फर्मचा प्रस्ताव कसा स्वीकारला होता, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्ता गेली घोटाळे उघड | नगर बँक अपहारप्रकरणी भाजपच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल
नगर अर्बन बँकेत तीन कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा पैशांचा अपहार ७ ऑक्टोबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७ यादरम्यान झाला आहे. याप्रकरणी आज बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली असून त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY