महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्राला १ लाख कोटीची मदत द्यावी, पवारांची पंतप्रधानांकडे मागणी
कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक अडचणीत आलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि केंद्राकडून हवी असलेली मदत याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सविस्तर पत्र लिहलं आहे. आपल्या पत्रात शरद पवारांनी सुरुवातीला देशाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
येस बँक गैरव्यवहारप्रकरणी धीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री
येस बँक गैरव्यवहारप्रकरणी वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. येस बँकेत कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी गैरव्यवहार केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांनी महाबळेश्वरला केलेल्या प्रकरामुळे देखील त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
एका व्हायरसने सुरू केलेल्या या रोगाचा प्रसार सरकारनेच अधिक केला - राजीव बजाज
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून त्याची गरज नसल्याचे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले. एका व्हायरसने सुरू केलेल्या या रोगाचा प्रसार सरकारनेच अधिक केल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्थेचा सुद्धा विचार करा, दीर्घकाळ लॉकडाऊन परवडणारं नाही - रघुराम राजन
रघुराम राजन यांनी देखील केंद्राला आर्थिक स्थितीवरून सतर्कतेचा इशारा दिला आहे. करोनामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आता सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डाॅ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. दीर्घकाळ लाॅकडाऊन भारताला परवडणारे नाही. सरकारने आता जीवनावश्यक गरजा भागवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
२०२०-२१ आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर ०.८ टक्के राहील - फिच रेटिंगचा अंदाज
करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे. भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै २०२१ पर्यंत स्थगित
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
फेसबुक-जिओ डीलमुळे जागतिक गुंतणूकदार भारताकडे आकर्षित होतील - आनंद महिंद्रा
फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फेसबूक जिओमध्ये तब्बल ४३,५७४ कोटीची गुंतवणूक करणार
फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीनला मोठा आर्थिक धक्का, १००० विदेशी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत
चीनमधून आलेला कोरोना विषाणू संपूर्ण जगात धुमाकूळ माजवत आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनाबरोबरच अर्थव्यवस्थेवरही पडत आहे. चीन हे जगातील सर्वांच्या पसंतीचे मॅन्यूफॅक्चरिंग हब आहे. परंतु, त्यांचा हा किताब लवकरच हिसकावला जाण्याची शक्यता आहे. या विषाणूमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुमारे १००० विदेशी कंपन्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी भारतात कारखाना सुरु करण्याबाबत चर्चा सुरु केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतातील मोठ्या स्टार्टअप्स'मध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक; पण उद्देश डेटा सायन्स?
टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. ‘ईटी’ला काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. अर्थव्यवस्थेची चाकं असलेल्या १६ प्रकारच्या कंपन्यांना निर्मितीची परवानगी द्यावी, अशी शिफारस उद्योग विभागाने केली आहे. एका शिफ्टमध्ये काम सुरू होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यावर भर देण्यात येईल.
5 वर्षांपूर्वी -
अनेक देश चीनमधून मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इतरत्र हलवण्याच्या विचारात; भारताला मोठी संधी
आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजेच आयएमएफ आणि जागतिक बँकेने व्यापार सुरू ठेवण्याचं आवाहन सर्व सदस्य राष्ट्रांना केलं आहे. करोनाशी लढा देताना व्यापार सुरू ठेवणंही आवश्यक असल्याचं या दोन संस्थांनी म्हटलं आहे. वैद्यकीय पुरवठा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवल्याचे विपरित परिणाम समोर येतील, असाही इशारा आयएमएफ आणि जागतिक बँकेने दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राने निर्णय बदलला; ई-कॉमर्स कंपन्यांकडून फक्त जीवनावश्यक वस्तुंचीच विक्री
केंद्र सरकारकडून रविवारी ई-कॉमर्स कंपन्यांना लॉकडाऊनच्या नियमांतून देण्यात आलेली सूट मागे घेण्यात आली. यापूर्वी १५ एप्रिलला केंद्र सरकारकडून ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक गोष्टींशिवाय इतर वस्तूंच्याही घरपोच डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाचे कन्टेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी वस्तू घरपोच करण्याचा ई-कॉमर्स कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला होता. त्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांकडून जोरदार तयारीही करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
विमानसेवा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही - केंद्र सरकार
सरकारी विमान सेवा कंपनी एअर इंडियाने ४ मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारकडून विमान सेवा सुरु करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय गृहमंत्रालयाने या क्षेत्रांना लॉकडाऊनमधून वगळले, सविस्तर यादी
भारतामध्ये कोरोना विषाणूचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: RBI नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम करत आहे - शक्तिकांत दास
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेला असला तरी चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर १.९ टक्के राहिल. भारत कोणत्याही स्थितीत नकारात्मक विकासदराच्या दिशेने जाणार नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी शुक्रवारी सकाळी संवाद साधला. यामध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या नव्या निर्णयांची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
वर्ष २०२०'मध्ये भारताच्या GDP वृद्धीची गती शून्य राहण्याचा अंदाज - Barclays अहवाल
ब्रिटिश ब्रोकरेज कंपनी Barclays यांच्या अहवालाप्रमाणे लॉकडाऊन वाढवल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला १७.५८ लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. कॅलेंडर वर्ष २०२० मध्ये जीडीपीची वाढ देखील खुंटणार आहे. यावर्षी आर्थिक वृद्धीची गती शून्य राहील अशी शंका या कंपनीने व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिडीपी वृद्धीची गती ०.८ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! ६० वर्षात पहिल्यांदाच आशियाचा विकासदर शून्यावर जाईल - IMF
चीनमध्ये उत्पन्न झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी लाॅकडाऊन हाच एकमेव मार्ग आहे. मात्र त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आशियाला करोनाचा मोठा दणका बसणार आहे. ६० वर्षात पहिल्यांदाच आशियाचा विकासदर शून्यावर जाईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) गुरुवारी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्टार्टअपमध्ये कर्मचारी आणि वेतन कपातीची तयारी सुरु - गुंतवणूकदार रंगास्वामी
टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. ‘ईटी’ला काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. अर्थव्यवस्थेची चाकं असलेल्या १६ प्रकारच्या कंपन्यांना निर्मितीची परवानगी द्यावी, अशी शिफारस उद्योग विभागाने केली आहे. एका शिफ्टमध्ये काम सुरू होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यावर भर देण्यात येईल.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! चीनमध्ये ६ आठवड्यांनंतर मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण सापडले
चीनमध्ये सहा आठवड्यांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्यामध्ये विदेशातून चीनमध्ये परतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. या नागरिकांकडून होणाऱ्या संसर्गामुळे आता चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. चीनमध्ये रविवारी कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले. याआधी सहा आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी चीनमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे १४३ नवे रुग्ण आढळले होते. या देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता ८२ हजारांवर पोहोचली असून ३,३४१ जण मरण पावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्थेला तब्बल ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज
देशात केंद्र सरकारकडून २५ मार्चपासून राबवण्यात येत असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन आज, मंगळवारी संपत आहे आणि तो यापुढे देखील ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली असून विश्लेषकांच्या मते, अर्थव्यवस्थेला ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News