महत्वाच्या बातम्या
-
केंद्र सरकारच्या कर महसुलात ७४ टक्क्यांची वाढ | ५ लाख ७० हजार कोटी रुपये झाले जमा
कोरोना संकट असूनही केंद्र सरकारच्या कर संकलनात या वर्षी मोठी वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 22 सप्टेंबरदरम्यान निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 74.4 टक्क्यांनी वाढले आहे. कोरोनापूर्व काळात म्हणजेच 2019-20 मध्ये याच कालावधीत निव्वळ कर संकलनापेक्षा हे जास्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
Indian Stock Market | भारतीय शेअर बाजार 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरचा होणार
भारतीय शेअर बाजार नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतीय बाजारपेठेतील परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास हे यामागील मोठे कारण आहे. या तेजीच्या दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय शेअर बाजाराने फ्रेंच शेअर बाजाराला मागे टाकत जगातील सहावा मोठा शेअर बाजार बनण्याचा बहुमान पटकावला.
3 वर्षांपूर्वी -
Monster Employment Index | रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक
रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत, पुणे बंगलोरनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या वेळी रोजगार निर्देशांक 40 टक्क्यांनी वाढला आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सने (Monster Employment Index) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर मोठ्या संख्येने लोक त्यांच्या गावी परतले.
3 वर्षांपूर्वी -
ITC Maurya Hotel Haircut Case | हेअर कट चुकला, महिलेला 2 कोटी भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश
देशातील ग्राहक न्यायालयाने लक्झरी हॉटेल चेन ITC ला एका महिलेला 2 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे म्हणणे आहे की, आयटीसी मौर्य हॉटेलने आशना रॉय नावाच्या या महिलेचे लांब केस कापले आणि केसांवर चुकीची ट्रीटमेंट दिली, ज्यामुळे महिलेचे मोठे नुकसान झाले. तिची जीवनशैली बदलली आणि तिचे अव्वल मॉडेल बनण्याचे स्वप्न भंगले. ही बाब एप्रिल 2018 ची आहे, ज्यावर न्यायालयाने 21 सप्टेंबर रोजी आपला निर्णय दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sensex Hits 60,000 Mark | शेअर बाजाराने इतिहास रचला | सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा गाठला
शेअर बाजारातील तेजीमुळे आज (24 सप्टेंबर) पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा उच्चांक गाठला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स 375 अंकांनी वाढून 60,260 वर स्थिरावला. तर तिकडे निफ्टी 106 अंकांनी उडी मारून 17,929 वर व्यापार करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Predator Drones Deal | राफेल डील नंतर प्रेडिएटर ड्रोन डील होणार | अमेरिकेकडून 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेण्याची योजना
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात काही महत्त्वाच्या संरक्षण डील होण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन ( 30 Predator drones) खरेदी करणार असल्याने पंतप्रधान मोदी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या CEOसोबत बैठक करणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Freshworks IPO | भारतीय कंपनीची अमेरिकी शेअर बाजारात कमाल | IPO येताच 500 कर्मचारी झाले करोडपती
बिझनेस सॉफ्टवेअर बनवणारी भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सची अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकवर शानदार लिस्टिंग झाली आहे. कंपनीने या लिस्टिंगमधून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7500 कोटी रुपये) गोळा केले आहेत, ज्यामुळे त्यांचे शेकडो कर्मचारी एका झटक्यात कोट्यधीश झाले आहेत. फ्रेशवर्क्सचे संस्थापक गिरीश मातृभुतम यांनी ही कमाल केली आहे. गिरीश मातृभुतम हे रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत आणि त्यांना त्यांचा आदर्श मानतात.
3 वर्षांपूर्वी -
Pegasus Snooping Case | सरकारने हेरगिरी केली की नाही?| सुप्रीम कोर्ट एक समिती स्थापन करणार
पेगासस सॉफ्टवेअरद्वारे पत्रकार, कार्यकर्ते, राजकारणी आणि देशातील अनेक प्रमुख लोकांच्या कथित हेरगिरीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय लवकरच एक समिती स्थापन करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण्णा या प्रकरणी पुढील आठवड्यात यासंदर्भात आदेश जारी करतील. सुनावणीदरम्यान, 13 सप्टेंबर रोजी सीजेआय रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात अंतरिम आदेश राखून ठेवला होता.
3 वर्षांपूर्वी -
भांडं फुटलं? | PM केअर्स हा भारत सरकारचा निधी नाही | पंतप्रधान कार्यालयाची दिल्ली हायकोर्टात माहिती
पंतप्रधान केअर्स फंड ही धर्मादाय विश्वस्त संस्था (ट्र्स्ट) आहे. हा निधी भारत सरकारचा नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. ही संस्था धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या कायद्यांतर्गत येत असल्याचीही माहितीदेखील केंद्र सरकारने न्यायालयात दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सामान्य लोकांना रडवणार? | 1 हजार रुपयांपर्यत जाऊ शकते घरगुती LPG सिलिंडर किंमत | अनुदानही बंद करण्याच्या तयारीत
देशातील वाढत्या महागाईचा सामान्य माणसाला आणखी एक धक्का बसू शकतो. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, येत्या काळात ग्राहकांना प्रति एलपीजी सिलिंडर 1000 रुपये मोजावे लागू शकतात. तर दुसरीकडे, केंद्र सरकार एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. तथापि, अजून अशी कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. मात्र, ग्राहक सिलिंडरसाठी एक हजार रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत, असे सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनातून समोर आले आहे. यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
देश अंबानी, अदानींच्या हातात सोपवला जातोय | भविष्यात गंभीर परिणाम होतील - मेधा पाटकर
अंबानी आणि अदानींच्या हाती हा देश सोपवला जात आहे. याचे परिणाम भविष्यात फार गंभीर होतील. यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. कृषी कायद्याविरोधातील आंदोलन हे समाजातील प्रत्येक घटकासाठीचे आंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात देशातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मेधा पाटकर यांनी केले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. बुधवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फासेपारधी समाजाच्या प्रश्नचिन्ह या शाळेला भेट देण्यासाठी मेधा पाटकर अमरावतीत आल्या होत्या.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market Sensex Rises | सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला | गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फायदा
गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात जागतिक बाजारपेठेतून चांगले संकेत मिळाल्यानं झाली. साप्ताहिक फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) च्या समाप्तीच्या दिवशी सेन्सेक्स 430.85 अंकांच्या वाढीसह 59,358.18 वर उघडला. दुसरीकडे निफ्टी 124.2 अंकांनी वाढून 17,670.85 च्या पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 532 अंकांनी वाढून 59,459 च्या पातळीवर पोहोचला. ट्रेडिंगदरम्यान बाजाराला मोठ्या स्टॉक अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व, एसबीआय, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), एचडीएफसी बँक, इन्फोसिसमध्ये पाठिंबा मिळाला.
3 वर्षांपूर्वी -
प्रथम फडणवीस सरकारनेच लावलेली मुंबै बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी | आता दरेकरांच्या ED-CBI वरून राष्ट्रवादीला धमक्या
मुंबै बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. मुंबै बँकेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सहकार विभागाने बँकेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑडिट आणि बँकेतील प्रशासकीय कामकाजात अनियमितता आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार बँकेचे कामकाज आणि आर्थिक स्थिती याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबै बँकेचे अध्यक्ष असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Bank Under Investigation | मुंबै बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल ३ महिन्यात सादर करा | सहकार विभागाचे आदेश
मुंबै बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. मुंबै बँकेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सहकार विभागाने बँकेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑडिट आणि बँकेतील प्रशासकीय कामकाजात अनियमितता आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार बँकेचे कामकाज आणि आर्थिक स्थिती याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Bank Job Alert | नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेत 94 जागा | ऑनलाईन अर्ज
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक भरती 2021. नॉर्थ स्मॉल फायनान्स बँकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 94 सीटीओ, प्रमुख, झोनल प्रमुख, क्लस्टर बिझिनेस मॅनेजर, शाखा प्रमुख, एरिया क्रेडिट मॅनेजर आणि क्रेडिट एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि उमेदवार NESFB भरतीसाठी 30 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Microsoft Internship 2021 Program | मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 | असं करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन
मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 ची घोषणा करण्यात आली आहे. एआयसीटीई ट्यूलिप या पोर्टल वरून इच्छुकाना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे. या इंटर्नशिपसाठी एकूण 50,000 ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि फ्युचर रेडी यांनी हा टॅलेंट प्रोग्राम जाहीर केला आहे. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी ही एक ऑनलाईन इंटर्नशिप प्रोग्रामची संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम मिळेल, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला दिली. आधी झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई दिली जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. ही रक्कम राज्य सरकार म्हणजेच राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर एनडीएमएने भरपाईसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. देशात आतापर्यंत ३.९८ लाख लोकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून आशियातील या पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारच्या मॉडेलविषयी माहिती दिली आहे. चेन्नईतील तरुणांच्या एका स्टार्टअपने या आशियातील पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल सादर केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Evergrande Crisis | एव्हरग्रँडे दुर्देशेचे जगावर परिणाम | जगभरातील 500 गर्भश्रीमंतांचेही नुकसान
धनकुबेर एलन मस्कपासून जेफ बेझोसपर्यंत जगभरातील 500 श्रीमंतांचे एका चिनी कंपनीमुळे अब्जावधींचे नुकसान केले आहे. एका चिनी कंपनीच्या दुर्दशेमुळे जगभरातील शेअर बाजार प्रचंड दबावाखाली आहेत. या कंपनीचे नाव आहे एव्हरग्रँड ग्रुप असं आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजार सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 मध्येही सुमारे 1 टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टीने जुलैनंतरची सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. यामुळे चिनी कंपनीबद्दल तसेच जगावर व भारतावर याचे काय परिणाम होणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
अस्थिर पाऊस, वाढलेले इंधन दर त्यात पितृपक्ष सुरु | भाज्यांचे भाव झाले दुप्पट-तिप्पट वाढले
अस्थिर होणारा पाऊस. आणि आला तर पुर्णपणे नासधूस करणारा पाऊस. या चक्रामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामध्येच इंधनाची गगनाला भिडलेली वाढ, नुकताच गणेशोत्सव झाला आणि पितृपक्ष सुरु झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव अधिकचेच वाढले आहेत. सध्या कोबी वगळता बटाटा, कांदा यासह सर्वच भाजीपाल्याचे भाव कमालीचे वाढले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH