महत्वाच्या बातम्या
-
Zee Entertainment & Sony Pictures Merger | झी एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन
ZEE Entertainment Enterprises (ZEEL) ने बुधवारी संचालक मंडळाच्या बोर्ड बैठकीत सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) आणि ZEEL मध्ये विलीनीकरणाला एकमताने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार विलीनीकरण केलेल्या कंपनीमध्ये सोनी ११,६०५.९४ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. विलीन झालेल्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनीत गोयंका कायम राहतील. विलीनीकरणानंतर, झी एंटरटेनमेंटकडे ४७.०७ टक्के हिस्सा असेल. तर सोनी पिक्चर्सचा हिस्सा ५२.९३ टक्के असेल.
3 वर्षांपूर्वी -
Amazon India Scam | लीगल फीसच्या नावावर ८,५४६ कोटी खर्च | नियम बदलण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा संशय
विदेशी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने भारतात लीगल फीसच्या नावावर ८,५४६ कोटी रुपये खर्च दाखवल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर कंपनी गोत्यात आली आहे. विधी तज्ज्ञांनुसार, भारतात इतकी फी केवळ अशक्य आहे. कदाचित या रकमेचा वापर लाच देण्यासाठी, मनी लाँड्रिंगमध्ये करचोरीसाठी केला गेला आहे. दरम्यान, छोट्या व्यावसायिकांची संघटना कॅटनेही अमेझॉनने ई-कॉमर्सचे नियम बदलावेत म्हणून अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी या रकमेचा वापर केल्याचे म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील ते बंदर अदानींच्या ताब्यातील | हजारो कोटींचं हेरॉईन जप्त झाल्यावर तुफान टीका | स्पष्टीकरणाची वेळ
गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो हेरॉईन पकडण्यात आली, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.
3 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारवरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह | भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोप | अमेझॉनने टीम भारतात पाठवली
जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अमेझॉन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमेझॉन कंपनीच्या भारतातील काही कायदेशीर प्रतिनिधींवर भारतीय सरकारला लाच दिल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे. अमेझॉन कंपनीने यावर दिलेल्या वक्तव्यामध्ये याची पुष्टी केली नाही आणि या आरोपाचे खंडनही केले नाहीये. पण आपल्या कंपनीमध्ये भ्रष्टाचाराबद्दल कोणतीही सहनशीलता नाहीये, असे ठामपणे सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव
२२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज कालच्या एवढीच आहे. आजची किंमत ४५,३९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४५,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,३०० रुपये प्रति किलोने विकली जाईल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिने किंमतीमध्ये बदल दिसून येतो.
3 वर्षांपूर्वी -
TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस
२०२०मध्ये कोरोनाला सुरूवात झाल्यानंतर अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतनकपात झाली. मात्र आता दीड वर्षानंतर काही क्षेत्र पुन्हा सावरताना दिसत आहेत.विशेषत: आयटी क्षेत्रात मोठ्या संधी सध्या दिसत आहेत. तरुणांची मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाते आहे. शिवाय आयटी कंपन्या (IT sector) कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढदेखील देत आहेत. कोरोना काळात तंत्रज्ञानाला आलेल्या महत्त्वामुळे आणि त्यामध्ये झालेल्या बदलांमुळे आयटी क्षेत्रात (IT jobs)मोठ्या संधी निर्माण होत आहेत. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न
महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात बनावट पद्धतीने खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये अवैधरीत्या वळवले. याच पैशांचा वापर जमीन खरेदीसाठी झाल्याचा आरोप त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार
महाविकास आघाडी सरकारमधील अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना विसर्जनात सहभागी होण्यापासून अडवण्यात आलं तर त्यांचा कोल्हापूर दौराही पोलिसांनी होऊ दिला नाही. त्यांना कराडमध्येच अडवण्यात आलं. यावेळी सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच प्रहार केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Raaj Medisafe India Share Price | या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 3.09 लाख
शेअर बाजारात सध्या तेजी पाहायला मिळत असून, बाजारानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलाय. यादरम्यान 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात लहान-मध्यम आणि मोठे साठे मल्टिबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध होत आहेत. मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत राज मेडिसेफ इंडियाचे नावही जोडले गेलेय. या फार्मा स्टॉकने आपल्या भागधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला. स्मॉल-कॅप स्टॉक गेल्या सहा महिन्यांत 11.95 प्रति इक्विटी शेअर (Raaj Medisafe India Share) च्या पातळीवरून ₹ 36.95 वर पोहोचला. या काळात त्याने आपल्या भागधारकांना 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price | सोने १,६२१ रुपयांनी घसरले | ही आहेत घसरणीची ४ मोठी कारणे
सणासुदीत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी २४ कॅरेट सोने १,१३० रु. स्वस्त होऊन ४५,२०७ रु. प्रति १० ग्रॅमवर आले. गुरुवारीही दिल्लीत सोने ४९१ रु. स्वस्त झाले होते. याच पद्धतीने दोन दिवसांत सोने १,६२१ रु. स्वस्त झाले. किमती घटल्याने दागिन्यांच्या किमती वाढतील, कारण सणात सोने खरेदी शुभ मानली जाते.
3 वर्षांपूर्वी -
EPFO सदस्यांसाठी महत्वाची सूचना | अन्यथा रिकामं होईल खातं | वाचा सविस्तर
नोकरदार नेहमीचे खर्च भागवून थोडी बचत करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. त्याच्या पगारातून काही रक्कम पीएफ खात्यात (EPF Account) जमा होत असते. जी त्याला भविष्यात उपयोगी पडते. या रकमेबाबत त्याला खूप जागरुक रहावं लागतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employee Provident Fund Organization) आपल्या 6 कोटी खातेदारांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. जर तुम्हीही ईपीएफओचे सदस्य असाल तर ही सूचना किंवा अर्लट तुमच्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. ईपीएफओच्या खातेदारांची खासगी माहिती आणि इतर खासगी अॅप्लिकेशन्स यांच्या संदर्भात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून हा अलर्ट दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Link Pan Card with Aadhaar Card | पॅन आधारसोबत लिंक करण्याच्या मुदतीत वाढ | 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली तारीख
केंद्र सरकारने पॅन कार्डशी आधार जोडण्याच्या तारीखेत पुन्हा एकदा वाढ केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ही 30 सप्टेंबर 2021 ही शेवटची तारीख दिली होती. परंतु, यामध्ये वाढ करत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत पॅन आधारसोबत जोडणी केली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. यामाध्यमातून तुमचे पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल. निष्क्रिय पॅन वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांचा समावेश केल्यामुळे मोठा भ्रष्टाचार - जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा
राज्यातील नद्यांना जलयुक्त शिवारामुळे संजीवनी मिळणार होती. राज्यातील नद्यांच्या मृतक साठ्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार होती. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेमध्ये ठेकेदारांचा समावेश केल्याने या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी केला आहे. जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा हे पंढरपुरात खासगी कामासाठी आले होते.
3 वर्षांपूर्वी -
पेट्रोलियम पदार्थ GST कक्षेत आणणे शक्य नाही | GST परिषदेतील एकमत | भाजप शासित राज्यांचाही विरोध
जवळपास १८ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची ही प्रत्यक्ष बैठक लखनऊमध्ये झाली. राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेल्या या अप्रत्यक्ष करविषयक सर्वोच्च निर्णय मंडळाकडून सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल आणि पेट्रोल-डिझेलला ‘जीएसटी’च्या कक्षेत आणून त्याचे दर लक्षणीयरीत्या कमी होतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र सध्याच्या काळात पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणणे शक्य नाही, यावर परिषदेतील सर्वच सदस्यांचे एकमत झाले. केरळ उच्च न्यायालयालाही हा निर्णय कळविला जाईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
3 वर्षांपूर्वी -
TCS Work from Home to End | टीसीएसने केली 'वर्क फ्रॉम होम' बंदची घोषणा | ऑफिसला जावं लागणार
देशातील बलाढ्य टाटा कंन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीनं कर्मचाऱ्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ पूर्णपणे बंद करत असल्याची घोषणा केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्याची तयारी देखील कंपनीनं सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कार्यालयीन काम पु्न्हा एकदा सुरू करणार असल्याची घोषणा टीसीएसनं केली आहे. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील जवळपास सर्वच आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Title Insurance for Property | मालमत्ता खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी विमा कंपन्या आणणार योजना
खोटी कागदपत्रं वापरून एकच घर अनेक जणांना विकल्याच्या किंवा परस्पर दुसऱ्याची मालमत्ता विकून फसवणूक केल्याच्या बातम्या अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा मालमत्तेचा खरा मालक कोण याची माहिती मिळत नाही. अशा वेळी न्यायालय ती मालमत्ता बेकायदेशीर असल्याचं घोषित करतं. व्यवहार करतानाही अडचणी येतात; मात्र आता या सगळ्या अडचणींवर मात करता येणार आहे. कारण लवकरच विमा कंपन्या टायटल इन्शुरन्स (Title Insurance) ही मालमत्ता मालकी हक्काबाबतची पॉलिसी दाखल करणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
IPO Ami Organics Limited | या IPO'मुळे 3 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे डबल
मागील काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. यापैकी महत्त्वाच्या IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. यापैकी एक आहे एमी ऑर्गेनिक्स. केवळ तीन दिवसात या आयपीओने ग्राहकांना डबल रिटर्न दिला आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राइस बँड 610 रुपये निश्चित केला होता. दरम्यान आता शेअरची किंमती इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट झाली आहे. आज या कंपनीचा शेअर 1280 रुपयांवर बंद झाला आहे. अर्थात जर तुम्ही हा आयपीओ इश्यू झाल्यावर त्यात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 100 टक्के पेक्षा जास्त रिटर्न अवघ्या तीन दिवसात मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Scooter Bikes on Ethanol | आता स्कूटर-बाइक फक्त इथेनॉलवर धावणार | लवकरच कायदा आणण्याची गडकरींची माहिती
केंद्र सरकार लवकरच एक कायदा तयार करणार आहे, त्यानुसार बाइक आणि स्कूटरसहित इतर दुचाकी वाहने फक्त इथेनॉलवर चालतील. त्यामुळे महाग इंधनाच्या समस्येपासून सुटका होईल. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की,‘मी लवकरच कायदा बनवणार आहे. त्यानंतर स्कूटर, बाइक, ऑटोरिक्षा आदी पेट्रोलवर चालणार नाहीत. ही वाहने ११० रुपयांच्या पेट्रोलच्या ऐवजी ६५ रुपये लिटरच्या १०० टक्के इथेनॉलवर चालतील. त्यामुळे पैसेही वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल.’
3 वर्षांपूर्वी -
बँक खात्यात चुकून ५ लाख रुपये आले | पैसे मोदींनी दिल्याचं सांगत परत करण्यास नकार | पोलिसांकडून अटक
बिहारमध्ये बँकेच्या चुकीमुळे एका व्यक्तीच्या खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाले. पण हे पैसे परत करण्यास तो तयार नव्हता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि आता तो तुरुंगात आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पैसे त्याच्या खात्यावर पाठवले आहेत, मग मी का परत करावे?
3 वर्षांपूर्वी -
राज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा आल्यास स्पष्ट भूमिका मांडू – उपमुख्यमंत्री
केंद्र सरकारने केंद्राचे टॅक्स लावायचे काम करावे पण राज्याला जो अधिकार दिला गेला आहे त्या अधिकारावर गदा आणता कामा नये. हे अधिकार कमी करता कामा नये. राज्य सरकारचा टॅक्स लावण्याचा अधिकार कमी करण्याबद्दल एखादी गोष्ट जीएसटी कौन्सिलमध्ये आली तर तिथे मात्र स्पष्ट भूमिका मांडू असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH