महत्वाच्या बातम्या
-
प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल
हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात ४२० हे कलम एफआयआर’मध्ये लावण्यात आलं आहे. त्याबरोबरच हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ट्रम्प प्रशासनाने पाकची ३० कोटी डॉलर्सची मदत रोखली
पाकिस्तानच्या नवनिर्वाचित सरकारला तसेच पाकचे पंतप्रधान इमरान खान यांना अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मोठा आर्थिक दणका दिला आहे. अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानला देऊ केलेली ३० कोटी डॉलर्सची म्हणजे तब्बल २१३० कोटीहून अधिक रकमेची मदत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लवासा प्रकल्पाची राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका, दिवाळखोरीच्या वाटेवर?
लवासाला आर्थिक पुरवठा करणाऱ्यांनी ‘लवासा प्रकल्प’ कर्जबाजारी ठरवण्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर एक याचिका केली होती. लवासा विरुद्धची ती याचिका लवादाने दाखल करून घेतल्यामुळे ‘एचसीसी’ने तशी माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल कंत्राट कसं काय मिळालं? फ्रान्समधील प्रसारमाध्यम
राफेल लढाऊ विमानाच्या कराराविषयी आता फ्रान्समधील प्रसार माध्यम सुद्धा प्रश्नचिन्हं उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फ्रान्समधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या फ्रान्स-२४ ने भारत आणि फ्रान्समधील संरक्षण क्षेत्राशी संबंधित संवेदनशील करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडीओ व्हायरल: रुपया १० पैशाने घसरताच सुषमा स्वराज यांना टीव्ही ऑन करताना भीती वाटायची
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होऊन रुपयाने प्रति डॉलर ७१ रुपये असा निचांक दर गाठला. परंतु नंतर तो नऊ पैशांनी सावरून रुपयाचं मूल्य ७० रुपये ९१ पैशांवर स्थिरावलं आहे. या आर्थिक वर्षात रुपयाचं मूल्य तब्बल १० टक्क्यांनी घसरून आशियातील इतर चलनांच्या तुलनेत भारताच्या रुपयाची ही सर्वात वाईट परीस्थिती आहे. परंतु त्यामुळे २०१३ मधील सुषमा स्वराज यांच्या लोकसभेतील भाषणाची आठवण झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'बिम्सटेक' संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडूत दाखल
‘बिम्सटेक’ संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडूत दाखल आले आहेत. सध्या बांगलादेश, भूटान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड अशी एकूण ७ राष्ट्र बिम्सटेकचे सदस्य आहेत. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजे ‘बिम्सटेक’ संमेलन यंदा नेपाळची राजधानी काठमांडू’मध्ये आयोजित करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
RBI अहवाल - नोटबंदीबाबत राज ठाकरे खरे ठरत आहेत
RBI अहवाल – नोटबंदीबाबत राज ठाकरे खरे ठरत आहेत
6 वर्षांपूर्वी -
नोटबंदी हा 'माष्टरस्ट्रोक' नव्हे तर मोदी सरकारचा फुसका बार, ९९.३० टक्के नोटा RBI कडे परत: आरबीआय अहवाल
नोटबंदी हा मोदी सरकारचा ‘माष्टरस्ट्रोक’ म्हणत जी काही हवा निर्मिती करण्यात आली होती, तो वास्तविक मोदी सरकारचा फुसका बार असल्याचे आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २०१७-१८ च्या वार्षिक अहवालात समोर आलं आहे. त्या वार्षिक अहवाल आज सादर झाला असून यातील आकडेवारीवरुन नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मोदी सरकार नोटबंदी या विषयावर अक्षरशः तोंडघशी पडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
वॉरेन बफेट यांची भारतातील पहिली गुंतवणूक ‘पेटीएम’मध्ये
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘बर्थशायर हॅथवे’ या कंपनीचे सर्वेसेवा वॉरेन बफेट हे भारतात पहिल्यांदाच गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे. वॉरेन बफेट हे विजय शेखर शर्मा यांच्या‘पेटीएम’ कंपनीच्या मुख्य कंपनीत म्हणजे ‘वन 97 कॉम्युनिकेशंस’मध्ये ते मोठी गुंतवणूक करणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणुकीपूर्वी सर्व पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा, अन्यथा तुमचा पेट्रोल पुरवठाच बंद करू
आगामी निवडणुकीपूर्वी सर्व पेट्रोल पंपावर नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळ जनक दावा भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेने केला असल्याचे वृत्त ‘द हिंदू’ वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे. त्यामुळे केंद्राकडून सरकार कडून २०१९ पूर्वी पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा यासाठी दबाव वाढत असून प्रमोशनसाठी जाणीवपूर्वक हे प्रकार केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना कर्जाच्या सापळय़ातून वाचवण्यासाठी राफेलचे कंत्राट: राहुल गांधी
जगातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदीच्या करारात म्हणजे राफेल लढाऊ जेट विमान खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कर्जाच्या सापळय़ात अडकलेल्या एका भारतीय उद्योगपतीच्या भल्यासाठी राफेल करारात वाट्टेल ते फेरबदल केले, असा सनसनाटी आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे केला.
6 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींचा रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा
कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार अनिल अंबानी यांना रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून तशी अधिकृत माहिती शेयर मार्केटला दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अखेर पोर्टेबल पेट्रोल पंपाला पेट्रोलियम मंत्रालयाची मंजुरी
अनेक वर्ष प्रलंबित असलेला विषय आज मार्गी लागला आहे. पेट्रोल पंप उभारण्यासाठी पेट्रोलियम कंपन्या, पेट्रोलियम मंत्रालयाची मंजुरी घेऊन सुद्धा त्यासाठी अनेक वर्ष – महिने वाट पाहावी लागते. परंतु आता पेट्रोलियम मंत्रालयाची पोर्टेबल पेट्रोल पंपाच्या तंत्रज्ञानाला मंजुरी दिल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अनिल अंबानी समुहाकडून नोटीस
बहुचर्चित राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणारे काँग्रेस नेते तसेच काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांना अनिल धीरुभाई अंबानी समुहाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अनिल अंबानी समूह सुद्धा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न विचारलं जाऊ लागला आहे.
6 वर्षांपूर्वी -
केरळ'साठी मदत निधीच्या नावाने पेटीएम'चे मालक विजय शेखर शर्मा यांचं नोटबंदीनंतर पुन्हा प्रोमोशन-ब्रॅण्डिंग
संपूर्ण केरळला पावसाने काही दिवस झोडपले असून सर्वत्र पुराचे साम्राज्य असून त्यात लाखो लोकं बेघर झाले आहेत तर शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. केरळला सर्वच थरातून मदत होत असताना त्यात केंद्र सरकार, अनेक राज्य सरकार आणि सामान्यांकडून मदतीचा ओघ सुरु असताना एक कटू अनुभव आल्याचे दृश्य आहे. कारण देशातील एका अब्जाधीशाने अशा संवेदनशील विषयात सुद्धा स्वतःच्या कंपनीचे प्रोमोशन आणि ब्रॅण्डिंग करत हात धुतले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जो पक्ष २०१९ च्या निवडणुकीत बक्कळ पैसा खर्च करेल तोच पक्ष जिंकेल: कपिल सिब्बल
काल काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे नागपूर दौऱ्यावर आले असता ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाहीतील संघर्ष’ या परिसंवादात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या परिसंवादात त्यांनी आगामी निवडणुकीच वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.
6 वर्षांपूर्वी -
२०१७-१८ आर्थिक वर्षात प्राप्ती कराचा विक्रमी भरणा, तब्बल १०.०३ लाख कोटी रुपये
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (सीबीडीटी) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्सच्या भरणा विक्रमी म्हणजे तब्बल १०.०३ लाख कोटी रुपये इतका झाला असून तो आज पर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतातील तंत्रज्ञान आणि डिजिटल इंडियाचे खरे शिल्पकार माजी पंतप्रधान राजीव गांधी
८०च्या दशकात दूरगामी परिमाण करणारी मोठी स्वप्न बघून राजीव गांधी यांनी भारतातील दूरसंचार आणि तंत्रज्ञानाचा खरा अर्थाने पाया रचला होता. केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, लसीकरण, साक्षरता, खाद्यतेल, टेलिकॉम आणि डेअरी विकास याला सुद्धा तंत्रज्ञानाच्या मोहिमे सोबत जोडायला सुरुवात झाली होती.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान राफेल विमान खरेदीबाबत संसदेत एक मिनिट सुद्धा बोलत नाहीत: राहुल गांधी
राहुल गांधी सध्या राजस्थान विधानसभेच्या अनुषंगाने राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल विमान खरेदीवरून जोरदार हल्ला चढवला असून त्यामागील वास्तव काय ते मोदी संसदेत बोलायचं टाळतात असा घणाघात केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटी'चा मोठा वाटा : नरेंद्र मोदी
मुंबई आयआयटी’च्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण जगभरात डंका आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटीचा मोठा वाटा आहे. भारतातून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून जगभरात भारताचे नाव उंचावत आहेत. त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आयआयटी विद्यार्थ्यांबाबत गौरोद्गार काढले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
- BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL
- Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 10 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: TATAPOWER
- Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News
- Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ
- Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर पुन्हा मल्टिबॅगर होणार, स्टॉक चार्टवर ओव्हरसोल्ड, फायद्याची अपडेट - NSE: TATAMOTORS
- IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA