महत्वाच्या बातम्या
-
महत्वाचं | SBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची थेट मोबाईलवरून ऑनलाईन तक्रार कशी कराल? | वाचा सविस्तर
भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या शाखांमध्ये अनेकदा योग्यप्रकारे काम सुरु नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्राहक अनेकदा याबाबत तक्रारीही करतात. परंतु, या सगळ्यावर चर्चा आणि थट्टेपलीकडे फारसे काही घडत नाही. त्यात कर्मचाऱ्यांच्या कामात देखील चालढकलपणा असल्याच्या ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र याची तक्रार कुठे करावी हेच ग्राहकांना समजत नसल्याने अनेक वर्ष परिस्थिती जैसे थे असल्याची तक्रार होती.
4 वर्षांपूर्वी -
सरकारने श्रीराम जन्मभूमी ट्रस्टवर भ्रष्टाचारी लोकं घेतले | कोण चंपत राय?, कधी नावही ऐकले नव्हते - शंकराचार्य
श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्मिती ट्रस्टवर लागलेल्या आरोपांवरून आता शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय बेजबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरीत पदावरून दूर करावे असे शंकराचार्य म्हणाले आहेत. द्विपीठाधीश्वर जगदगुरूंनी नरसिंहपूर जिल्ह्यातील परमहंसी गंगा आश्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिर ट्रस्टवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
नोकरी बदलल्यास 'असे' करा PF'चे पैसे ट्रान्सफर | वाचा ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
EPF’चे पैसे जर तुम्हाला एकाच खात्यात ट्रान्सफर करायचे असतील तर त्याकरिता विशेष खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. काही सोप्या ट्रिक्स वरून हे पैसे तुम्ही एकाच ठिकाणी जमा करू शकता. सरकारी व असरकारी कंपन्यांमध्ये मासिक पगारचा 12 टक्के भाग हा ईपीएफओ अंतर्गत पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. तर, कार्यालयातर्फे देखील तेवढाच भाग पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. यात 8.33 टक्के भाग ईपीएफ खात्यात जातो तर 3.67 टक्के भाग पेंशन खात्यात जमा होत असतो. सरकारी नियमांनुसार ज्या कंपन्यांमध्ये 2o पेक्षा अधिक कर्मचारी असतील तर त्यांचे ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकरण करणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल, महागाई उच्चांकावर | ज्या मुद्यावर मोदी सत्तेत त्याच मुद्यावर आज दुर्लक्ष | जनता हतबल
मोदी सरकारच्या काळात महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे भाव उच्चांकी दरावर पाहोचले आहेत. इंधनाचे भाव प्रचंड वाढत असल्याने परिणामी महागाई देखील प्रचंड वाढत असल्याने सामान्य जनता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती याच विषयावर रान पेटवत मोदी सत्तेत विराजमान झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा
एसबीआय (SBI) रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरणार्या सर्व जनधन खातेदारांना बँकेमार्फत विशेष सुविधा देत आहे. आता त्यांना स्टेट बँकेकडून 2 लाख रुपयांपर्यंतचं मोफत अपघाती विमा संरक्षण मिळू शकेल. या योजनेचा लाभ जनधन खाते असलेल्या लोकांना देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढ | 7 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे | या ठिकाणी 107.53 रुपये लीटर
देशामध्ये महागाई सर्व रेकॉर्ड तोडत आहे. गेल्या 25 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 6 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. गेल्या 42 दिवसात 24 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तेलाच्या महागाईमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तेलाच्या वाढत्या दराबाबत म्हणाले की, “मी हे मान्य करतो की आजच्या किंमतीमुळे नागरिक आणि ग्राहकांना समस्या निर्माण होत आहेत, यात काही शंका नाही.’ सरकारने हे मान्य केले आहे परंतु त्यांच्याकडे महागाईवर इलाज नाही.”
4 वर्षांपूर्वी -
अदानी ग्रुपमधील ४३५०० कोटींची गुंतवणूक रडारवर | 'NSDL'ने ३ परदेशी गुंतवणूकदारांची खाती गोठवली
मालकी हक्क आणि लाभार्थ्यांबाबत माहिती दडवल्याचा ठपका ठेवत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) तीन बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवली आहेत. अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आली आहेत. या तिन्ही कंपन्यांनी अदानी समूहात तब्बल ४३५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. ‘एनएसडीएल’ने केलेल्या या कारवाईने या कंपन्यांना तूर्त अदानी समूहाच्या शेअरची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
हर्षद मेहताचा घोटाळा उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांचं एक ट्विट | आणि शेअर बाजार कोसळला
शेअर बाजारात आणखी एक घोटाळा होत असल्याचं सूचक ट्विट हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी शनिवारी केलं. त्याचा परिणाम आता बाजारात दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजार कोसळला आहे. अनेक शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे. सुचेता दलाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एक समूह असा उल्लेख केला होता. परंतु, त्यांनी ट्विटमध्ये समूहाचं नाव स्पष्ट केलं नव्हतं.
4 वर्षांपूर्वी -
शेती विषय | मोठ्या कमाईसाठी सरकारी रोपवाटिका योजना २०२१ | ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज
रोपवाटिका योजना २०२१ संदर्भातील माहिती. पंचायत समिती कृषी विभाग योजना सतत चालू असतात, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील बातमी दिनांक ९ जून २०२१ च्या दैनिक पुण्यनगरी वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेसाठी लागणारा अर्ज या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे पेजला खाली स्क्रोल करून तो pdf अर्ज डाउनलोड करून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | सोलर पावर प्लांट उभारायचा आहे? | तालुका तपासा आणि असा करा अर्ज
शेतकरी बंधुंनो आजच्या लेखामध्ये सोलर पावर प्लांट संबधी माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेडच्या वतीने सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारण्यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले आहेत. दैनिक लोकमतमध्ये या संदर्भातील जाहिरात देण्यात आलेली आहे ती जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२१ आहे. तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी हे सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारले जाणार आहेत त्याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता त्या संदर्भातील माहिती (PDF File) सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून शकता.
4 वर्षांपूर्वी -
जुन्या नाण्यांचे कलेक्शन आहे? | मग तुम्ही कमाऊ शकता लाखो रुपये - सविस्तर वृत्त
वस्तू जसजश्या जुन्या होत जातात तसतसा आपण त्याचा वापर थांबवत जातो. सर्वसाधारणपणे वस्तू जुन्या झाल्या की त्याचे मूल्य संपते किंवा कमी होत जाते. मात्र काही वस्तू जितक्या जुन्या होत जातात तितके त्यांचे मूल्य वाढत जाते. कारण या वस्तू दुर्मिळ वस्तू किंवा अॅंटिक वस्तूंच्या श्रेणीत येतात. अशा वस्तूंना जगभरातून मोठी मागणी असते. या वस्तूंसाठी दर्दी लोक वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. तुमच्याकडे जर जुन्या नाण्यांचे कलेक्शन असेल तर तुम्हाला लाखो रुपये कमावण्याची संधी आहे. या जुन्या वस्तूंची काही निश्चित किंमत नसते.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राज्यात पेट्रोल-डिझेल किमतीच्या भडक्याने लोकांच्या खिशाला आग | अजून विक्रमी दरांकडे कूच
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
युवासेनेकडून डोंबिवलीत केवळ १ रुपयात १ लीटर पेट्रोल | 'या' निमित्ताने केंद्रालाही चपराक
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
महत्वाचं | हॉलमार्किंग १६ जूनपासून सक्ती | तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचे काय?
द्र सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग १६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था अनिवार्य करण्यासाठी पूर्वी १५ जानेवारीचा मुहूर्त निघाला होता. मात्र आता एक दिवस आणखी वाढवला आहे. याचाच अर्थ आता दागिण्यांच्या व्यापाऱ्यांना १५ जूननंतर १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिणेच विकण्याची परवानगी असेल. बीआयएस एप्रिल २००० पासून सोन्याच्या दागिण्यांसाठी हॉलमार्किंगची योजना राबवत आहे. सध्या जवळपास ४० टक्के दागिण्यांचे हॉलमार्किंग होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ATM सेवाकर अजून वाढला | तो काळ दूर नाही जेव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श अन बघण्यासाठी सुद्धा कर आकारेल - सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
या योजनानेत मिळेल दरमहा १४,००० पर्यत पेन्शन | जाणून घ्या गुंतवणुक विषयी
निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकच नागरिकाची अपेक्षा असते. असा गुंतवणूक प्रकार ज्यामध्ये पैसेही सुरक्षित राहतील आणि चांगला परतावादेखील मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे. या पॉलिसीत तुम्हाला एक निश्चित पेन्शन मिळते. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागेल. या पॉलिसीत तुम्हाला एकूण १० पर्याय उपलब्ध आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार - राज्य सरकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्यात येणार आहे. सिरसाळा येथे MIDC उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर ही एमआयडीसी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी
देशात सत्ता आल्यापासून भाजपचा खजिना तुडुंब भरल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१९-२० मध्ये भारतीय जनता पक्षाला कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत स्वरुपात तब्बल ७८५ कोटी देणगी मिळालं आहे. काँग्रेस पक्षाला १३९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. याचा अर्थ काँग्रेसच्या ५ पट जास्त भारतीय जनता पक्षाला देणगी मिळाली आहे. तर याच कालावधीत एनसीपीला ५९ कोटी, टीएमसी (TMC) ८ कोटी, सीपीएम १९.६ कोटी आणि सीपीआय १.९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ६०० कोटीची आर्थिक मदत | कामगारांना पगारही मिळणार
महाराष्ट्राची लाल परी अर्थात एसटी (ST) गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याचं पहायला मिळत आहे. याच एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH