महत्वाच्या बातम्या
-
Fake TRP | प्रक्षोभक वृत्त आणि खोटी माहिती देणाऱ्यांना जाहिराती नाही - Parle G
विखारी प्रचार करणाऱ्या, आक्रमकपणे खोटी माहिती देणाऱ्या, समाजात तेढ निर्माण होईल असा कंटेट देणाऱ्या चॅनेल्सवर जाहिरात देणार नाही, असा मोठा निर्णय मुंबईची प्रसिद्ध बिस्किट कंपनी पारले जी ने घेतला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर Parle G ची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. Twitter करांनी तर पारले जी ला Genious किताब देऊन टाकला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रॉपर्टी कार्ड | पंतप्रधान मोदींनी केली महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेची सुरूवात केली. या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केल्यानंतर सुमारे १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जातील. हे कार्ड मोबाइल फोन आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकने डाउनलोड केले जाऊ शकेल.
4 वर्षांपूर्वी -
देशात विद्वेष पसरविणाऱ्या तीन वाहिन्यांना जाहिराती देणार नाही | उद्योगपती राजीव बजाज
समाजामध्ये विद्वेष पसरविणाºया व विषारी वातावरण निर्माण करणाºया तीन वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचे बजाज ऑटो कंपनीने ठरविले असून, त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी या तीन वाहिन्यांची नावे उघड केलेली नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
RBI आणि World Bank'चा अंदाज जवळपास सारखा | भारताचा GDP ९.५ टक्क्यांनी घसरणार
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही दास म्हणाले. तसंच आगामी काळातही महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून करोना महासाथीच्या संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेची बैठक २८ सप्टेंबर रोजी पार पडणार होती. परंतु गणसंख्येअभावी ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
2021 पर्यंत 15 कोटी लोकांवर अत्यंत गरिबीची परिस्थिती ओढावणार - जागतिक बँक
कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने एप्रिल महिन्यात WHO ने जगात जागतिक महामारी जाहीर केली. या महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. कामकाजावर त्याचा परिणाम दिसून आला. आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणाऱ्या व्यवसायांवरसुद्धा या महामारीचा परिणाम दिसून आला. मार्च महिन्यापासून जगाची आर्थिक गाडी ढासळली आहे. त्याचमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
व्हेनेझुएला चलनाचे अवमूल्यन | भाजीपाल्यासाठी बाजारात जाताना बॅगेतून नोटा
खनिज तेलाचा सर्वात मोठ्या उत्पादक देशांपैकी एक असलेल्या व्हेनेझुएला देशाचे दिवस फिरले आहेत. मागील काही वर्षांपासून व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. बाजारात येताना नागरिकांना बॅगा भरून नोटा आणाव्या लागत असल्याचे चित्र आहे. चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे आता सरकारकडून मोठ्या मुल्याच्या नोटा छापण्यात येणार आहेत. सरकार आता एक लाखाची नोट छापण्याची तयारी करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजित पवारांना मोठा दिलासा | राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट मिळली आहे. मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात आज क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
आत्मनिर्भर भारतातून मोदी सरकारला नक्की काय म्हणायचं तेच स्पष्ट नाही - रघुराम राजन
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. दरम्यान, आत्मनिर्भर भारतवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला आहे. आर्थिक संशोधन संस्था इक्रियरच्या ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना राजन यांनी यावर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस | मुकेश अंबानींची रिलायन्स लाईफ सायन्सेसही शर्यतीत
रिलायन्स लाईफ सायन्सला मिळालेल्या मान्यतेनंतर याच महिन्यापासून जनावरांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. कपंनीनं लस विकसित करण्यासाठी एक व्यापक योजनादेखील तयार केली आहे. यामध्ये टेस्ट किट तयार करण्यापासून, चाचणी केंद्र चालवणं, लस विकसित करणं आणि त्याचं वितरण यांचा समावेश आहे. रिलायन्स कोविड १९ साठी जी लस तयार करत आहे ती रिकंबिनेंट प्रोटिन बेस्ड लस आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्रॅक्टरच्या गाद्याच सोडा, ८००० कोटीच्या विमानातील ५० पलंगांवर सुद्धा बोला | सणसणीत टोला
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेत. यावेळी, ट्रॅक्टरवर एका कुशन लावलेल्या खुर्चीवर ते बसलेले काही फोटो समोर आले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावर बोट ठेवत सोमवारी राहुल गांधी यांना ‘व्हीआयपी शेतकरी’ म्हणत टीकाही केली होती. यालाच आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. ‘गाद्यांची गोष्ट करणारे ८००० कोटी रुपयांच्या विमानात गप्प का आहेत? त्या विमानात गाद्याच नाहीत तर ५० पलंग आहेत’ असं म्हणत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.
4 वर्षांपूर्वी -
नव्या गुंतवणुकीचा १६ वर्षांत ऐतिहासिक नीचांक | मोदी सरकारही गुंतवणुकीस अनुत्सुक
देशभरामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे भारतामधील गुंतवणुकीला जबरदस्त फटका बसला आहे. मार्च महिन्यामध्ये लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर गुंतवणुकीसंदर्भातील जी परिस्थिती होती ती सहा महिन्यानंतरही जैसे थे स्थितीमध्येच आहे. मुंबईमधील द सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमी (सीएमआयई) या थिंक टॅकने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउनच्याआधी प्रत्येक तिमाहीमध्ये भारतात सामान्यपणे ३ ते ४ अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव यायचे. अधिक चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही गुंतवणूक दुप्पटीने वाढायची. याच गुंतवणुकीला आता लॉकडाउनचा फटका बसला असून त्यामध्ये कमालीची घट झाली आहे. सीएमआयईने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुन्हा पुर्वीप्रमाणे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert! नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार | आरबीआयची माहिती
नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का ? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. आता रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण नोटांनी देखील होऊ शकते. नोटांचा व्यवहार केल्याने कोरोना संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटलंय. नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयने याला दुजोरा दिलाय.
4 वर्षांपूर्वी -
कर्जात बुडाले | बायकोचे दागिने विकले | पण अशी आहे आलिशान जीवनशैली
अनिल अंबानी सध्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जात डुबलेले आहेत आणि त्यांच्यावर लंडनच्या कोर्टात खटलाही चालू आहे. अनिल अंबानी यांनी अनेक चिनी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि आता ते हे कर्ज परत करण्यास ते असमर्थ आहेत. एका अहवालानुसार, अनिल अंबांनींवर निर्यात व आयात बँक आणि डेवलपमेंट बँक ऑफ चाइना यांचे ७१६ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ५,२७६ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ह्याच कर्जासाठी या बँकांनी त्यांच्यावर केस दाखल केली आहे. लंडनच्या कोर्टाने त्यांना कर्ज फेडण्यासाठी जूनपर्यंत मुदत दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
नोटबंदीचा उद्देश अयशस्वी | चलनात २००० च्या सर्वाधिक बनावट नोटा | NCRB डेटा
केंद्र सरकारनं चार वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. चलनात असलेल्या बनावट नोटांपासून मुक्ती हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी केंद्र सरकारनं ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होता. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, गेल्या वर्षी जितक्या बनावट नोटा पकडण्यात आल्या त्यापैकी सर्वाधिक नोटा या २ हजार रूपयांच्या असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) वार्षिक अहलावातून ही माहिती मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bitcoin | बिटकॉइन म्हणजे काय | कशी होते गुंतवणूक | कशी वाढते पैशांची किंमत
जगभरात कोरोना व्हायरस संकटाचा कहर आहे. त्यातून दुनिया अद्यापही सावरली नाही. भारतासह देशभरातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. गुंतवणूकदार चिंतेतत आहेत. अशात बिटकॉइन गुंतवणूक (Bitcoin Investment) पर्याय ठरु शकतो का? याबाबतही काही लोक विचार करतात. इथे आम्ही आपल्याला बिटकॉइन (Bitcoin) गुंतवणूक करण्याबातब सल्ला देत नाही. अथवा तसे सूचवत नाही आहोत. परंतू, बिटकॉइन म्हणजे काय? (What is Bitcoin) त्यात गुंतवणूक कशी होते. त्यात गुंतवलेल्या गुंतवणूकीचे अथवा पैशांचे मूल्य (Value Of Bitcoin) कसे वाढते याबाबत माहिती देत आहोत. आपल्याला माहिती असेलच भारतात बिटकॉइन गुंतवणूक विश्वासार्ह मानली जात नाही. भारत सरकार, अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारतात बिटकॉइन गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही.
4 वर्षांपूर्वी -
६ वर्ष लष्कराला खराब दर्जाचा दारुगोळा | ९६० कोटी वाया गेले | लष्कराचा अंतर्गत रिपोर्ट
मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा (dangerously faulty ammunition) खरेदी करण्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे. इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या. संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
SBI Bank Alert | Whatsapp द्वारे ग्राहकांची फसवणुकीची शक्यता
सोशल मीडियाचा वापर लाभदायक असला तरी तितकाच घातक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात लवकरात लवकर संपर्क साधण्यासाठी सोशल मॅसेंजिंग ऍप Whatsappचा वापर सर्रास होत आहे. परंतु Whatsapp वापर करणाऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँक (SBI)ने काही अलर्ट जारी केले आहेत. एसबीआयने (SBI) जारी केलेल्या अलर्टनुसार Whatsappवरील तुमची व्हॉट्सअॅपवर केलेली छोटी चूक तुमच्या बँक खात्यात अडथळा आणू शकते. सध्या सायबर गुन्हेगारांनी Whatsappचा वापर करून नागरिकांच्या बँकेतील पैसे लंपास करण्यावर भर दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Fact Check | कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई | PMJJBY आणि PMSBY योजनेतील सत्य
देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या साधारण दिवसाला 80 ते 85 हजारांच्या आसपास वाढत आहेच. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार देशात 24 तासांत 85 हजार 362 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांवर पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी -
याच व्यक्तीला मोदींनी ३० हजार कोटींचं राफेलचं ऑफसेट कंत्राट दिलेलं - प्रशांत भूषण
गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याचे समोर आले आहे. अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने विकून टाकावे लागले. तसेच सध्या खर्चासाठीही त्यांच्यावर मुलाकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वकिलांच्या फी साठी घरातले सर्व दागिने विकले | मुलाकडूनच कर्ज घेण्याची वेळ
गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याचे समोर आले आहे. अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने विकून टाकावे लागले. तसेच सध्या खर्चासाठीही त्यांच्यावर मुलाकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH