महत्वाच्या बातम्या
-
अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे मोदी सरकारवरील ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक ढासळला
भारतीय अर्थव्यवस्था बर्याच महिन्यांपासून अत्यंत बिकट परिस्थितीतून जातं आहे. मागील अवघ्या 15 दिवसात अशा अनेक घटना घडल्याअसून त्यावरून अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेचा अंदाज स्पष्ट होतं आहे. सदर आकडेवारीवरूनच हा मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचं अनेक अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसात समोर आलेल्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक; आरबीआय'चा बँकांना इशारा
मंदीने अर्थव्यवस्थेला चांगेलच हैराण केले असून RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नजीकच्या काळात आर्थिक स्थिती आणखी बिकट आणि आव्हानात्मक होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळं येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी बँकांनी सुसज्ज राहावे, असा सल्ला दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी शाळा आणि महाविद्यालये उभारणे गरजेचे: रघुराम राजन
सर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटल्याने इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत त्यामळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन, कामगार कायदा या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज राजन यांनी व्यक्त केली होती.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राकडे MTNL-BSNL वाचवायला पैसे नाही; बिर्ला म्हणाले मदत करा अन्यथा व्होडाफोनला टाळं
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडीयाला ५३ हजार कोटींचे शुल्क सरकारकडे भरावे लागणार आहे, मात्र यामध्ये केंद्र सरकारने कंपनीला दिलासा दिला नाही तर मात्र कंपनीला नाईलाजास्तव व्यवसाय गुंडाळावा लागेल, असा ईशाराच आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि व्होडाफोन आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध असताना बुलेट ट्रेनचा हट्ट गुजरातच्या कंपन्यांसाठी? सविस्तर वृत्त
राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात सरकार स्थापन करण्यात आल्यावर भारतीय जनता पक्षाची पडद्यामागील अनेक गुपितं समोर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या आंदोलनातील आणि नाणार संबंधित प्रकल्पांना लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांवर जे गुन्हे लादले होते ते मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला देणगी देणाऱ्या गुजरातच्या कंपन्यांवर बुलेट ट्रेन'संबंधित कंत्राटांची खैरात
राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात सरकार स्थापन करण्यात आल्यावर भारतीय जनता पक्षाची पडद्यामागील अनेक गुपितं समोर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या आंदोलनातील आणि नाणार संबंधित प्रकल्पांना लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांवर जे गुन्हे लादले होते ते मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजब! केंद्र सरकारनेच एअर इंडियाचे ७९७ कोटी ९५ लाख थकवले
कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया (Air India) आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन (Bharat Petroleum Corporation) या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
रेल्वेच्या उत्पन्नात कमालीची घट; १०० रु. कमविण्यासाठी ९८.४४ रुपये खर्च: कॅगचा अहवाल
भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. रेल्वेला २०१७-१८ मध्य़े १०० रुपये कमविण्यासाठी ९८.४४ रुपये खर्च करावे लागत आहेत. हा खुलासा कॅगच्या अहवालातून समोर आला आहे. मंदीच्या वातावरणामुळे यंदाही यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. कारण मालवाहतूक हा रेल्वेच्या उत्पन्नाचा खरा स्त्रोत आहे. मात्र, यंदा मंदीमुळे याचा फटका रेल्वेला बसला आहे. यामुळे कॅगने रेल्वेला अंतर्गत महसूल वाढीवर भर देण्याचे सुचविले आहे. तसेच खर्चही कमी करण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील आणखी ६ विमानतळ खाजगीकरणाच्या विळख्यात जाणार? सविस्तर वृत्त
एका बाजूला अर्थव्यवस्था संकटात सापडली असताना मोदी सरकारनं दुसऱ्या बाजूला खासगीकरणाचा धडाका लावला आहे. फेब्रुवारीमध्ये सरकारनं सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी मॉडेल) अंतर्गत लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, मंगळुरु, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटीमधील विमानतळाचं खासगीकरण केलं. यानंतर आणखी ६ विमानतळांचं खासगीकरणाचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरणानं (एएआय) मोदी सरकारला दिला आहे. यामध्ये अमृतसर, वाराणसी, भुवनेश्वर, इंदूर, रायपूर आणि त्रिची (तिरुचिरापल्ली) या विमानतळांचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच आणखी सहा विमानतळांचं खासगीकरण होऊ शकतं.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या नैत्रुत्वात आर्थिक पीछेहाट सुरूच; जीडीपी ४.५ टक्क्यांपर्यंत घसरला
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशवासियांना अर्थव्यवस्थेची मोठ मोठी स्वप्न दाखवत विरोधी पक्ष संपविण्यातच मग्न असल्याचं दिसलं. तज्ज्ञाच्या सल्ल्याने आणि मदतीने अर्थव्यस्थेचा गाडा हाकणे बंद होऊन एकतर्फी निर्णय होऊ लागले आणि त्याचंच नोटबंदी सारखे भीषण निर्णय घेण्यात आले. मात्र, आता थेट त्याच कार्यकाळात आर्थिक मंदीने देखील डोकं वर काढल्याने सर्वच बाजूने आर्थिक अडचण होण्यास सुरुवात झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
RBI'ने DHFL विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु केली; गुंतवणूकदारांचे ६,००० कोटी धोक्यात?
डीएचएफएलमध्ये (Dewan Housing Finance Corporation Limited) मुदत ठेवींच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) या खासगी गृहकर्ज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून तिच्याविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या गुंतवणूकदारांचे ६ हजार कोटी रुपये कधी व कसे परत मिळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्षात ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणं अशक्य: माजी RBI गव्हर्नर सी. रंगराजन
‘पुढील ५ वर्षांत भारताला ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य आव्हानात्मक असले तरी राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांच्या जोरावर साध्य केले जाऊ शकते’, असा विश्वास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या नीती आयोगाच्या संचालन परिषदेला संबोधित करताना व्यक्त केला होता. ‘सन २०२२पर्यंत नवा भारत घडविण्याचे सर्वांचेच संयुक्त लक्ष्य आहे’, असे सांगत मोदी यांनी आपले नवे लक्ष्य निश्चित केले होते.
5 वर्षांपूर्वी -
मानवनिर्मित चुकांमुळे आणि नैसर्गिक बदलांमुळे देश भीषण बेरोजगारीकडे: सविस्तर वृत्त
जर भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती कायम राहिली तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या वर्षात आपल्या ३० ते ४० हजार कर्मचाऱ्यांना कमावरुन कमी करु शकतात, अशी भीती इन्फोसिसचे माजी चीफ फायनान्शिअल ऑफिसर (सीएफओ) मोहनदास पै यांनी दोन दिवसनपूर्वी व्यक्त केली होती. आयटी क्षेत्रात प्रत्येक ५ वर्षांनंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या या प्रकारे जातात. कारण, ५ वर्षांत आयटी क्षेत्रात मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांतून काढले जाते, असे पै यांनी म्हटले होतं.
5 वर्षांपूर्वी -
बीएसएनएल'च्या बिकट आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांची व्हीएसआर'ला मोठी पसंती: सविस्तर वृत्त
ठरल्याप्रमाणे दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्याद्वारे ८० हजार कर्मचारी कमी होतील, असा अंदाज आहे. या कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँकेच्या खातेदारांची हायकोर्टाच्याबाहेर 'RBI चोर है' घोषणाबाजी
PMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी आरबीआय चोर है च्या घोषणाही दिल्या. मुंबई हायकोर्टाबाहेर पीएमसीचे खातेदार जमले होते. हमारा पैसा वापस कर दो आरबीआय अशाही घोषणा देण्यात आल्या. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत काय होणार याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. अशात ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी घोषणाबाजी केली.
5 वर्षांपूर्वी -
अखेर मोदी सरकाकडून एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कंपन्या विक्रीला
कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया (Air India) आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन (Bharat Petroleum Corporation) या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लंडन: आर कॉमसंबंधित कर्जामुळे अनिल अंबानींवर चीनच्या ३ बँकांकडून खटले दाखल
एडीएजी समुहाचे मालक एडीएजी समूहाचे अनिल अंबानी अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या अंबानींवर चीनच्या तीन बँकांनी ४८.५३ अब्ज रुपयांचा दावा ठोकला आहे. या बँकांनी सांगितले की अंबानींची बंद झालेली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनला २०१२ मध्ये ६६.०३ अब्ज म्हणजचे ९२.५२ कोटी डॉलरचे कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड न केल्याने २०१७ पासून बुडीत खात्यामध्ये आहे.
5 वर्षांपूर्वी -
नोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; अर्थव्यवस्थेच्या संकटावरून प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा
नोटाबंदी ही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी एक ‘आपत्ती’ असल्याचे सिद्ध करत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. नोव्हेंबर २०१९ मध्ये नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियंकाने मोदी सरकारवर हल्ला केला.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: प्राप्तिकर विभागाच्या धाडीत तब्बल ९.५५ कोटीची रोकड जप्त
करचुकवेगिरी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने पुणे परिसरातील एका व्यावसायिकावर धाड टाकली असून, त्यात तब्बल ९.५५ कोटीची रोकड जप्त केल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) गुरुवारी सांगितले. प्राप्तिकरांच्या छाप्यात आतापर्यंतचा सर्वात मोठी रोकड असल्याची देखील माहिती दिली आहे. सदर कारवाई ४ नोव्हेंबर रोजी करण्यात आल्याचे सीबीडीटीने सांगितले. परंतु अधिकाऱ्यांनी या व्यावसायिकाचे नाव उघड केले नाही.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते; पण चुकून जय शहांचं १५०० टक्क्यांनी वाढलं: सविस्तर
केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची संपत्ती तब्बल १६ हजार पटींनी वाढल्याचा गौप्यस्फोट एका संकेतस्थळाने केला आणि देशात जणू भूकंपच झाला होता. ज्या मुलाबाबत ही बातमी होती तो म्हणजे जय शहा. केंद्रीय गृहमंत्री अन् भाजपच्या सर्व सत्ताधीशांमधील क्रमांक दोनचे नेते अमित शहा यांचे चिरंजीव. जयच्या माध्यमातून तेव्हा काँग्रेसने मोदी-शहा जोडगोळीवर प्रचंड रान उठविले. पुढे अर्थातच हे प्रकरण शीतपेटीत गेले. तेव्हा प्रकाशात आलेले जय शहा हे नंतर येनकेन प्रकारे माध्यमांत झळकत राहिले. आता तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाल्याने पेज थ्रीसह विविध बातम्यांध्ये सतत झळकत राहणार यात शंका नाही. हे महाराज बीसीसीआयमध्ये अचानक कसे टपकले, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील