महत्वाच्या बातम्या
-
नोएडा'त मोदींच्या हस्ते होणार सॅमसंगच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन
सॅमसंग कंपनीच्या या प्रकल्पाची बोलणी उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सोबत झाली होती. परंतु उत्तर परदेशात सत्तापालट होऊन भाजपचे सरकार स्थापन झाले आणि सर्व काही खोळंबून होत. परंतु त्यानंतर सॅमसंग’च्या प्रतिनिधींनी उत्तर परदेश दौरा करून विद्यमान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि या प्रकरणाला पुन्हा गती आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून १४ पिकांच्या हमीभावात दीडपट वाढ
आगामी निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ करण्यात आली असून धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि नापिकी सारख्या अनेक प्रश्नांनी होरपळलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकारकडून सामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा झटका?
सर्वसामान्यांना महागाई आधीच डोईजड झाली असताना त्यात आता भाजप-शिवसेनेच्या सरकारकडे महानिर्मिती व महापारेषण या २ वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढ व वीजवहनासाठी २,५३२ कोटी रुपये इतकी प्रचंड दरवाढ मागितली आहे. लवकरच आयोगाच्या मंजुरीनंतर याबाबत अधिकृत निर्णय घेऊन अंमलबजावणी होईल. त्यामुळे भाजप शिवसेनेचं युती सरकार लवकरच तुम्हाला वीज दरवाढीचा झटका देणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनंतर आता 'मेट्रोमॅन' ई श्रीधरन यांची सुद्धा बुलेट-ट्रेन बाबत नकारात्मक टीका
देशात मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन’बद्दल मोठा आभास निर्माण केला जात असल्याचे चित्र असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही मुंबई’ला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या दूरदृष्टिकोनातून लादली जात असून त्याचा प्रत्यक्ष मुंबई आणि महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नसून, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा बोजा मात्र महाराष्ट्रावर लादला जाणार आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठी असून त्याचा राज्यातील सामान्यांना काहीच फायदा होणार नसल्याचे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्विस बँकेतील काळा पैसा बाहेर काढणं दूरच, उलट ५० टक्क्यांनी भारतीयांचा पैसा वाढला
देश विदेशातील काळ्या पैशावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणल्याच्या मोदी सरकारच्या दाव्याला स्विस नॅशनल बॅंकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे मोठा धक्का बसला आहे. कारण त्या अहवालानुसार स्विस बॅंकेत असणारे भारतीयांच्या पैशावर ५० टक्क्यांनी वाढ होऊन ही रक्कम जवळपास ७००० हजार कोटीच्या घरात गेली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पावर स्वाक्षऱ्या, निसर्गप्रेमी कोकणी लोकांमध्ये सेना-भाजप सरकार विरुद्ध संतापाची लाट येण्याची शक्यता
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध आहे. परंतु कोकणी माणसाचा तीव्र विरोध डावलून हुकूमशाही पद्धतीने हा प्रकल्प अखेर कोकणावर लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे कोकणात विद्यमान आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री असताना सुद्धा या प्रकल्पाच्या करारावर दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नोटबंदी व जुन्या नोटा कोणाच्या बँकेत सर्वाधिक
अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक म्हणजे ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीनंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये जमा झाल्याच माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा हे राज ठाकरेंचे आरोप खरे ठरले? सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत भाजपने लादलेली नोटबंदी ही म्हणजे देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या त्या आरोपाला सध्या माहितीच्या अधिकारात बाहेर आलेल्या आकड्यामुळे दुजोरा मिळताना दिसत आहे. कारण भारतात इतक्या सहकारी बँका असताना सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक म्हणजे ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीनंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये जमा झाल्याच माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
सामांन्यांचे हाल पण तेल कंपन्या मालामाल, ५२ हजार कोटीचा नफा
देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव भडकल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली असली तरी भारतातील प्रमुख तेल कंपन्यांनी बक्कळ कमाई केल्याचे चित्र आहे. कारण या कंपन्यांनी तब्बल ५२ हजार कोटी इतका प्रचंड नफा कमावल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांची उचलबांगडी ?
व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी ICICI बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना हटवून त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कडून संचालक आणि सीओओ पद काढून संचालक मंडळाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रादेशिक पक्षात देशात सेनेला सर्वाधिक देणग्या, सर्वाधिक देणगीदार बांधकाम क्षेत्रातील
सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला शिवसेना पक्ष हा संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय देणग्या मिळवण्यात अव्वल ठरली असल्याचे २०१६-१७ च्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक ताळेबंदात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे अधीकृत रित्या उघड झालेल्या देणगीदारांच्या यादीत बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन: राज ठाकरे
मराठी उद्योजकांनी आक्रमक पने व्यवसाय करणे गरजेचे आहे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र बिजनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं.
7 वर्षांपूर्वी -
आरबीआयकडून रेपो दरात वाढ, महागाई अजून वाढण्याची शक्यता
भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१८-१९ या वर्षाचे पतधोरण जाहीर करताना रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वीचा रेपो दर ६.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के असेल. त्यामुळे ग्राहकांसाठी एक वाईट बातमी अशी या निर्णयामुळे महागाईही वाढण्याची चिन्हं असून कर्जाचा हप्ता सुद्धा वाढणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
जवानांना स्वतःच्या खिशातून गणवेश व इतर साहित्य घ्यावे लागणार
केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या अतिरिक्त निधीसाठी नकार दिल्याने लष्कराला त्यांच्या अनेक खर्चात कपात करावी लागणार असून अगदी गणवेश आणि इतर साहित्य सुद्धा जवानांना स्वखर्चातून घ्यावं लागणार आहे. परंतु यावरून केंद्र सरकारची उदासीनता समोर आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमृत फार्माचे तरुण संचालक शैलेश जोशींची आत्महत्या
अमृत फार्माचे तरुण संचालक शैलेश जोशींनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून काल रात्री आत्महत्या केली आहे. वय वर्ष चाळीस असताना एका तरुण तडफदार उद्योजकाने आत्महत्या केल्याने उद्योग जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राजवटीतली महागाई थांबता थांबेना, सामान्य हैराण
सर्वच शहरांमध्ये रोजच्या जीवनाश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असून त्यात भाजीपाल्यासारख्या वस्तू महागण्याची शक्यता. आधीच कालपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपानंतर आता संपूर्ण देशातील शेतकरी संपावर गेल्याने दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनता गॅस वर, अनुदानित-विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढले
आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भडका उडाला असताना आता अनुदानित व विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढले आहेत. देशभरातील ८१ टक्के कुटुंबं हे सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या सिलेंडर दरवाढीचा फटका देशातील कोट्यवधी लोकांना बसणार आहे. अनुदानित सिलेंडरचा दर ४८ रुपयांनी, तर विनाअनुदानित सिलेंडरचा दर २ रुपये ३४ पैसे असा वधारला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त, मनसेकडून पेट्रोल ४ रुपयांनी स्वस्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. मुंबईतल्या एकूण ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं
राज्यभरात रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं असून सामान्य माणसाचं महागाईने कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. कारण दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे तब्बल १५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सर्वच दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार: केंद्र
आज नवी दिल्लीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काही तरी निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काहीच निर्णय घेतला नसून उलट सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार असं अप्रत्यक्ष सूचित केलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा