महत्वाच्या बातम्या
-
सिने कलाकारांसह दिग्दर्शकांचं भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन
देशातल्या तब्बल शंभरपेक्षा अधिक सिनेमेकर्सनी भारतीय जनता पक्षाविरोधात मतदान करण्याचं आवाहन सामान्यांना केलं आहे. सदर विषयाला अनुसरून त्यांनी एक जाहीर निवेदन देखील प्रसिद्ध केलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आलेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास १११ लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदारा भाजपा प्रदेशाध्यक्षाचा मुलगा निघाला कॉपीबहाद्दर, सापडल्या तब्बल २७ चिठ्ठ्या
गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीतू वाघानी यांचं नाव सध्या अचानक चर्चेत आलं आहे. वाघानी यांच्या मुलाला परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. बॅचलर्स ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशनची (बीसीए) परीक्षा देणाऱ्या वाघानी यांचा मुलगा मीतकडे तब्बल २७ चिठ्ठ्या सापडल्या. यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलेल्या धैर्यशील माने यांना सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
डीआरडीओ'चे माजी अध्यक्ष व्ही.के सारस्वत आरएसएस मुख्यालयात हजेरी लावत?
भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. भारताच्यामिशन शक्तीच्या यशाची चर्चा देशभर सुरु असताना अनेकांनी जुनी वृत्त प्रसिद्ध करत हे मिशन आधीच्या सरकारचे श्रेय असल्याचं म्हटलं होत. तर अनेकांनी यावर शास्त्रज्ञांनी बोलणं उचित असताना, मोदींनी देशाला संबोधण्याचा थेट संबंध लोकसभा निवडणुकीशी जोडला.
6 वर्षांपूर्वी -
'मैं भी चौकीदार' या राजकीय मोहिमेत आमचा सहभाग नाही: बँक अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच ट्विटरवरुन डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. परंतु, देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’नं या संघटनेनं याबद्दल असमर्थतता दर्शवली आहे. यासाठी संघटनेनं थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलं आहे. आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवा. ते सुटेपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ या राजकीय मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका, असा पवित्रा संघटनेनं घेतला आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’नं या इंग्रजी दैनिकानं हे अधिकृत वृत्त दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा: ९ वर्षाच्या मेहनतीवर शास्त्रज्ञांना मोदींनी व्यक्तच होऊ दिलं नाही?
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या मदतीने अंतराळातील उपग्रह पाडण्यात यश मिळवले असून, ऑपरेशन शक्ती अंतर्गत करण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे भारत हा अंतराळात मारा करू शकणारा अमेरिका, रशिया, चीननंतरचा भारत हा चौथा देश बनला आहे. वास्तविक भारतीय शास्त्रज्ञ स्वतः यावर जवळपास मागील ९ वर्षांपासून मेहनत करत होते आणि सदर मिशन हे काँग्रेस राजवटीला असल्याने मोदींनी शास्त्रज्ञांना देखील त्यांचा आनंद व्यक्त करण्यास किंवा पत्रकार परिषद आयोजित करण्यास दिली नसल्याची चर्चा रंगली आहे. मोदींच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले पण, त्यासाठी देशाला संबोधित करण्यामागील हेतू वेगळाच असल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ व शिवसेनेविरुद्ध ठेवीदारांची मोहीम
लोकसभा निवडणुका झाल्या असताना शिवसेनेचे अमरावतीचे खासदार अडचणीत आल्याचे चित्र आहे. कारण ‘द सिटी को ऑप. बँकेच्या ठेवीदारांनी त्यांच्या विरुद्ध समाज समाज माध्यमांवर मोहीम सुरु केली आहे. त्यात संबंधित ठेवीदार हातात बॅनर घेऊन त्यावर एक संदेश देत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय शास्त्रज्ञांची अंतराळ क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून आज सकाळी ११:४५ ते १२:०० वाजताच्या दरम्यान मी जनतेशी संवाद साधून एक संदेश देणार असल्याचे म्हटले. जवळपास सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी जनतेला संबोधित केले. भारताने आज अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात मोठी झेप घेतली, असे म्हणत त्यांनी शास्त्रज्ञांनी मिशन शक्ती मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा केली. अमेरिका, चीन, रशियानंतर हे पाऊल उचलण्यात भारताचा जगात चौथा क्रमांक ठरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची घटना समजली जात आहे. विशेष म्हणजे ही मोहीम यशस्वी करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं मोदींनी सांगितलं. देशाला शास्त्रज्ञांचा अभिमान असल्याचं ते म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना राज्य सरकारकडून झटका, १ एप्रिलपासून वीज दरात ६ टक्क्याने वाढ
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर १ एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात तब्बल सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे विजबिलात सहा टक्क्यांनी वाढ होईल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: उत्तर प्रदेशात कुचकामी ठरू शकतो पुलवामा मुद्दा: द वायर वृत्त
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यानंतर देशातील वातावरण तापून गेले. त्यात महिन्याभराने झालेल्या एअर स्ट्राईकनंतर सत्ताधारी भाजपने लष्कराच्या नावाने स्वतःचा प्रचार आटपून घेतला आणि स्वतःसाठी वातावरण निर्मिती करून घेतली.
6 वर्षांपूर्वी -
पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईंचाच सल्ला घेणार, शिवसेनेच्या मुंबई पालिकेचा घाट
सीएसटीएम स्थानकाजवळील हिमालय पुलाचा भाग कोसळण्यास जबाबदार ठरलेल्या बेजबाबदार कंत्राटदारावर पालिका प्रशासनाने १६ पुलांच्या दुरुस्तीची जबाबदारी टाकली आहे. हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाई असोसिएटेड या कंपनीला पुन्हा काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घेतला आहे. या दुरुस्तीसाठी पालिका तेरा कोटी ८६ लाख मोजणार आहे. पालिका प्रशासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या जीव धोक्यात येणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
जेट एअरवेजला बँकांच्या मदतीबाबत विजय मल्ल्याचा आक्षेप
जेट एअरवेज ही कंपनी सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. ही आर्थिक अडचण सोडवण्यासाठी मदतीला सरकारी बँका धावून आल्या, हे पाहायला फार छान वाटलं, परंतु अशीच मदत किंगफिशर एअरलाईन्सच्या आर्थिक अडचणीवेळी का करण्यात आली नाही, असा सवाल उद्योगपती विजय मल्ल्याने उपस्थित केला आहे. विजय मल्ल्याने ४ ट्विट करत जेट एअरवेज आणि किंगफिशर एअरलाईन्सला वेगळा न्याय का, असा प्रश्न विचारला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दोन चोर गुजराती देशाला मूर्ख बनवत आहेत: भाजप ज्येष्ठ नेते आय. पी. सिंह
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वावरच थेट टीका केल्यानं भाजपाकडून वरिष्ठ नेत्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाचा उल्लेख ‘गुजराती चोर’ म्हणून केल्यानं भाजपानं लखनऊमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते आय. पी. सिंह यांचं निलंबन केलं. सिंह यांनी ट्विटरवरुन भाजपा नेतृत्त्वावर कडाडून टीका केली होती. भाजपानं पंतप्रधान निवडला आहे की प्रचारमंत्री असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
२५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढणार : राहुल गांधी
कॉंग्रेस सत्तेवर आल्यास देशातील जनतेला न्याय देईल, असे म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची न्याय योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत वीस टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२,००० रुपये देणार, असे ते म्हणाले. पाच कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना या योजनेचा फायदा होईल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गाला आर्थिक आधार मिळेल.
6 वर्षांपूर्वी -
मी ब्राह्मण असल्याने नावाआधी ‘चौकीदार’ लावू शकत नाही: सुब्रमण्यम स्वामी
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भारतीय जनता पक्षाने ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू होताच सर्व पक्षाच्या नेत्यांनी समाज माध्यमांवर आपल्या नावाआधी चौकीदार शब्द लावला. मात्र, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ हा शब्द जोडला आहे. पण सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र आपण ब्राह्मण आहे, त्यामुळे नावात ‘चौकीदार’ शब्द लावू शकत नसल्याचे म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदारकडून डिजिटल चोरी; पक्षाच्या वेबसाईटसाठी दुसऱ्या कंपनीचा फुकट कोड चोरल्याचा आरोप
भाजपने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत वेबसाईटसाठी टेम्प्लेट चोरल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील एका वेब डिझाईन कंपनीनं केला आहे. भाजपानं कोणतंही क्रेडिट न देता टेम्प्लेटची बॅकलिंक काढून टाकल्याचा आरोप डब्ल्यूथ्रीलेआऊट्सनं (W3Layouts) केला. भाजपानं टेम्प्लेटसाठी कोणतंही क्रेडिट दिलं नाही. उलट त्याची बॅकलिंक मुद्दामहून काढून टाकली, असा दावा कंपनीनं केला.
6 वर्षांपूर्वी -
चीनकडून पाकिस्तानला तब्बल २ अब्ज डॉलर्सचे कर्ज
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला चीनकडून तब्बल 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. चिनी सरकारकडून याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असून २५ मार्चपर्यंत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या खात्यात २.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स (१५ अब्ज यूआन) जमा होतील असे पाकच्या वित्त विभागाचे प्रवक्ते खकान नजीब खान यांनी सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
दिल्ली पाकिस्तानी उच्चायुक्तालयात पाकिस्तान राष्ट्रीय दिन साजरा, मोदींकडून शुभेच्छा
पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात होणाऱ्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर भारताने बहिष्कार घातला. पण त्याचवेळी मोदींनी पाकिस्तानी जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा निरव मोदी? PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलं त्यालाच सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीएम नरेंद्र मोदी सिनेमासाठी जावेद अख्तर यांनी कोणतही गाणं लिहिलं नाही, तरीही पोष्टरवर नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शित होत असलेला सिनेमा सुरवातीलाच अडचणीत सापडला आहे. कारण असं आहे की या सिनेमासाठी कोणताही गाणं लिहिलेलं नसताना देखील त्याच्या पोश्टरवर जावेद अख्तर यांचं नाव झळकलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याविरूद्ध कोणाचीही कायदेशीर कारवाई करणार का ते पाहावं लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON