महत्वाच्या बातम्या
-
राफेल करार; पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार
राफेल कराराप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या निकालासंदर्भात दाखल झालेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाही, असे स्पष्ट करतानाच या कराराच्या चौकशीची मागणी फेटाळली होती.
6 वर्षांपूर्वी -
पुलावामा हल्ला: देश दुःखात बुडाला, पण मोदी कॉर्बेट पार्कात शूटिंग करत होते: काँग्रेसने पुरावे दिले
पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात १० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला असताना नरेंद्र मोदी नेमके काय करत होते याचे पुरावे सादर करण्यात आले आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशात सर्वांनी एकत्र येण्याची हाक सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दिली होती. त्यानंतर विरोधकांनी देखील सामंज्याची भूमिका घेत सरकारला सहकार्य देखील केलं. वातावरण भावनिक असल्याने विरोधकांनी कोणतेही प्रश्न उपस्थित केले असते तर मोदींनी त्याच राजकारण केलं असतं हे विरोधकांना चांगलेच ठाऊक होतं. कारण, स्वतः भाजपचे नेते म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे सर्वच प्रमुख नेते प्रचारात व्यस्त होते. त्यात हद्द म्हणजे, दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावून स्वतः नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये प्रचारासाठी गेले आणि तेथे सुद्धा लष्कराच्या नावाने स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
किसान सभेचा भव्य लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. परंतु, ही चर्चा पूर्णतः निष्फळ ठरली आहे. कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
गुप्तचर यंत्रणांचा इशारा! जैश-ए-मोहम्मद मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने आधीपेक्षा देखील भयानक आत्मघाती हल्ला करण्याची मोठी योजना आखल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानुसार १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी सदर इशारा दिला आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले.
6 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना कोर्टाचा दणका; ४ आठवड्यात ४५३ कोटी द्या, अन्यथा ३ महिन्यांचा तुरुंगवास
रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. अनिल अंबानी यांनी ४ आठवड्यामध्ये थकवलेले ४५३ कोटी रुपये भरावे, अन्यथा ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असे निर्णयाअंती बजावले आहे.
6 वर्षांपूर्वी -
IPL - १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात इंडियन प्रीमिअर लीगही अर्थात आयपीएलच्या १२ व्या हंगामाचे सामने देखील रंगणार आहेत. आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २३ मार्चपासून सुरू होणा-या लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे एकमेकांसमोर ठाकणार आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात ठेवता २३ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत पहिल्या २ आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतात निवडणुकीचा काळ, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशा चर्चेने जोर धरला : इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला.
6 वर्षांपूर्वी -
युद्ध छेडल्यास विचार करणार नाही, पाकिस्तान थेट उत्तर देईल: इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं.
6 वर्षांपूर्वी -
RBI केंद्र सरकारला २८ हजार कोटी रूपये देणार
RBI ने केंद्र सरकारला २८,००० कोटी रूपयांची अंतरिम शिलकीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. आज आरबीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदर निर्णय निश्चित करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देखील या बैठकीस उपस्थित होते. सलग दुसऱ्या वर्षी आरबीआय सरकारला अंतरिम शिल्लक हस्तांतरित करत आहे. मागील अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. याच मुद्यावरून सरकारबरोबर मतभेद झाल्याने आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय हॅकर्स जाम भारी! पाकिस्तानच्या तब्बल २०० वेबसाईट्स हॅक
पुलवाम येथे CRPFच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना सर्वच भारतीयांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यामुळे संतापलेल्या भारतीय हॅकर्सने पाकिस्तानवर सायबर हल्लाच चढवला आहे. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानमधील तब्बल २०० वेबसाईट्स हॅक केल्या असून त्यात सर्वाधिक भरणा हा सरकारी वेबसाईट्सचा आहे. भारतामधील ‘टीम आय क्रू’ या गटाने हा सायबर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. हॅक झालेल्या साईट्सवर या गटाचे नाव झळकताना दिसले तसेच काही वेबसाईट्स वर लढाऊ विमानातून तिरंगी धूर येताना दिसत होता.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराचा ‘जैश’ला दणका, काश्मीरमध्ये कमांडर कामरानचा खात्मा झाल्याचं वृत्त
चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही.
6 वर्षांपूर्वी -
जवानाच पार्थिव आलं आणि त्यासोबत भाजप मंत्र्याचा सेल्फी, सर्वत्र संताप व्यक्त
चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही. सध्या अनेक शहीद जवानांचे शव अंत्यविधींसाठी त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येत आहेत. दरम्यान, यावेळी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर दहशदवादी हल्ला ८ ठार ११ जखमी
जम्मू काश्मीरमधील पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात असताना बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात एकूण ९ जण ठार झाले असून ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला.
6 वर्षांपूर्वी -
‘स्मार्ट सिटी’ केवळ निवडणुकीचं गाजर, अनेक ठिकाणी सुरुवातच नाही
स्मार्ट सिटी परियोजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुणेसह महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १,५६८ कोटी रुपये दिले आहेत; मात्र वस्तुस्थिती ही आहे की, ४ वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या योजनेंतर्गत निर्धारित कार्यांतील ५८ टक्के कामांना अद्याप सुरुवातच करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
इंदिरा गांधींनी पाकिस्तानविरुद्ध १९७१ मध्ये दाखवलेलं धाडस नरेंद्र मोदी दाखवतील का? सविस्तर
राष्ट्रीय संकट आणि त्यावर राजकीय इच्छ शक्तीतून मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध थेट युद्ध पुकारून जे अभ्यासपूर्ण धाडस दाखवलं ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या पिढीवर समाज माध्यमांच्या आधारे अनेक चुकीच्या आणि खोट्या गोष्टी दुय्यम मार्केटिंगच्या आधारे लादल्याचे सहज निदर्शनास येते. पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्लात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मागणीने जोर धरला.
6 वर्षांपूर्वी -
MTNL डबघाईला? कर्मचार्यांचे पगारासाठी सोमवारी निदर्शने आंदोलन
एमटीएनएलच्या कर्मचार्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अद्यापही न झाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. एकेकाळी भारत सरकारला हजारो कोटींचा वार्षिक फायदा मिळवून देणारी एमटीएनएल सध्या भारत सरकारच्या दिशाहीन व अदूरदर्शी धोरणांमुळे आर्थिक गर्तेत अडकण्याला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील कामगार संघटना देखील कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
दहशतवाद्यांना आश्रयाची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल : इराण लष्कर
दहशतवादी कारवायांनी इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याने सध्या पाकिस्तानविरुद्ध इराण देखील संतापल्याचे दिसते. दरम्यान, दहशवादी कारवायांना आश्रय देणाऱ्या आणि दहशदवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला इराणने चांगलेच धारेवर धरले आहे. दहशतवाद्यांना पोसण्यामुळे भविष्यात पाकिस्तानला मोठ्ठी किंमत मोजावी लागेल असा सज्जड दम इराणने दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह व विरोधी पक्षांची दहशतवादाविरोधात एकजूट
पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. तसेच दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईत सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिले. तसेच दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव देखील पारित करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
'वंदे भारत एक्स्प्रेस' या वेगवान ट्रेनचं इंजिन दुसऱ्याच दिवशी फेल, शेवटच्या डब्याचा ब्रेक जाम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या देशातील सर्वात वेगवान ट्रेन १८ मध्ये दुसऱ्याच दिवशी बिघाड झाला आहे. शनिवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून २०० किलोमीटर अंतरावर असतानाच बिघाड झाला. वंदे भारत एक्स्प्रेसला रविवारी पहिल्या कमर्शिअल रनसाठी वाराणसीहून दिल्लीसाठी प्रस्थान केले. यावेळी ट्रेनचं इंजिन फेल झालं. शेवटच्या डब्याचा ब्रेकदेखील जाम झाला होता. यासोबत काही डब्यांमधील वीज गायब झाली.
6 वर्षांपूर्वी -
यापूर्वीचा पुलवामा हल्ला; 'सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच' असं भाजप खासदार नेपालसिंह बरगळले होते
एक दिवसापूर्वी सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. देशभरातून संतप्त प्रतिकिया देखील येत आहेत. परंतु, पुलवामा मधील लष्कराच्या जवानांवर झालेला हा काही पहिला भीषण हल्ला नव्हता. यायाधी सुद्धा पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला होता. परंतु देशवासीयांची विसरण्याची प्रवृत्ती राजकारण्यांच्या पथ्यावर पडते. तसं पुन्हा होऊ नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON