महत्वाच्या बातम्या
-
FDI नियम; फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, पेटीएम, अमेझॉनचे मेगा सेल बंद
ईकॉमर्स क्षेत्रातील जाईंट फ्लिपकार्ट, पेटीएम, अमेझॉन १ फेब्रुवारीपासून निरनिराळ्या दिवसांच्या निमित्ताने आयोजित करणारे मेगा सेल यापुढे बंद करावे लागणार आहेत. दिवाळी, दसरा, नवीन वर्ष, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा अनेक महत्वाच्या दिवशी ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी खरेदीवर मोठी सूट देऊन एकूण विक्री वाढवायचे. परंतु, सरकारच्या नव्या एफडीआय नियमांमुळे यापुढे या कंपन्यांना हे सर्व येत्या १ फेब्रुवारीपासून करता येणार नाही.
6 वर्षांपूर्वी -
#GoBackModi ट्विटरवर ट्रेंड; 'गो बॅक मोदी', तामिळनाडू दौऱ्याला विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडुतील मदुराईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानिमित्त संपूर्ण तामिनाडूत ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड करत त्यांना जोरदार विरोध केला जातो आहे. त्यानिमित्त लाखो तमिळ नेटीझन्स आक्रमक झाले असून ट्विटवर मोदींविरोधात रान पेटवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चंदा कोचर यांच्यावर FIR घेणाऱ्या CBI अधिकाऱ्याची १२५० किमी दूर बदली
आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडियोकॉन समूहाचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांच्यावर FIR दाखल करणाऱ्या CBI अधिकाऱ्याची दुसऱ्याच दिवशी १२५० किलोमीटर दूर बदली करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तान दरम्यान 'पाणीबाणी'; पाणी वाद पेटण्याची शक्यता
भारत आणि पाकिस्तान दरम्यान पाण्यावरुन तिढा वाढण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये ५९ वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पाणीवाटपाचा करार झाला. दरम्यान, सदर कराराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत. त्यामुळे लवकरच हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी सुद्धा प्रतिष्ठेचा करणार यात शंका नाही.
6 वर्षांपूर्वी -
चपराक! लोकसभा निवडणुकांशी संबंध जोडून लेखिका गीता मेहतांनी 'पद्मश्री' नाकारला
सुप्रसिद्ध वरिष्ठ लेखिका गीता मेहता यांनी नुकताच घोषणा करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार घेण्यास केंद्र सरकारला स्पष्ट नकार दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सदर मानाचा पुरस्कार स्विकारण्याची ही योग्य वेळ नसल्याचे कारण गीता मेहता यांनी पुढे केले आहे. विशेष म्हणजे गीता मेहता या ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या मोठ्या बहिण आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राजपथावर शक्तिप्रदर्शन, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते 'ध्वजारोहन'
देशभरात आज ७० वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत राजपथावर देशाच्या तिन्ही दलाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत तिरंग्याला मानवंदना दिली. तसेच देशातील अनेक राज्यांच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचं दर्शन सुद्धा राजपथावर घडलं.
6 वर्षांपूर्वी -
७० व्या प्रजासत्ताक दिनी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
आज ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्ली तसेच संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत आज राजपथावर दिमाखदार संचलन पार पडणार आहे. दरम्यान आजच्या सोहळ्याला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
देशाची विविधता हीच आपल्या देशाची ताकद : राष्ट्रपती
भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना संबोधित केले. देशातील सर्व उपलब्ध संसाधनांवर प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार आहे. देशाचा नागरिक हा कोणत्याही समाजाचा, समूहाचा असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील असो, आपन सर्व समान आहोत. विविधता हीच आपल्या देशाची खरी शक्ती आणि ओळख आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘ठाकरे’ सिनेमा नक्की बघा! तो बनवतांना आम्ही अभिजीतची मेहनत पाहिली आहे: राजू पाटील
एकीकडे ठाकरे सिनेमाच्या प्रोमोवरून वाद निर्माण झाला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मात्र ‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यासाठी सर्वांनी अभिजित पानसेंच्या मेहनतीचे कौतुक करत सिनेमा आवर्जून पाहण्याचे आवाहन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सवर्ण आरक्षणाला स्थगिती नाही, परंतु केंद्राला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे केंद्राला लोकसभा निवडणुकीआधी मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, सदर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटिसला उत्तर देण्यासाठी कोर्टाने केंद्राला ४ आठवड्यांचा कालावधी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दरवाढीचा झटका! वीजदर प्रति युनिटमागे ५० ते ६० पैशांनी वाढणार
आधीच वीजदरवाढीमुळे हैराण असलेल्या वीजग्राहकांवर आता नव्या पर्यावरण नियमांचा भार पडणार आहे. दरम्यान, पर्यावरण रक्षणासाठी आता औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना नव्या सुसज्य यंत्रणा बसवाव्या लागणार आहेत. तसेच संबंधित प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणाऱ्या राखेच्या वाहतुकीचा बोजाही यंत्रणांवर पडणार असल्याने प्रति युनिट पन्नास ते साठ पैशांची वीजदरवाढ होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
इस्रोकडून सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संधोधन संस्थेनं अर्थात इस्रोने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. काल रात्री उशिरा आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून इस्रोनं जगातील वजनाने सर्वाधिक हलक्या उपग्रहाचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केलं. काल रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी इस्रोनं मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. दरम्यान, मायक्रोसॅट या उपग्रहामुळे भारतीय लष्कराला सर्वात मोठी मदत मिळणार आहे. तर कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी बनवला आहे. PSLV- C ४४ च्या मदतीनं या दोन्ही उपग्रहांचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही : मुख्य निवडणूक आयुक्त
लंडनमधील हॅकेथॉनमध्ये सय्यद शुजा नामक हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, ईव्हीएम’वरून देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच पार पडतील हे स्पष्ट केले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात घेऊन जाण्याचा आमचा विचार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सावधान! रेल्वेभरती जुमला? ५ वर्षांपासून ३ लाख पदं रिक्त, अचानक ४ लाख पदांची भरती?
भारतीय रेल्वे सेवेमध्ये आगामी २ वर्षांमध्ये एकूण ४ लाख पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली. दरम्यान, मागील ५ वर्षांपासून २,८२,९७६ पदं रिक्त असताना मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या केवळ एक महिना आधी रेल्वेतील तब्बल ४ लाख पद भरण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. तसेच लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच घोषणा आटपून घेण्याचे नेमके कारण तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'तो' दिग्दर्शक महाराष्ट्र सैनिक नसता, तर इथेही 'बाळकडू' झाला असता? सविस्तर
स्वर्गीय. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वासंबंधित किंवा त्यांच्या विचारांशी संबंधित ‘ठाकरे’ का काही पहिला सिनेमा नाही. याआधी ‘बाळकडू’ हा मराठी सिनेमा देखाली प्रदर्शित झाला होता. त्यामधल्या कथेत थेट स्वर्गीय. बाळासाहेबांच्या जीवनाशी किंवा त्यांच्या सुरुवातीपासूनच्या राजकीय प्रवासाचा काहीच समावेश नसला तरी त्यांच्या विचारांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता. त्यात मुख्य भूमिकेत असलेल्या उमेश कामत यांच्यासोबत थेट बाळासाहेब बोलतात असे दाखविण्यात आले होते. परंतु, २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची संकल्पना ही २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाशी साम्य असणारी होती. दरम्यान, याच ‘बाळकडू’ सिनेमाने त्यावेळी काही विशेष कामगिरी केली नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
बलाढ्य अर्थशक्ती? भाजपकडून प्रचारासाठी सर्व खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर बुक?
लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशी राजकीय पक्षांची सुद्धा धावपळ सुरु झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपकडून विरोधकांची वेगळ्याच प्रकारे कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे. कारण, काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीआधीच विरोधकांची राजकीय कोंडी करण्यासाठी अर्थकरणाच्या शक्तीवर देशातील जवळपास सर्वच खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर आधीच बुक केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'च्या नावाने ५६ टक्के निधी फक्त जाहिरातबाजीवर
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’मागील वास्तव उघड झालं आहे. कारण केंद्र सरकारकडून तरतूद करण्यात आलेला एकूण निधी पैकी सर्वाधिक पैसा हा सरकारकडून केवळ जाहिरातबाजीवर उधळला जातो आहे. देशातील महिला-पुरुष जन्मदरात समतोल निर्माण करण्यासाठी आणि महिलांप्रति लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी ही योजना केंद्राने हाती घेतली होती. त्यासाठी मोदी सरकारने कोट्यवधी रुपयांची भली मोठी तरतूद सुद्धा केली. परंतु, तरतूद करण्यात आलेल्या एकूण ६४४ कोटी रुपयांपैकी तब्बल ५६ टक्के निधी हा मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीवर खर्च करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्वाचे निर्णय
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाने शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुणेकरांना सुद्धा विशेष शैक्षणिक भेट दिली आहे. कारण आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय निश्चित करण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या कार्यकाळात सरकारचे कर्ज ४९ टक्क्यांनी वाढले, तरी घोषणा काही संपेना!
केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. परंतु, देशावरील एकूण कर्जाचा बोजा बघता भविष्यात सर्वकाही आर्थिक दृष्ट्या फारच कठीण आहे असंच म्हणण्याची वेळ आली आहे. त्यात, महसुली तोटा ही दुसरी मोठी आर्थिक अडचण सुद्धा डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. एखाद्या घोषणेची अंमलबजावणी म्हटल्यास सरकारी तिजोरीत पैसा असणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु, सध्या अर्थमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार ते सर्वच कठीण आहे असं म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मणिकर्णिका चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका, प्रकृती चिंताजनक
अभिनेत्री कंगणा राणावत हिचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका’चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. कमल जैन यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. त्यांच्यावर सध्या मुंबईतील कोकीलाबेन इस्पितळात उपचार सुरू असून, त्यांना व्हेंटिलेटरवर मशीनवर ठेवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS