16 January 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 8'व्या वेतन आयोगाला मंजुरी, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होणार पहा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE SBI Bank Alert | एसबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट, अन्यथा खात्यातील बॅलेन्स शून्य होऊ शकतो, बातमी वाचा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी .
x

या गोष्टींचा उल्लेख इन्कम टॅक्स रिटर्न'मध्ये केला नाही तर दंड भरावा लागणार.

ITR, Income tax Return, Income tax, Indian tax, GST, Penalty

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ ऑगस्ट हि शेवटची तारीख आहे. या महिन्यात तो काहीही करून तो भरावाच लागेल. पण त्या घाईत जर काही गोष्टींचा उल्लेख करणे राहून गेले तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. हल्ली अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. एका म्युच्युअल फंडातून दुसरीकडे जाताना म्युच्युअल फंडातून जे पैसे मिळतात ते दाखवणं राहून जात याचा उल्लेख कर्ण आवश्यक आहे. अन्यथा आयकर विभागाकडून तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना सेविंग अकाउंट आणि एफडीमधून मिळणार व्याजही दाखवावं लागत. तसेच छोट्या मुलांच्या नवे केलेली गुंतवणूक एका वर्षात १५०० रुपयांपर्यंत करमुक्त आहे. पण जर ती या रकमेच्या वर जात असेल तर ती सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवावी लागणार आहे. आयकर विभागाच्या नियमानुसार तुमच्या मालकीचे एक घर हे करमुक्त आहे. परंतु जर तुम्हाला दुसऱ्या घरातून उत्पन्न मिळत असेल तर याचाही उल्ल्लेख तुम्हाला करावा लागणार आहे. करदाता पहिल्यांदा भरलेला रिटर्न किंवा फॉर्म आयकर विभागाच्या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकतात.

इन्कम टॅक्स रिटर्न भरत्यावेळी जर तो फॉर्म वेरीफाय केलेला नसेल तर आयकर नियमाप्रमाणे तो वैध मानला जाणार नाही. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारकार्डशी जोडलेला असला पाहिजे. तुमच्या मोबाईल वर येणार ओटीपी आयकर विभागाच्या वेबसाईटवर टाकला कि रिटर्न व्हेरिफाय होईल. या सगळ्या गोष्टींची दक्षता ITR भरताना घेतली नाही तर तुम्ही गोत्यात येऊ शकता.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x