23 February 2025 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

देशात सलग २०व्या दिवशी इंधन दरवाढ, सरकारचं दुर्लक्ष अन सामान्य राम भरोसे

Petrol and diesel price, Modi Govt

मुंबई, २६ जून : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशात आज सलग विसाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज डिझले 17 पैशांनी, तर पेट्रोल 21 पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपये झाले असून डिझेलचे दर प्रति लिटर ८०.१९ रुपये झाले आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

 

News English Summary: With petrol and diesel prices rising daily in the country, the pockets of the common man are being slashed. Today is the twentieth consecutive day of fuel price hike in the country. Today, diesel has gone up by 17 paise and petrol by 21 paise.

News English Title: Petrol and diesel price increases in India News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x