17 April 2025 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

अब की बार, त्रस्त झाले मतदार | पेट्रोल-डिझेल अजून महागले | महागाई सुद्धा वाढणार

Petrol, Diesel, More expensive, Domestic market

नवी दिल्ली, १० फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ सुरूच आहे. कोरोनाच्या संकट काळानंतर हे प्रथमच झाले. काल ब्रेन्ट क्रूड तेलाने प्रति बॅरल 61 डॉलरचा टप्पा ओलांडला. त्यामुळे देशांतर्गत बाजारात आज दोन्ही इंधन महागले. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांमध्ये 30 आणि 25 पैसे प्रतिलिटर वाढ केली. काल या इंधनात प्रति लिटर 35 ते 35 पैशांची वाढ झाली होती. दिल्लीत बुधवारी पेट्रोल प्रति लिटर 87.60 रुपये तर डिझेल 77.73 रुपयांवर गेले आहे.

या प्रकरणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत उत्तर दिलं. पेट्रोलियम प्रोडक्टच्या किंमती या आंतरराष्ट्रीय दरांवर अवलंबून आहेत. यासाठी हे दर विक्रमी स्तरावर आहेत हे म्हणणं चुकीचं ठरेल. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या दराची तुलना शेजारी राष्ट्रांमधील किंमतीशी करणंही चुकीचं असल्याचं ते म्हणाले.

नवीन वर्ष पेट्रोलियम इंधनासाठी चांगले राहिलेले नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल फक्त 14 दिवसांत महाग झाले, परंतु आता ते 03.89 रुपयांनी महाग झाले. मुंबईत पेट्रोलचे दर 94 रुपयांवर गेले आहेत, जे मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक आहे. जवळजवळ सर्व शहरांमध्ये पेट्रोल दर भडकलेले आहेत. यापूर्वी मागील वर्षाच्या उत्तरार्धातही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. जर पाहायला गेल्यास 10 महिन्यांत त्याची किंमत प्रति लिटर 18 रुपयांनी वाढली.

 

News English Summary: Crude oil prices continue to rise in the international market. This was the first time since the Corona crisis. Brent crude crossed the 61 a barrel mark yesterday. As a result, both fuels became more expensive in the domestic market today. State-owned oil companies today hiked both petrol and diesel prices by 30 and 25 paise per liter, respectively. Yesterday, the price of this fuel was increased by 35 to 35 paise per liter. In Delhi, petrol was priced at Rs 87.60 per liter and diesel at Rs 77.73 per liter on Wednesday.

News English Title: Petrol Diesel became more expensive in the domestic market today news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या