19 April 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

बुरे दिन आने वाले है | पेट्रोलची किंमत 100 रुपये पर्यंत पोहोचण्याची शक्यता

Petrol diesel, prices hike

मुंबई, १७ डिसेंबर: पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग दहाव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. थंडीची लाट आल्याने तापमान सामान्य ठेवण्यासाठी काही देशांमध्ये सेंट्रलाइज हिटिंग सिस्टम सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी इंधनाची गरज लागते. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे.

पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महागाईही वाढताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लीटर 90.34 रुपये, तर डीझेल 80.51 रुपये प्रति लीटर आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 30 टक्क्यांनी वाढ होऊन 51 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग म्हणजे 92.76 रुपये प्रति लीटरच्या दराने पेट्रोल मिळत आहे.

पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत अचानक का वाढ होतेय? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाची किंमत 9 महिन्यातील सर्वाधिक स्तरावर पोहोचली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच क्रूड ऑईलची किंमत 50 डॉलर प्रति बॅरलच्या वर आहे. अशा स्थितीत पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर डीझेलच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता नाही. पण पुढील काही दिवसांत 2 ते 4 डॉलर प्रति बॅरलपर्यंत तेलाच्या किमती कमी होण्याच अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. पण सरकारने करात सवलत दिली तर पेट्रोल आणि डीझेलच्या किमती थोड्या कमी होऊ शकतील.

 

News English Summary: Petrol and diesel prices have been steadily rising. As a result, inflation is on the rise. In Mumbai, petrol is priced at Rs 90.34 per liter and diesel at Rs 80.51 per liter on Thursday. Since the beginning of November, crude oil prices have risen 30 percent to डॉलर 51 a barrel. In Parbhani, Maharashtra, petrol is the most expensive at Rs 92.76 per liter.

New English Title: Petrol diesel prices have been steadily rising news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या