20 April 2025 7:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

मोटार सायकल ते शेतीचा ट्रॅक्टर, पेट्रोल-डिझेल दराने सर्वच हैराण...केंद्राविरोधात संताप

Petrol Diesel, Price Hike

मुंबई, २९ जून : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सलग २१ दिवस झालेल्या इंधन दरवाढीला रविवारी ब्रेक लागला. मात्र आज सोमवार उजाडताच हे दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. आज मुंबई आणि दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात ५ पैशांची, तर डिझेलच्या दरात १२ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता प्रतिलिटर पेट्रोलमागे ८७.१७ रुपये, तर प्रतिलिटर डिझेलमागे ७८.८१ रुपये मोजावे लागणार आहेत. सलग या इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

दरम्यान, ७ जूनपासून सलग होणाऱ्या इंधन दरवाढीला रविवारी ब्रेक लागला. मात्र आज सोमवारचा दिवस उजाडताच या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. देशभरात मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावलेले असतानाच दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीनेही सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज सकाळी १० ते १२ या वेळत सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते ४ जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करुन केला जाणार आहे.

 

News English Summary: The 21-day fuel price hike came to a halt on Sunday after the lockdown eased. However, the hike has resumed on Monday morning. Today, petrol and diesel are expensive in many parts of the country, including Mumbai and Delhi. In Mumbai, petrol price has been hiked by 5 paise and diesel by 12 paise.

News English Title: Petrol diesel prices have gone up in many parts of the country including Mumbai and Delhi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या