वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल | मग बसा बोंबलत - शिवसेना

मुंबई, २२ फेब्रुवारी: पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जून २०१४मध्ये जेव्हा मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं, तेव्हा कच्च्या तेलाचे दर ९३ डॉलर प्रति बॅरल होते. तेव्हा पेट्रोलचे दर ७१ रुपये आणि डिझेल ५७ रुपये प्रति लिटर होते. सात वर्षांनंतर कच्चा तेलाचे दर ३० डॉलरने कमी होऊन प्रति बॅरल ६३ डॉलर इतके झाले आहेत. तरीही पेट्रोलने शतक ठोकले आहे. याच विषयाला अनुसरून सामनामधून शिवसेनेने टीका केली असून त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील असा टोलाही लगावला आहे.
काय लिहिले आहे अग्रलेखात?
लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत!
तिकडे केंद्रातील भाजप सरकार ‘सोनार बंगला’ घडविण्यासाठी कोलकात्यात तळ ठोकून बसले आहे आणि देशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने होरपळून टाकले आहे. या महागाईवर सरकार पक्ष मूग गिळून गप्प बसला आहे. एरवी महाराष्ट्रात ऊठसूट आंदोलने करणारा भाजपनामक विरोधी पक्ष पेट्रोल-डिझेल दरवाढीवर गप्प का बसला आहे? पेट्रोल दरवाढीवर लोकांची विनोदबुद्धी अधिक तरल आणि तरतरीत झाली आहे. कोल्हापूरच्या पेट्रोलपंपावर मालकांनी एक झगमगीत फलक लावला आहे तो असा- ‘‘पेट्रोल दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत.
दर बघून छातीत कळ आल्यास मालक जबाबदार नाहीत.’’ छातीत कळ यावी असेच वातावरण आहे. पेट्रोलने शंभरी गाठली याचा उत्सव भाजपाई मंडळींनी करायला हवा, पण या ‘शंभरीपार’चे श्रेय मात्र प्रिय मोदीजी काँग्रेसला द्यायला तयार झाले आहेत. ‘‘आधीच्या सरकारांनी देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी केले असते तर मध्यमवर्गीयांवर महागाईचा भार पडला नसता’’, हे मोदी यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या बोलघेवडेपणास साष्टांग दंडवत घालावे असेच आहे. आधीच्या सरकारांनी इंडियन ऑइल, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, मुंबई हायसारखे सार्वजनिक उपक्रम सुरू केले. समुद्रातून तेलाचे साठे शोधले.
मोदी यांनी हे सर्व सार्वजनिक उपक्रम विकायला काढले व आता इंधन दरवाढीचे खापर आधीच्या सरकारांवर फोडून वैचारिक शिमगा साजरा करीत आहेत. एप्रिल 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर्स प्रतिबॅरल होते. तेव्हा पेट्रोल होते 71 रुपयांना आणि डिझेल 58 रुपयांना. आज फेब्रुवारी 2021 मध्ये क्रूड ऑइलचा दर 62 डॉलर्स प्रतिबॅरल आहे. पण आज पेट्रोलने शंभरी गाठली तर डिझेल नव्वदीच्या घरात पोहोचले. क्रूड ऑइलचे भाव पडल्याचा फायदा हिंदुस्थानी जनतेला का मिळू नये? याचे समाधानकारक उत्तर जनतेला मिळेल काय? पण या प्रश्नी जो बोलेल तो देशद्रोही. 2014 च्या आधी अक्षय कुमारपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक नायक-महानायकांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका त्यांच्या मतांतून व्यक्त केला होता.
लोकांनी आता कसे जगायचे, काय करायचे? असे प्रश्न त्यांनी समाजमाध्यमांवर एका तळमळीने विचारले होते, पण आता पेट्रोलने ‘शंभरी’ पार करूनही हे सर्व सेलिब्रिटी गप्प आहेत. यावर विरोधकांची टीकाटिपणी सुरू आहे. ते गप्प आहेत याचे कारण त्यांना गप्प बसवले आहे. याचा दुसरा सबळ अर्थ असा की, 2014 च्या आधी देशात मत व्यक्त करण्याचे, टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. सरकारी धोरणांवर टीका केली म्हणून एखाद्यास देशद्रोहाच्या कलमाखाली तुरुंगात ढकलले जात नव्हते. आज पेट्रोल-डिझेल दरवाढीवर संताप व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही आपण गमावले आहे. त्यामुळे अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांना उगाच दोष का देता? भयंकर कृषी कायद्याच्या बुलडोझरखाली भरडलेला शेतकरी आंदोलन करीत आहे.
News English Summary: Petrol-diesel prices have skyrocketed. Fuel prices have risen sharply in the last few weeks, and in some places petrol prices have gone up by hundreds. The picture is that the general public is being harassed by the rising prices of petrol and diesel. Opposition is trying to surround the Modi government on this issue.
News English Title: Petrol diesel prices have skyrocketed Saamana editorial criticised Modi govt news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल