19 April 2025 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

अजब मोदी सरकार | प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० रु

Platform ticket, prices increased, Mumbai

मुंबई, ०२ मार्च: सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील निवडक रेल्वे स्टेशवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता 10 रुपयांऐवजी 50 रुपये द्यावे लागणार आहेत. सेंट्रल रेल्वेने प्लॅटफॉर्ट तिकीटांमध्ये पाचपट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किमती वाढवण्यात आलेल्या स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST), दादर आणि लोकमान्य तिलळ टर्मिनस सामील आहेत.

याबाबत रेल्वे विभागाने सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. लवकरच येणाऱ्या समर सीजनसाठीही आमच्याकडे प्लॅन तयार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने अजब निर्णय घेतल्याने टीका सुरु झाली आहे. मध्य रेल्वेनं आता मुंबई मेट्रोपोलियन रिजन म्हणजेच MMR रिजनमधील प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत ५ पटीनं वाढवली आहे. त्यामुळे १० रुपयांना मिळणारं प्लॅटफॉर्म तिकीट आता ५० रुपयांना मिळणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी रोड स्टेशन या स्थानकांचं प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आलं आहे. पूर्वी या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये होते. या रेल्वे स्टेशनवर नेहमी गर्दी असते. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानं आणि कोविडचं संक्रमण अजूनही कमी झालेलं नाही. त्यामुळे गर्दी होणाऱ्या या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्यात आल्याचं सुतार यांनी सांगितलं.

 

News English Summary: Currently the number of corona patients in the state is increasing. As such, the railway department has taken a big decision to reduce the congestion at the railway station. Platform tickets at selected railway stations in Mumbai will now cost Rs 50 instead of Rs 10. Central Railway has increased the number of platform tickets fivefold. The stations where platform ticket prices have been increased include Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CST), Dadar and Lokmanya Tilal Terminus.

News English Title: Platform ticket prices have been increased include in Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#railway(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या