22 November 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

PM किसान सन्मान निधी योजना घोटाळा केंद्राच्या सेल्फ रजिस्ट्रेशन पर्यायामुळे झाला - तामिळनाडू सरकार

PM Kisan Samman Nidhi Scheme, 110 Crore Fraud, Due Self Registration Facility, Tamil Nadu Chief Minister Palanisamy

चेन्नई, ११ सप्टेंबर : मोदी सरकारची गरिबांना लाभ पोहोचविणारी महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील घोटाळा उघड आला आहे. या योजनेसाठी पात्र नसलेले लोक या योजनेचा लाभ घेत होते, असे स्पष्ट झाले आहे. तामिळनाडू सरकारने हा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये तब्बल ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याअंतर्गत ११० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. या प्रकरणी एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्य सचिव गगनदीपसिंह बेदी यांनी या घोटाळ्याची माहिती दिली होती. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अचानक प्रमाणापेक्षा अधिक वाढली असल्याचे ऑगस्टमध्ये लक्षात आले असे बेदी म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा तामिळनाडूतील एकूण १३ जिल्ह्यांमध्ये झाला आहे. यात कल्लाकुरीची, विल्लुपुरम, कुडलूर, तिरुवन्नमलाई, वेल्लोर, राणीपेट, सालेम, धर्मपुरी, कृष्णागिरी आणि चेंगलपेट या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी राज्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये झालेल्या करोडोंच्या घोटाळ्यासाठी केंद्र सरकार दोषी असल्याचा आरोप केला आहे. देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत तामिळनाडूमध्ये ११० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. मात्र आता हा घोटाळा नक्की कशामुळे झाला यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या योजनेमध्ये केंद्र सरकारने ‘सेल्फ रजिस्ट्रेशन’ची सोय उपलब्ध करुन दिल्याने घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्राने नुकतचं सेल्फ रजिस्ट्रेन्शन सुरु केलं. मात्र यामधून शेतकऱ्यांची सोय होण्याऐवजी फसवणूक केली जात असल्याची प्रकरणं समोर येऊ लगाली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. तामिळनाडूमध्ये या योजनेसाठी पात्र नसणारे पण तिचा लाभ घेणारे पाच लाखांहून अधिक संक्षयित लाभार्थी आढळून आले आहेत. चुकीची माहिती देऊन या लोकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समजते.

 

News English Summary: Tamil Nadu chief minister K. Palaniswami has said that the ‘self-registration facility’ provided under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM Kisan) scheme resulted in a Rs 110 crore scam in the state. The state government has unearthed nearly five lakh dubious entries of farmers on the beneficiaries’ list in the northern and western districts of the state.

News English Title: PM Kisan Samman Nidhi Scheme 110 Crore Fraud Due Self Registration Facility Says Tamil Nadu Chief Minister Palanisamy Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x