30 April 2025 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

मी कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणाऱ्या सर्व भिंती पाडतोय - पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi, Annual Convention, FICCI, Farmers Protest

नवी दिल्ली, १२ डिसेंबर: केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.

दुसरीकडे, कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावातून 1,500 हून अधिक वाहनं येणार आहेत. त्यापैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचं व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संबोधित करताना त्यांनी कृषी कायद्यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नव्या कृषी कायद्यांची स्तुती केली. कृषी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांवर भाष्य करत त्यांनी या कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं म्हटलं. कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा असो, फूड प्रोसेसिंग, साठवण्याची प्रक्रिया, कोल्ड चेन यामध्ये आपण अनेक अडथळे पाहिले. आता यांच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती हटवल्या जात आहेत. सर्व समस्या दूर केल्या जात आहेत. या सुधारणांनंतर शेतकऱ्यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होती, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा आपल्या शेतकऱ्यांनाच होणार असल्याचं मोदी म्हणाले.

 

News English Summary: The faith that the world placed on India in the last 6 years, has further strengthened in the past few months. Be it FDI or FPI, foreign investors have made record investments in India and are continuing to do that, PM Narendra Modi addresses the 93rd Annual Convention of FICCI.

News English Title: PM Narendra Modi addresses the 93rd Annual Convention of FICCI News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या