5 November 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचं महत्त्वाचं पाऊल | नव्या योजनेचं उद्घाटन

PM Narendra Modi, Transparent Taxation Honoring The Honest platform, Honour the honest taxpayers

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनापूर्वी मोदी यांनी देशातील करदात्यांना मोठी भेट दिली आहे. कर प्रणालीच्या नव्या व्यवस्थेचे आज लोकार्पण करण्यात आले असून Transparent Taxation – Honoring The Honest चा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. फेसलेस स्टेटमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टरची ही योजना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यापैकी फेसलेस स्टेटमेंट आणि टॅक्सपेयर्सची सुविधा आजपासून सुरु होणार असून फेसलेस अपीलची सुविधा 25 सप्टेंबरपासून देशवासियांच्या सेवेत येणार असल्याचे मोदी म्हणाले.

“देशातील प्रामाणिक करदाता देशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावतो. प्रामाणिक करदात्यासोबत देशाचाही विकास होत असतो. आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचं लक्षात येत आहे. चुकीचे मार्ग निवडणं योग्य नाही. ती वेळ, काळ निघून गेला आहे. देशभरात नवे बदल होत आहेत. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधानांनी ‘पारदर्शी कर व्यवस्था- ईमानदारांचा सम्मान’ प्लॅटफार्मचे उद्घाटन केले. गेल्या सहा वर्षांत आमच लक्ष्य़ सरकारी प्रणालीमध्ये महत्वाचे बदल करण्यावर राहिला आहे. आजपासून नवा प्रवास सुरु झाला आहे. देशाचा ईमानदार करदाता देशाच्या बांधणीसाठी मोठी भूमिका निभावत असतो. जेव्हा त्याचे आयुष्य सोपे होते, तेव्हा तो प्रगती करतो, यामुळे देशही प्रगती करू लागतो. आजपासून सुरु होणाऱ्या या सुविधेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी होणार असून अधिकाधिक कारभार चालविला जाणार आहे, असे मोदी म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गेल्या काही वर्षात अनेक कायदे रद्द करण्यात आले. सहज व्यवसाय करण्यामध्ये भारत आता ६३ व्या क्रमांकावर आला आहे. यामागे कऱण्यात आलेले अनेक बदल कारणीभूत आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदरांचा विश्वास वाढत आहे. करोना संकटातही रेकॉर्ड गुतंवणूक होणं याचंच उदाहरण आहे”.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi will launch a platform which will honour the honest taxpayers of the country. The unveiling will take place at 11 am today via video conferencing. The “Transparent Taxation – Honoring The Honest” platform will initiate major tax reforms aimed at bringing transparency in income tax systems and empowering taxpayers, according to the government.

News English Title: PM Narendra Modi has launch a Transparent Taxation Honoring The Honest platform which will honour the honest taxpayers of the country News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x