PMC बँक ग्राहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; सरकारमुळे चिमुकल्याने त्याचा बाबा गमावला
मुंबई: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक घोटाळ्यातील खातेदार संजय गुलाटी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. संजय गुलाटी यांच्या कुटुंबाचे तब्बल ९० लाख रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापूर्वी संजय गुलाटी यांनी स्वतःची जेट एअरवेजची नोकरी गमावली होती आणि आता आयुष्यभर कमावलेले पैसे पीएमसी बँकेत अडकल्याने आणि सरकारची जवाबदारी झटकण्याची बातमी पाहून ते मागील काही दिवसांपासून प्रचंड तणावात होते. मात्र तोच धक्का असह्य झाल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष सोमवारी संजय गुलाटी किल्ला स्वतः देखील कोर्टासमोर झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. पण दुपारी घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँकेच्या बचत खातेदारांच्या पैसे काढण्याची मर्यादा ६ महिन्यांत २५,००० रुपयांवरून ४०,००० रुपयांपर्यंत वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या ग्राहकांसाठी प्रत्येक खात्यातुन पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. केंद्रीय बँकेने पीएमसी बँकेवर २३ सप्टेंबर रोजी अनेक निर्बंध घातले. त्याच वेळी, प्रत्येक ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा ६ महिन्यांत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आरबीआय’च्या निर्णयावर कडक केली जातं आहे.
आरबीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बँकेच्या रोख स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही मर्यादा ४०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की या निर्णयानंतर पीएमसी बँकेतील सुमारे ७७ टक्के ग्राहक त्यांच्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढू शकतील.
दरम्यान, मुंबईच्या स्थानिक कोर्टाने पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवन आणि त्यांचा मुलगा सारंग आणि माजी बँकेचे अध्यक्ष वरम सिंग यांच्या पोलिस कोठडीत सोमवारी १६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. शेकडो ठेवीदार या प्रकरणाला ‘व्हाईट कॉलर गुन्हा’ म्हणत कोर्टाबाहेर निषेध करत आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी आणि त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँक प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना सोमवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today