18 January 2025 1:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा
x

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७२ कोटीची मालमत्ता ईडीकडून जप्त

PMC Bank scam, Pravin Raut, property confiscated, ED Action

मुंबई, ०१ जानेवारी : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत घमासान पाहायला मिळाले. दरम्यान PMC Bank घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची ईडीने ७२ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे.

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, PMC Bank घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीने प्रवीण राऊत यांना समन्स बजावत चौकशी केली होती. या चौकशीनंतर काही दिवसांपूर्वी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली होती. या अटकेनंतर आता ईडीने प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची संपत्ती जप्त केली.

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते.

 

News English Summary: Varsha Raut, wife of Shiv Sena Rajya Sabha MP Sanjay Raut, has been issued a notice by the Enforcement Directorate (ED). Meanwhile, Praveen Raut’s ED has seized assets worth Rs 72 crore in the PMC Bank scam. Praveen Raut, who is close to Shiv Sena MP Sanjay Raut, has been slapped by the ED.

News English Title: PMC Bank scam Pravin Raut property confiscated by ED news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x