22 November 2024 2:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सामान्यांचं जगणं महाग! गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल १४५ रुपयांनी वाढ

LPG Gas cylinder hike

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

दरवाढ किंवा घट ही महिन्याच्या १ तारखेलाच होत असते. मात्र, अचानक दरवाढ केल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत सिलेंडरचा दर ७२१.५० रुपये इतका होता. मात्र, आज तो वाढून ८६६.५० रुपये झाला आहे. पुण्यात काल ७०४ तर आज तब्बल ८४९ रुपये असा सिलेंडरचा दर आहे.

दरमहिना सबसिडी आणि बदलत जाणाऱ्या बाजार भावानुसार गॅसच्या किंमतीत बदल होत असतो. याआधी 1 जानेवारी 2020 रोजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या होत्या. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या दरामध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. सरकार दरवर्षी 12 सिलिंडरवर अनुदान देते. बजेटच्या आधी कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ झाली असून, व्यापाऱ्यांना आता व्यावसायिक सिलिंडर्ससाठी 1550.02 रुपये मोजावे लागत आहेत.

 

Web Title: Prices of non subsidized LPG Gas cylinder hike by 149 rupees.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x