22 December 2024 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

पंतप्रधानजी जनतेला लुटून मित्रांना पैसे देणं बंद करा | आत्मनिर्भर बना – राहुल गांधी

Prime Minister Modi, Stop Robbing People, Rahul Gandhi

नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर: केंद्र सरकार कोरोना फंड जमवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर अधिक टॅक्स लावण्याच्या तयारीत आहे. त्यावरून काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी एका बातमीचा स्क्रिनशाॅट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.

‘पंतप्रधानजी जनतेला लूटने सोडा, आपल्या मित्रांना पैसे देणं बंद करा, आत्मनिर्भर बना, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी केलेलं हे ट्विट काही वेळातच अनेकांनी रिट्विट आणि लाईक केलं आहे.

या अगोदर देखील सातत्याने राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवरून पंतप्रधान मोदीसह भाजपावर टीका केली आहे. बिहारमध्ये प्रचारा रॅलीत बोलताना त्यांनी आरोप केला होता की, मोदी सरकारला शेतकरी, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय यांची चिंता नाही. केवळ काही उद्योजकांसाठीच ते काम करत आहे.

अंबानी आणि अदानीसाठी मोदी मार्ग सुकर करत आहेत. तर शेतकरी, कामगार व दुकानदारांना दूर करत आहेत. येणाऱ्या काळात तुमचा सर्व पैसा देशातील दोन-तीन श्रीमंतांच्या हाती जाईल, असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

 

News English Summary: The central government is preparing to impose higher taxes on petrol-diesel to raise corona funds. As a result, Congress leader Rahul Gandhi has targeted Prime Minister Narendra Modi. Rahul Gandhi shared a screenshot of the news and targeted Prime Minister Narendra Modi. “Prime Minister, stop robbing the people, stop giving money to your friends, become self-reliant,” tweeted Rahul Gandhi. This tweet by Rahul Gandhi has been retweeted and liked by many in a short time.

News English Title: Prime Minister Stop Robbing The People Become Self Reliant Rahul Gandhi News Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x