23 February 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

मोदी सरकारकडून रेल्वेत खासगीकरण, खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले

Privatization, Indian Railways, Private sector companies

नवी दिल्ली, २ जुलै : भारतीय रेल्वेने बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. १०९ मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक १५१ रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

खाजगी कंपन्यांना रेल्वे चालवण्यास परवानगी दिल्याने नव्याने मोठ्या प्रमाणात रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. सोबतचं प्रवाशांच्या प्रवासाच्या खर्च कमी होणार आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसोबतचं त्यांना जागतिक स्तरावरील सुविधा मिळणार असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे मंत्रालयाने खाजगी कंपन्यांना रेल्वे चालवण्याची परवानगी दिली आहे.

काय आहे योजना ?
१५० अत्याधुनिक रेल्वेगाड्या यासाठी वापरण्यात येतील. यातल्या बहुतेक गाड्यांची निर्मिती भारतात झालेली आहे. प्रत्येक गाडीला किमान १६ डबे असतील. ताशी १६० किमी वेगाने धावणाऱ्या या गाड्या असतील. त्या त्या मार्गावरच्या सर्वांत वेगवान गाडीच्या तुलनेतच या खासगी गाड्यांचा वेग अधिक असेल. या सर्व खासगी रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेच्या म्हणजे सरकारी लोको पायलट आणि गार्ड्सकडूनच चालवण्यात येतील.

या गाड्यांच्या निर्मितीपासून, देखभाल आदी सेवा पूर्णपणे Make in India अर्थात भारतीय बनावटीच्या असतील. या गाड्यांच्या निर्मितीचा खर्च, दररोजचा खर्च आणि इतर खर्च खासगी संस्था करेल आणि प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि वेगवान प्रवासाची सुविधा निर्माण करणे हा उद्देश यामागे आहे, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

अटी आणि शर्थी:
रेल्वे गाडीतील वातानुकूलित डबे हे मेक इन इंडिया असले पाहिजे.
रेल्वे 35 वर्षांसाठी हा प्रोजेक्ट खाजगी कंपन्यांना देईल.
रेल्वे विभागाकडून या प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी ड्रायव्हर आणि गार्ड देण्यात येतील.
इतर सर्व व्यवस्था खाजगी कंपन्यांना करावी लागेल. यामध्ये रेल्वे इंजिन देखभाल, दुरुस्ती यांचा समावेश असेल.

 

News English Summary: Railways is preparing to start private services on 109 routes. The Railways plans to run 151 modern trains running on both sides of the line on a private basis. Applications have been invited from private sector companies.

News English Title: Privatization in Indian Railways has invited applications from private sector companies News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x