23 February 2025 8:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Alert | १५, १६ मार्चला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप | खाजगीकरणाला विरोध

Bank Privatisation, Union Strikes

मुंबई, १३ मार्च: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी राज्यातील पन्नास हजारांहून अधिक बँक कर्मचारी तसेच अधिकारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. या क्षेत्रातील नऊ कामगार संघटनांनी येत्या १५ आणि १६ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. तत्पूर्वी १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवारी आणि नंतर सोमवार, मंगळवार संपामुळे सलग चार दिवस सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. (Bank employees and officials in the state will go on a two-day strike to strongly oppose the privatisation of public sector banks)

याबाबत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर प्रसार माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्यात आले तर त्यातून मूठभर मोठ्या उद्योगांचा फायदा होईल. परंतु, सामान्य माणूस बँकिंगच्या वर्तुळाबाहेर फेकला जाईल.

दरम्यान, या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ बँक ऑफिसर्स, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

News English Summary: More than 50,000 bank employees and officials in the state will go on a two-day strike to strongly oppose the privatisation of public sector banks. Nine trade unions in the region have called for a nationwide strike on March 15 and 16. Prior to this, the second Saturday on March 13, Sunday on March 14 and then Monday and Tuesday strikes are likely to bring government banks to a standstill for four consecutive days.

News English Title: Public banks privatisation strike called on 15 and 16 March news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x