22 November 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Mhada Lottery | पुणे विभागातील म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल पाहा Live

Pune Mhada lottery 2021, Result Announce, check winners

पुणे, २१ जानेवारी: म्हाडाच्या पुणे विभागाच्या 5647 घरांसाठी आज सोडत जाहीर केली जाणार आहे. यामध्ये अनेकांची पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घरांचा समावेश आहे. दरम्यान यंदा देखील ही लॉटरी सोडत अर्जदारांना ऑनलाईन पाहता येणार आहे. नेहरू मेमोरियल हॉलमध्ये या म्हाडा घरांच्या लॉटरीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक अर्जदारांनी त्याच वेबकास्टिंग पहावं असं आवाहन करण्यात आले आहे. भाग्यवान विजेत्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची सोय यंदा देखील उपलब्ध असेल. सोबतच ज्यांना या सोडतीमध्ये घर लागणार आहे त्यांना ई मेल, एसएमएस या द्वारा माहिती मिळणार आहे. (Pune Mhada lottery 2021 result to announce check winners list online)

म्हाडा लॉटरी उद्घाटन समारंभ आज सकाळी 9.30 वाजता सुरू झाला. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन लॉटरी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावरही निकाल पाहण्याची सुविधा असणार आहे. नागरिकांनी कोरोना संकटाचं भान ठेवत यंदा ऑफलाईन निकालाच्या ठिकाणी गर्दी करण्याऐवजी ऑनलाईन निकाल पहावा असं आवाहन करण्यात आले आहे.

निकाल कुठे पहाल?

  • म्हाडा लॉटरीचा पुणे विभागातील निकाल युट्युबवर येथे पाहू शकाल: http://bit.ly/PuneLottery2021
  • तर या संकेतस्थळावर उद्या सायंकाळी सहा वाजल्यानंतर निकालाची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. lottery.mhada.gov.in

पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉटरी मध्ये यंदा 90 हजार अर्ज आले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5217 घरं आहेत. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ‘म्हाडा’कडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत ही घरं नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

 

News English Summary: The release for 5647 houses in MHADA’s Pune division will be announced tomorrow. This includes many houses in Pune, Solapur, Sangli and Kolhapur districts. Meanwhile, this year too, applicants leaving the lottery will be able to view it online. The lottery results of these MHADA houses will be announced online at the Nehru Memorial Hall. More and more applicants are urged to watch the same webcasting to avoid the crowds at this place. The lucky winners will also be able to view the results at home this year. At the same time, those who are going to get a house in this lottery will get information through e-mail, SMS.

News English Title: Pune Mhada lottery 2021 result to announce check winners list online news updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x