25 November 2024 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

दिवाळखोरी आरकॉमची, फटका संरक्षण विषयक राफेल प्रकल्पाला?

नागपूर : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपमधील आरकॉमने काही दिवसांपूर्वी स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्यासाठी कायदेशीर अर्ज केल्याने, त्यांच्या दुसऱ्या कंपनीच्या संबंधित नागपूरमधील राफेल लढाऊ विमानांसंबंधित ऑफसेट प्रकल्प रखडण्याची चर्चा आहे. Rcom कडून दिवाळखोरीचा अर्ज केल्यानंतर, मागील ३ दिवसांत रिलायन्स एडीएजीच्या ४ प्रमुख कंपन्यांचे शेअर्स तब्बल २० ते ५० टक्क्याने कोसळले.

आरकॉमचा शेअर तब्बल ५० टक्क्यांनी खाली कोसळले आणि ५.५० रुपयांवर आला, तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा तब्बल ३२ टक्क्यांनी घटून १५३ वर आला. रिलायन्स पॉवरमध्ये तब्बल ३० टक्के घट, रिलायन्स कॅपिटलमध्ये २० टक्के घट झाली. समूहाच्या या ४ कंपन्यांकडे एकूण १,५०,००० कोटी कर्ज थकीत आहे. त्यापैकी आरकॉमकडे ४६,००० कोटी, रिलायन्स पॉवरकडे ३३,००० कोटी, रिलायन्स कॅपिटलकडे ३९,००० कोटी आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे २७,००० कोटी कर्ज अजून थकीत आहे. दरम्यान संबंधित कंपन्यांचा राखीव निधी ८२,००० कोटी, गुंतवणूक ५०,००० कोटी आणि इतर मालमत्ता १२,००० कोटी मिळून एकूण मालमत्ता मूल्य १,४०,००० कोटींच्या घरात आहे. तसेच समूहाचा एकूण नफा १८० कोटींचा असल्याने समूहाकडे ८,००० कोटी कर्ज थकीत राहण्याची शक्यता आहे.

रिलायन्सने फ्रान्सस्थित द सॉल्ट एव्हिएशनच्या भागीदारीत राफेल लढाऊ विमानाचे ५० टक्के सुटे भाग भारतात बनविण्याचे कंत्राट मिळाले आहे. नागपूरच्या मिहान-SEZ मध्ये सदर प्रकल्प आहे. दरम्यान भविष्यात इंजिन सोडून राफेल विमानाचे सुटे भाग नागपूरला तयार होतील आणि जोडणी इथेच होईल, असे मिहान-SEZ चे मुख्य अभियंता एस. व्ही. चहांदे यांनी सांगितले.

दरम्यान राफेलच्या ऑफसेट कंत्राटसाठी ३०,००० कोटींचे सुटे भाग तयार करण्याचे लक्ष आहे, त्यासाठी कंपनीला किमान ५,००० कोटी उभे करणे गरजेचे आहे. परंतु, आवश्यक असलेले ५,००० कोटी आणणार कोठून हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x