23 February 2025 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मोदींचा कैश लेस भारत | खरं तर कामगार-शेतकरी-छोटे व्यापारी मुक्त भारत आहे - राहुल गांधी

Rahul Gandhi, PM Narendra Modi Govt, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं घेतलेल्या निर्णयांवरून हल्लाबोल सुरू केला आहे. जीडीपीची ऐतिहासिक घसरण, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवत राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ सुरू केली असून, दुसऱ्या भागात पंतप्रधान मोदी यांच्यावर नोटबंदीच्या निर्णयावरून टीकेची तोफ डागली आहे.

“मोदीजींचा कॅशमुक्त भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी हा फासा टाकण्यात आला होता, त्याचा भयंकर परिणाम 31 ऑगस्ट 2020 रोजी समोर आला आहे. जीडीपी घसरण्याबरोबरच नोटबंदीनं देशाची असंघटीत अर्थव्यवस्था तोडली” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच “500-1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. संपूर्ण भारत बँकांसमोर जाऊन रांगेत उभा राहिला. काळा पैसा नष्ट झाला का?, भारतातील गरीब जनतेला नोटबंदीमुळे कोणता फायदा झाला? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर नाही.”

 

News English Summary: Continuing his criticism of demonetization, Congress leader Rahul Gandhi on Thursday said that Prime Minister Narendra Modi government’s ‘notebandi’ was actually an attack on “India’s poor, farmers, labour and small businessmen”. It was also an attack on India’s unorganized economy, Rahul Gandhi said in the second part of his video series on Indian economy.

News English Title: Rahul Gandhi Attacks Narendra Modi Govt Note Ban Marathi News LIVE Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x