कोल्हापूरातील दि सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना आरबीआय'कडून रद्द

कोल्हापूर, २५ डिसेंबर: ठेवीदारांच्या हिताला बाधा येण्याचा धोका आणि बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूरातील दि सुभद्रा लोकल एरिया बँकेचा रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केला आहे. पण दुसरीकडे ठेवीदारांनी हावालदिल होवू नये ठेवी परत करण्या इतपत बँकेची आर्थिक परिस्थिती असल्याचं देखील रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात म्हटलंय. त्यामुळे बँकेच्या ठेवीदाराना एका अर्थाने दिलासा मिळाला आहे.
दि सुभद्रा लोकल एरिया बँकेला 10 जुलै 2003 रोजी बँकिंग परवाना मिळाला होता..सुरुवातीला ही बँक कोल्हापूर जिल्हा मर्यादित होती, नंतर मात्र या बँकेचा कार्यविस्तार सातारा, सांगली, बेळगाव आणि पुण्या मध्ये वाढला. मात्र अनेक शाखा मधील काम हळू हळू कमी होवू लागलं आहे. त्यामुळे सद्याच बँकेचे कामकाज हे भविष्यात ठेवीदारांच्या हितास हानिकारक ठरेल आणि त्यातून ठेवीदारांच मोठं नुकसान होईल असा निष्कर्ष रिझर्व्ह बँकेने काढला.
या बँकेच्या कोल्हापूर, सांगलीत एकूण 13 शाखा आहेत. शिवाय सातारा आणि बेळगावमध्येही बँकेच्या शाखा असल्याने या मालमत्ता विकून ठेवीदारांना त्यांची जमा पुंजी दिली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.
आरबीआयने मुंबईतील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बंकेचा परवानाही रद्द केला होता. मात्र, आरबीआयने 1,32,170 ठेवीदारांना 99.2 टक्के रक्कम डीआयसीजीसीद्वारे देण्याचा निर्णय घेतला होता. तोच निर्णय सुभद्रा बँकेच्या ठेवीदारांसाठी घेतल्यास या ग्राहकांनाही त्यांची जमा पुंजी मिळेल. अथवा रिझर्व्ह बँकेचे पुढील आदेश येईपर्यंत ही रक्कम गोठवली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं. या ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी आणखी एक पर्याय सांगितला जातो, तो म्हणजे या बँकेचे दुसऱ्या एखाद्या बँकेत विलिनिकरण केल्यास ग्राहकांना त्यांची जमा रक्कम मिळू शकते. अर्थात आरबीआयच्या पुढील निर्णयावरच या गोष्टी अवलंबून असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
News English Summary: The Reserve Bank of India (RBI) has revoked the banking license of The Subhadra Local Area Bank in Kolhapur on the ground of risk to the interests of depositors and violation of banking rules. On the other hand, the RBI has said in its order that the bank is in a financial position to return the deposits so that the depositors do not have to worry. This has brought some relief to the bank depositors.
News English Title: RBI cancel license of Kolhapur based Subhadra local area bank news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल