23 February 2025 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

RBI आपत्कालीन फंड | रिझर्व्ह बँक केंद्राला त्यांच्या खजिन्यातून 99,122 कोटी देणार

ReReserve Bank of India

मुंबई, २१ मे | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केंद्र सरकारकडे 99,122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 मे 2021 रोजी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या अलीकडील धोरणात्मक उपायांचा मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

ही रक्कम जुलै 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतच्या नऊ महिन्यांसाठी आहे. मंडळाने असे ठरवले आहे की, रिझर्व्ह बॅंकेमध्ये आपातकालीन जोखीम बफर 5.50 % टक्के राहील. जालान समितीच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँकेच्या खात्याचा 5.5 ते 6.5 टक्के हिस्सा आपातकालीन निधी म्हणून ठेवावा.

आरबीआयकडेही एमर्जन्सी फंड असतो. मॉनिटरी पॉलिसी आणि एक्सचेंज रेटला मॅनेज करताना अचानक आलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या फंडाचा वापर करतात. 2017-18मध्ये सीएफ फंड 2.32 कोटी होता. हा फंड आरबीआयच्या एकूण अॅसेट्सच्या 6.4 टक्के इतका होता. 2013-14 पासून तीन वर्ष आरबीआयने सीएफमध्ये एकही पैसा ठेवला नव्हता. आरबीआयकडे अधिक ‘बफर’ (आर्थिक पुंजी) असल्याने सीएफमध्ये पैसा ठेवण्यात आला नव्हता, असं टेक्निकल कमिटीचं म्हणणं आहे.

 

News English Summary: The Reserve Bank of India (RBI) has decided to transfer an additional amount of Rs 99,122 crore to the central government. The decision was taken at a meeting of the Central Board of Directors of the Reserve Bank on May 21, 2021. The Board reviewed the current economic situation, global and domestic challenges, and recent policy measures taken by the Reserve Bank of India to mitigate the impact of the second wave of Covid-19 on the economy.

News English Title: RBI has decided to transfer an additional amount of 99 122 crore to the central government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x