RBI आणि World Bank'चा अंदाज जवळपास सारखा | भारताचा GDP ९.५ टक्क्यांनी घसरणार
मुंबई, ९ ऑक्टोबर : आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही दास म्हणाले. तसंच आगामी काळातही महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून करोना महासाथीच्या संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेची बैठक २८ सप्टेंबर रोजी पार पडणार होती. परंतु गणसंख्येअभावी ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतेही बदल केले नाही. रेपो दर चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले असल्यानं व्याजदरातही कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. याव्यतिरिक्त रिव्हर्स रेपो दरातही बदल करण्यात आलेले नाहीत. तसंच डिसेंबर २०२० पासून ग्राहकांना कोणत्याही वेळी आरटीजीएस सुविधेचाही वापर करता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली.
Our assessment is that inflation will remain elevated in September but ease gradually towards the target over Q3 & Q4. Our analysis also suggests that supply disruptions & associated margins and markups are the major factors driving up inflation: Shaktikanta Das, RBI Governor pic.twitter.com/CtSbZrE8hI
— ANI (@ANI) October 9, 2020
दुसरीकडे चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ९.६ टक्के दराने घसरण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. कोविडच्या जागतिक साथीमुळे परिस्थिती गंभीर असून, १९८० आणि १९९१ मधील भारताच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा यंदा वाईट अवस्था असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दक्षिण आशियाला या साथीमुळे मोठ्या मंदीचा सामना करावा लागत असून, येथील अर्थव्यवस्था ७.७ टक्के दराने कमी होणार असल्याचे जागतिक बँकेने आपल्या अर्धवार्षिक अहवालामध्ये स्पष्ट केले आहे.
१९९१मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली होती. देशावरील कर्जाचे हप्प्ते चुकवण्यासाठी सरकारला सोने तारण ठेवून कर्जाऊ रक्कम उभारण्याची वेळ आली होती. यंदाची स्थिती त्यापेक्षा गंभीर असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. फिच या पतमापन संस्थेने अर्थव्यवस्था १०.५ टक्के घटण्याची शक्यता वर्तविली.
News English Summary: The Reserve Bank of India governor Shaktikanta Das announced on Friday that the repo rate and reverse repo rate will remain unchanged. “The deep contraction of quarter one is behind us, the silver lining in visible,” the governor said while announcing the policy decisions of the Monetary Policy Committee. “The mood of the nation has shifted from fear to hope,” Das said. Commenting on the recovery of several sectors, the governor said it will be a three-speed recovery with individual sectors showing different trajectories. “Real GDP in 2021 is likely to decline by 9.5 per cent but speedy rebound is anticipated,” Das added.
News English Title: RBI Monthly Monetary Policy Address By RBI Governor Shaktikanta Das No Changes In Repo Reverse REPO Rate Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News