Alert! नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार | आरबीआयची माहिती
मुंबई, ५ ऑक्टोबर : नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का ? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. आता रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण नोटांनी देखील होऊ शकते. नोटांचा व्यवहार केल्याने कोरोना संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटलंय. नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयने याला दुजोरा दिलाय.
चलनातील नोटा या बॅक्टेरीया आणि वायरसच्या वाहक आहेत का ? असा प्रश्न CAIT ने ९ मार्चला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना केला होता. सरकारकडून आरबीआयला यासंदर्भातील एक पत्र गेलंय. आणि ३ ऑक्टोबरला यासंदर्भात उत्तर देण्यात आलंय. ईमेलच्या माध्यमातून दिलेल्या या उत्तरात नोटा या बॅक्टेरीया आणि वायरसच्या वाहक असू शकतात असं म्हटलं गेलंय.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, लोक मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड इत्यादी विविध ऑनलाइन डिजिटल चॅनेलद्वारे घरी बसून पैशांची देवाण घेवाण करू शकतात. यामुळे नोटांचा वापर करणे किंवा एटीएममधून पैसे काढणे टाळता येऊ शकते. या व्यतिरिक्त कोरोनावर वेळोवेळी जाहीर केलेल्या सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे ३ ऑक्टोबर २०२० रोजी सीआयआयटीला पाठविलेल्या उत्तरात आरबीआयने म्हटले आहे.
दरम्यान, आरबीआयने लोकांनी जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे, असे सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. तसेच, डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी आकारण्यात आलेला बँक शुल्क माफ करावे आणि सरकारने बँकांच्या शुल्काविरूद्ध बँकांना थेट अनुदान द्यावे. ही अनुदान सरकारवर आर्थिक भार टाकणार नाही, तर ते नोटांच्या छपाईवर असेल. यामुळे खर्च कमी करेल, असे निवेदनात म्हटले आहे.
News English Summary: The Reserve Bank of India (RBI) has said that currency notes are potential carriers of coronavirus COVID-19 and said that incentives must be announced by the government to encourage digital payments, as per the Confederation of All India Traders (CAIT). On March 9, 2020, CAIT had written a letter to Union Finance Minister Nirmala Sithraman seeking clarification whether or not currency notes are carriers of bacteria and viruses.
News English Title: RBI said that currency notes are potential carriers of coronavirus COVID 19 Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या