16 January 2025 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 8'व्या वेतन आयोगाला मंजुरी, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होणार पहा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE SBI Bank Alert | एसबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट, अन्यथा खात्यातील बॅलेन्स शून्य होऊ शकतो, बातमी वाचा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी .
x

अच्छे दिन! नाणार रिफायनरी संबंधित सौदी कंपनी अरॅमकोची रिलायंसमध्ये मोठी परकीय गुंतवणूक

saudi aramco, Nanar Refinery, Reliance Industries, RIL

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहात आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली. रिलासन्स उद्योग २०१८-१९ आर्थिक वर्षात सर्वाधिक नफा कमावणारी समूह असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. सौदी अराम्को रिलायन्समधील 20 टक्के शेअर्स खरेदी करणार असल्याची माहिती अंबानी यांनी दिली. आज रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.

रिलायन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक झाल्याचं मुकेश अंबानी म्हणाले. सौदी अराम्को रिलायन्सच्या ऑईल आणि केमिकल (ओ टू सी) व्यवसायात गुंतवणूक करणार आहे. अराम्कोकडून रिलायन्समध्ये 5.25 लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल. ‘रिलायन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे. सौदी अराम्को आणि रिलायन्समध्ये बऱ्याच कालावधीपासून यासाठी चर्चा सुरू होती,’ असं अंबानी म्हणाले.

रिलायन्सच्या ऑईल टू केमिकल व्यवसायचं महसुली उत्पन्न ५ लाख कोटी रुपये आहे. सौदी अराम्को रिलायन्सच्या ऑईल टू केमिकल व्यवसायात गुंतवणूक करेल. सौदी अराम्को जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. रिलायन्समधील २० टक्के शेअर्स खरेदी केल्यावर अराम्को दर दिवसाला ५ लाख बॅरल तेलाचा पुरवठा कंपनीला करेल. गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. हा जगातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असून त्याची क्षमता १४ लाख बॅरल इतकी आहे.

सौदी अरॅमकोशी तेलाच्या क्षेत्रात रिलायन्सची भागीदारी झाल्याची माहिती अंबानी यांनी यावेळी दिली. सौदी अरॅमको कंपनी रिलायन्समध्ये २० टक्के गुंतवणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. साऊदी अरॅमको रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. इंजनाचा दर्जा सुधरण्यासाठी आणि त्याची लाइफ वाढवण्यासाठी कंपनी ‘ऑयल टू केमिकल’ व्यावसायाच्या माध्यमातून ऑयलपासून सर्वोत्कृष्ट प्रॉडक्ट तयार करत आहे. कंपनी या व्यावसायापासून २.२ लाख करोड रूपयांची निर्यात करत आहे.

रत्नागिरीतील नाणार प्रकल्प गुजरातला जाणार म्हणत हवा केली, मात्र निसर्गाला हानिकारक असे विनाशकारी प्रकल्प गुजरात सरकार स्वीकारणार नाही हे आधीच ठाऊक होते आणि संबधित सौदी कंपनीला प्रकल्प उभारणीचा खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी कोकणातील जागाच हवी होती. मध्यंतरी या निमीत्ताने मोदींच्या सौदीमधील नेत्यांशी भेटीगाठी झाल्या होत्या, तर सौदी सरकारने मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार देखील दिला होता. दरम्यान हा प्रकल्प सौदी सरकारसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि भारत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वकाही करत आहे. त्यात महाराष्ट्रातील सत्तेत बसलेले मंत्री हे दिल्लीतील गुजराती भाजप नेत्यांची बुजगावणी असल्याने तो प्रकल्प येथेच लादला जाणार हे तितकंच सत्य आहे.

स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात हलवण्यात आला आहे. त्यामुळे आता रायगडमधून या प्रकल्पाला विरोध होऊ नये यासाठी भाजपनेत्यांनी वेळीच सावध पाऊलं उचलली होती. कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रकल्पाबाबत चर्चा केली आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे मागील काही वर्षात नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प चांगलाच वादात अडकला होता. परंतु आता हा प्रकल्प नाणार येथून हलवला असून रायगड जिल्ह्यात उभारला जाणार आहे. त्यामुळे आता तरी प्रकल्पात काही अडचणी येऊ नयेत म्हणून पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. या भेटी वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीच्या आजच्या वार्षिक बैठकीत सभासदांना संबोधित करताना नाणार रिफायनरी संबंधित सौदी कंपनी अरॅमकोची रिलायंसमध्ये मोठी परकीय गुंतवणूक होण्याची घोषणा केली. त्यामुळे मोदींच्या देशाला जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याची घोषणा म्हणजे तीच अर्थव्यवस्था मोजक्याच उद्योगपतींच्या हातातलं बाहुलं बनवण्यासाठी तर नाही ना, अशी शंका निर्माण होते आहे.

 

Web Title: Reliance industries announced biggest fdi deal with saudi aramco pick 20 percent stake its otc.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x