23 February 2025 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुकेश अंबानी जगभरातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती

Reliance industries, Jio Plarform, Mukesh Ambani, Google, Facebook

नवी दिल्ली, १४ जुलै : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी जगभरातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकत त्यांनी हे स्थान कमावले आहे. मुकेश अंबानी यांनी टेस्लाच्या एलन मस्क यांना देखील मागे टाकले आहे.ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या मते, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता ७२.४ अब्ज डॉलर झाली आहे. याआधी मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात मोठे गुंतावणूकदार आणि हाथवे बर्कशायरचे वारेन बफे यांची जागा घेतली होती, जे की आठव्या स्थानावर होते. जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आशिया खंडातील असणारे मुकेश अंबानी हे एकमेव व्यक्ती आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांच्या संपत्तीत वाढ होण्यामागील कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल शेअर्स प्राइस) समभागांमध्ये सतत वाढ होणे. मार्चपासून RILचे शेअर्स दुपटीने वाढले आहेत. वास्तविक, नुकतीच रिलायन्सची तंत्रज्ञान शाखा जिओ प्लॅटफॉर्मने फेसबुकसह अनेक जागतिक कंपन्यांशी करार करण्याची घोषणा केली आहे. तेव्हापासून RILच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तीन महिन्यांत 12 परदेशी कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स, व्हिस्टा, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडाला, सिल्व्हर लेक, एडीआयए, टीपीजी, एल कॅटरटन, पीआयएफ यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्मच्या भागभांडवलातून 117,588.45 कोटी रुपये जमा केले आहेत. RILला आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्ममधील 25.09 टक्के भागीदारीसाठी गुंतवणूक मिळाली आहे.

 

News English Summary: Mukesh Ambani, chairman and managing director of Reliance Industries Ltd, has become the sixth richest person in the world. He has surpassed Google co-founder Larry Page to earn this position.

News English Title: Reliance industries chairman Mukesh Ambani become sixth richest person in the world News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JIO(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x