16 April 2025 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER
x

शेतकरी आंदोलन | Jio चा इतर टेलिकॉम कंपन्यांसोबत वाद पेटला

Reliance Jio, farmers Protest, Airtel, Vodafone idea

मुंबई, १६ डिसेंबर: रिलायन्स जिओ इंफोकॉमने (Reliance Jio Network) एयरटेल (Airtel Network) आणि वोडाफोन-आयडियावर (VI) खोट्या बातम्या पसरवण्याचे आरोप केले आहेत. कंपनीने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (TRAI) कडक कारवाईची मागणी केली आहे. जिओचा असा आरोप आहे की, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाने शेतकरी आंदोलनादरम्यान अनैतिकरित्या अशा अफवा पसरवल्या की, नव्या कृषी कायद्यामुळे जिओला फायदा होणार आहे. Reliance Jio accuses Airtel Vodafone idea for wrongful campaign through farmers protest.

नंबर पोर्ट रिक्वेस्टमधील वाढीसाठी एयरटेल आणि VI ला जबाबदार ठरवलं:
Jio ने सांगितलं की, या कंपन्या सतत अशा प्रकारच्या खोट्या आणि शुल्लक अफवांना सातत्याने, अप्रत्यक्षरित्या समर्थन देत आहेत की, रिलायन्सला कृषी कायद्याचा फायदा होईल. Jio ने या अफवा कँपेनला, मोठ्या संख्येत नंबर पोर्ट रिक्वेस्टसाठीही जबाबदार ठरवलं आहे.

रिलायन्स जिओ ने आपल्या आरोपात म्हटले की, ग्राहक आपला नंबर पोर्ट करण्यावेळी या कँपेनचा संदर्भ देत आहेत. या कारणाशिवाय ग्राहकांनी त्यांना Jio कडून कोणत्याही सर्व्हिस संबंधी समस्या नसल्याचं सांगितल्याचं, जिओने म्हटलं आहे. या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना, एजन्ट्ंसना आणि रिटेलर्स द्वारे रिलायन्स जिओ विरुद्ध नकारात्मक मोहिम चालवत आहेत. त्यामुळे जिओला नुकसान होत आहे. ग्राहकांना चुकीची माहिती सांगून त्यांना पोर्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू करीत असल्याची माहिती आहे, असेही जिओने आपल्या पत्रात म्हटले आहे. या सर्व प्रयत्नाचा जिओने विरोध केला आहे. या दोन्ही कंपन्या ग्राहकांना कशा पद्धतीने चुकीची माहिती देत आहेत यासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडिओचे पुरावे रिलायन्स जिओ ट्रायला देणार आहे.

 

News English Summary: Reliance Jio Infocom has accused Airtel Network and Vodafone-Idea (VI) of spreading false news. The company has demanded strict action from the Telecom Regulatory Authority of India (TRAI). Geo alleges that Airtel and Vodafone-Idea unethically spread rumors during the farmers’ movement that the new agricultural law would benefit Geo.

News English Title: Reliance Jio accuses Airtel Vodafone idea for wrongful campaign through farmers protest news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या