11 March 2025 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर सलग 6 दिवस तेजीत, या अपडेटचा परिणाम, किती परतावा मिळणार - NSE: SUZLON IREDA Share Price | शेअर घसरला, पण पुढे 70 टक्के परतावा मिळेल, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IREDA Vedanta Share Price | एमके ग्लोबल ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: VEDL TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, संयम देईल मोठा नफा, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स फोकसमध्ये, स्टॉक प्राईस पुन्हा हा टप्पा ओलांडणार - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 67 रुपये टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्स साठी BUY रेटिंग - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर घसरतोय, पण तज्ज्ञांना विश्वास, काय आहे पुढची टार्गेट प्राईस पहा - NSE: RPOWER
x

डिजीटल शिक्षण, रिलायन्सकडून Jio Glass सेवा लाँच

Reliance Jio, Jio Glass, 3d Interactions Holographic

मुंबई, 15 जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.

गुगलने एकूण 33,737 कोटी रुपये JIO प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणार असल्याचं मान्य केलं आहे, असं अंबानी म्हणाले. त्यांची ही गुंतवणूक फक्त आर्थिकच नव्हे तर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट असेल. Facebook, Intel, Qualcomm आणि Google या 4 मोठ्या भागिदारांखेरीज एकूण 14 गुंतवणूकदार जिओमध्ये असतील. त्यातले 6 तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातले गुंतवणूकदार आहेत तर 3 sovereign funds आहेत. अशा 14 गुंतवणूकदारांसह Jio ने 1,52,056 कोटींचा निधी उभा केला आहे, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज जिओ ग्लास सेवेची घोषणा करण्यात आली. जिओ ग्लास ही थ्रीडी इंटरॅक्शन सेवा असणार असून यामध्ये संवाद साधणाऱ्या व्यक्तीची हॉलोग्राम प्रतिकृती पाहता येणार आहे. प्रमुख्याने डिजीटल शिक्षणाचे ध्येय समोर ठेऊन जिओ ग्लास लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.

रिलायन्सच्या किरण थॉमस यांनी जीओ ग्लासची घोषणा केली. “जिओ ग्लासमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना व्ह्यर्चूअल थ्रीडी क्लास रुमच्या माध्यमातून संवाद साधता येईल. या माध्यमातून हॉलोग्राफीक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण घेता येईल. यासाठी जिओने रिअ‍ॅलिटी क्लाउडचे तंत्रज्ञान वापरुन रियल टाइम टेलिकास्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. जिओ ग्लासेसमुळे पुस्तकातून भूगोल शिकणं इतिहास जमा होणार असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव हॉलोग्रामच्या माध्यमातून घेता येईल,” असं थॉमस म्हणाले.

 

News English Summary: The Jio Glass service was announced today at Reliance Industries’ annual general meeting. Jio Glass will be a 3D interaction service that will feature a hologram replica of the person communicating.

News English Title: Reliance Jio Announces New Jio Glass For 3d Interactions Holographic Content News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JIO(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x