5 November 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

स्वातंत्र्यदिनी सुद्धा? | भारतीयांनो, मोदींनी २०१९ पासूनची जुनी घोषणा नामकरण करत पुन्हा २०२१ मध्ये चिकटवली - पोलखोल

Gatishakti Yojna

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट | 75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’

जुन्या घोषणेचं ‘गतीशक्ती राष्ट्रीय योजना’ असं नामकरण करत पुन्हा तेच 100 लाख कोटी जाहीर केले:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात गतीशक्ती राष्ट्रीय योजनेची (Gatishakti Yojna) घोषणा केली. मोदी सरकारने या योजनेसाठी 100 लाख कोटींची तरतूद केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरात पायाभूत सुविधांच्या विकासासोबत मोठ्याप्रमाणावर रोजगारही उपलब्ध होतील.

आधुनिकीकरणासाठी भारताला पायाभूत सुविधांची निर्मिती करुन सर्वांगणी विकास साधता आला पाहिजे. यामध्ये गतीशक्ती योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मोदींनी सांगितले. देशातील पायाभूत सुविधा या आणखी बळकट केल्या पाहिजेत. दळणवळणासाठी गतीशक्ती ही खास योजना असेल. जेणेकरून सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

वास्तविक हीच पायाभूत सुविधांसंबंधित 100 लाख कोटीची घोषणा मोदीं १५ ऑगस्ट २०१९ मध्ये जाहीर केली होती. ती जाहीर होऊन आज दुसरं वर्ष उजाडलं आहे. काय होती तो घोषणा जी प्रसार माध्यमांनी देखील उचलून धरली होती. (ट्विटची तारीख पाहावी)

त्यानंतर आज म्हणजे १५ ऑगस्ट २०२१ मध्ये मोदींनी तीच पायाभूत सुविधांसंबंधित 100 लाख कोटीची घोषणा मोदींनी ‘गतीशक्ती राष्ट्रीय योजना’ असं नामकरण करत नव्याने जाहीर करत एक प्रकारे देशवासियांना प्रभावित करण्याच्या प्रयत्न केला आहे का अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. (या ट्विटची तारीख पाहावी)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Renaming and announcement of old provision as Gatishakti Yojna from red fort news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x