6 January 2025 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट लाँच होणार | 1 जूनपासून इनकम टॅक्स ई-फाइलिंगमध्ये होणार मोठे बदल

income tax efiling

मुंबई, २८ मे | इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. ७ जून रोजी इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट लाँच होणार आहे. त्यामुळे १ ते ६ जूनदरम्यान, करदात्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या जुन्या वेबसाईटचा वापर करता येणार नाही. या सहा दिवसांच्या काळात वेबसाईटमध्ये बदलांची प्रक्रिया सुरू राहील. नवी वेबसाईट आल्यानंतर आयटीआर दाखल करण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. नव्या साईटमध्ये अॅडव्हान्स फिचर्स असतील. त्यामुळे आयटीआर फाईल करणे सोपे होईल.

एक जूनपासून देशभरात अनेक बदल होणार आहेत. याचा थेट परीणाम तुमच्या पॉकेट आणि आयुष्यावर होईल. यासाठी तुमच्याकडे नियमांची माहिती पहिल्यापासूनच ठेवणे आवश्यक आहे. 1 जूनपासून बँक ऑफ बडोदामध्ये चेकने पेमेंट करण्याची पध्दत बदलणार आहे. आम्ही तुम्हाला अशा 5 बदलांविषयी सांगणार आहोत ज्याचा थेट तुमच्यावर परीणाम होईल.

1 जूनपासून बंद असणार इनकम टॅक्स ई-फायलिंगची साइट:
1 ते 6 जूनपर्यंत इनकम टॅक्स डिपार्टमेंचे ई-फाइलिंग पोर्टल काम करणारर नाही. तर 7 जूनला इनकम टॅक्स डिपार्टमेंट टॅक्सपेयर्ससाठी इनकम टॅक्स ई-फायलिंगचे नवीन पोर्टल लॉन्च करेल. आयर निर्देशालयानुसार ITR भरण्याच्या जास्तीत जास्त वेबसाइट 7 जून 2021 पासून बदलतील. 7 जूनपासून हे http://INCOMETAX.GOV.IN होऊन जाईल. सध्या हे http://incometaxindiaefiling.gov.in आहे.

सुरू होणार अनलॉकची प्रोसेस:
दिल्ली आणि मध्य प्रदेशात 1 जूनपासून लॉकडाऊनपासून दिलासा मिळू शकतो. देशात कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. हे पाहता लॉकडाऊनपासून दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र जास्त रुग्ण असणाऱ्या शहरांमध्ये लॉकडाऊन कमी होण्याची शक्यता कमीच आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये 1 जूनपासून लागू होणार पॉझिटिव्ह पे सिस्टम:
बँक ऑफ बडोदामध्ये 1 जूनपासून चेकने पेमेंटची पध्दत बदणार आहे. फसवणूक टाळण्यासाठी बँकेच्या ग्राहकांसाठी पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन अनिवार्य असणार आहे. ही सिस्टम लागू करण्याचा हेतू चेकच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखणे हा आहे. ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेकच्या डिटेल्स तेव्हाच रिकन्फर्म कराव्या लागतील, जेव्हा ते 2 लाख रुपये किंवा यापेक्षा जास्तचे बँक चेक जारी करतील.

पॉझिटिव्ह पे प्रणालीअंतर्गत धनादेश जारी करणार्‍यास त्या धनादेशाशी संबंधित माहिती भरणा बँकेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने द्यावी लागेल. एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे ही माहिती दिली जाऊ शकते.

गॅस सिलिंडरच्या किंमती बदलतील:
राज्य सरकारच्या तेल कंपन्यांनी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती ठरवत असतात. किंमतींमध्ये वाढही होऊ शकते आणि दिलासाही मिळू शकतो. अशा वेळी जूनला सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदलही होऊ शकतो.

जास्त गूगल स्टोरेजसाठी द्यावे लागतील वेगळे पैसे:
गूग फोटोजमध्ये 1 जूननंतर अनलिमिटेड फोटोज अपलोड करता येणार नाही. गूगलनुसार 15GB चा स्पेस प्रत्येक जीमेल यूजर्सला दिला जाईल. या स्पेसमध्ये जीमलेच्या ईमेलचाही समावेश आहे आणि यासोबतच तुमच्या फोटोजचाही समावेश आहे. यामध्ये गूगल ड्राइव्हचाही समावेश आहे. जर 15GB पेक्षा जास्त स्पेस वापरायचा असेल तर यासाठी पैसे द्यावे लागतील. आतापर्यंत अनलिमिटेड स्टोरेज फ्री होते.

 

News English Summary: This is special news for those who file income tax returns. The new Income Tax website will be launched on June 7. Therefore, between June 1 and 6, taxpayers will not be able to use the old Income Tax Department website. The process of making changes to the website will continue during these six days. The method and experience of filing ITR will change completely with the advent of new website. The new site will have advanced features. This will make it easier to file an ITR.

News English Title: Rules to change from 1st June 2021 income tax efiling to new cheque payment news updates.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x