SBI ची ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प | पाहा काय झालंय नेमकं

मुंबई, १३ ऑक्टोबर : भारतीय स्टेट बँक (SBI)च्या ऑनलाइन बँकिंग सेवा अचानक ठप्प झाली आहे. बँकेने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, असं असलं तरीही एटीएम आणि पीओएस मशीनवर काहीही परिणाम झालेला नाही. देशातील सर्वात मोठ्या बँकेने याबाबत ट्विटरवरुन माहिती देताना सांगितलं की, ‘कनेक्टिव्हिटीमुळे आज आमच्या मुख्य ग्राहकांना (13.10.20) मुख्य बँकिंग प्रणाली उपलब्ध होण्यास विलंब झाला आहे. एटीएम आणि पीओएस मशीन वगळता सर्व चॅनेल प्रभावित आहेत.’
एसबीआयने ट्विट केले आहे की, ‘सध्या बँकेचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले असून फक्त एटीएम आणि पीओएस मशीन सुरू असल्याचे सांगितले आहे. तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू असून ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे. आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्याबरोबर राहण्याची विनंती करतो. लवकरच सामान्य सेवा पुन्हा सुरू होईल.’ एसबीआयच्या ग्लिचबाबत त्यांच्या अनेक ग्राहकांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. YONO अॅप यूजर्स देखील आपल्या खात्यात प्रवेश करु शकत नाही.
We request our customers to bear with us. Normal service will resume soon.#SBI #StateBankOfIndia #ImportantNotice #YONOSBI #OnlineSBI pic.twitter.com/dDFAgmGLQl
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 13, 2020
मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक व कर्मचार्यांच्या बाबतीत एसबीआय ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. ही देशातील सर्वात मोठे तारण कर्ज देणारा देखील बँक आहे. 30 जून, 2020 पर्यंत बँकेकडे ३४ लाख कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत आणि CASA प्रमाण 45% पेक्षा जास्त आहे आणि सुमारे 24 लाख कोटी रुपयांची आगाऊ रक्कम आहे.
एसबीआयकडे भारतातील 22,100 पेक्षा जास्त शाखांचे जाळे आहे ज्यामध्ये एटीएम / सीडीएम नेटवर्क 58,500 हून अधिक आहे आणि एकूण आउटलेट 62,200 हून अधिक आहेत. इंटरनेट बँकिंग सुविधा वापरणार्या ग्राहकांची संख्या सुमारे ७६ दशलक्ष आहे आणि मोबाइल बँकिंग सेवा १७ दशलक्षाहून अधिक लोक वापरतात.
एसबीआयची ऑनलाइन सेवा बंद झाल्याने ग्राहक कोणालाही मोबाइल अॅप किंवा मनी टान्सफरिंग अॅपद्वारे पैसे पाठवू शकत नाही. कोट्यवधी ग्राहक हे एसबीआय ऑनलाइन बँकिंगचा वापर करतात. त्यामुळे अचानकपणे ऑनलाइन सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
News English Summary: The online banking services of State Bank of India (SBI) have come to a standstill. The bank has given information about this in a tweet. However, ATM and POS machines are not affected by this. The online banking services of State Bank of India (SBI), the country’s largest public sector bank, have come to a standstill today. The bank has given information about this in a tweet. However, ATM and POS machines are not affected. The bank has written in the tweet that we request our customers to stay with us. Soon normal service will resume. The bank said that due to connectivity issue, customers are facing difficulty in using online banking services.
News English Title: SBI online banking services stalled ATM is working bank tweeted information News Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO