18 January 2025 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा
x

मुकेश अंबानी आणि रिलायन्सवर सेबीकडून 40 कोटींचा दंड

SEBI, imposed penalty, Reliance group, Mukesh Ambani

मुंबई, २ जानेवारी: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीवर सेबीने 40 कोटींचा दंड ठोठावला आहे. 2007मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने (आरपीएल) शेअर बाजारात कथित गडबड केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सेबीने आरपीएलवर 25 कोटी आणि मुकेश अंबानींसह इतर दोन कंपन्यांवर 15 कोटींचा दंड ठोठावला आहे. (SEBI imposed penalty on Reliance group and Mukesh Ambani)

आरपीएल आणि अंबानींशिवाय नवी मुंबई सेज प्रायव्हेट लिमिटेडवर 20 कोटी आणि मुंबई सेज लिमिटेडवर 10 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण 13 वर्षांपूर्वीचं म्हणजे 2007मधील आहे. आरपीएलच्या शेअरच्या रोख आणि फ्युचर खरेदीत मोठी गडबड झाली होती. कंपनीने मार्च 2007मध्ये आरपीएलमधील 4.1 टक्के भागीदारी विकण्याचा निर्णय घेतला होता.

सदर प्रकरणी सेबीचे अधिकारी बी. जे. दिलीप यांनी 95 पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनाच योग्य तो इशारा देण्याकरिता सेबीने दोषींना दंड भरण्याचा आदेश दिला. रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या नोव्हेंबर 2007 मध्ये झालेल्या शेअरच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सेबीने ही दंडात्मक कारवाई केली आहे. (SEBI has taken punitive action for fraudulent transactions in shares of Reliance Petroleum Limited in November 2007)

 

News English Summary: SEBI has slapped a fine of Rs 40 crore on renowned industrialist Mukesh Ambani and his Reliance Industries company. In 2007, Reliance Petroleum Limited (RPL) was accused of tampering with the stock market. SEBI has imposed a fine of Rs 25 crore on RPL and Rs 15 crore on two other companies, including Mukesh Ambani.

News English Title: SEBI imposed penalty on Reliance group and Mukesh Ambani news updates.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x