26 December 2024 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

देवाच्या दारी अन्याय! साई संस्थानकडून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची ४०% वेतन कपात

Shirdi Sai Sansthan, reduced the salaries, employees

शिर्डी, २ जून : देशातल्या श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आपल्याकडील कर्मचाऱ्यांची ४० टक्के पगार कपात केली आहे. अगोदरच तुटपूंज्या पगारावर जिव धोक्यात घालून काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफसह सुरक्षा कर्मचारी यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.

देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साई मंदीर प्रशासनाने साईसंस्थानच्या रूग्णालयात आणि इतर ठिकाणी सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ४० टक्के वेतन कपात केली आहे. मुळातच तुटपूंज्या पगारावर अनेक वर्षापासून परिसरातील सुशिक्षित तरुण-तरुणी आपली सेवा इथे देत आहेत. कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हे सर्वजण जिवापाड मेहनत करत आहेत मात्र, त्याचा मोबदला त्यांना दिला जात नाही.

अनेक वर्ष वादानंतर जानेवारी महिन्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के वेतनवाढ दिली गेली होती. त्यामुळे हजारो कर्मचारी सुखावले होते. मात्र, आता त्यांच्या आनंदावर विरझण पडले आहे. कोरोनाच्या या संकटकाळात साईबाबा संस्थानने कर्मचाऱ्यांची ४० टक्के वेतनवाढ कमी केल्याने हजारो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत त्यांचा पगार कमी करणे ठीक आहे मात्र, आम्ही दिवसरात्र करूनही आमची पगार कपात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तत्पूर्वी, श्रीमंत देवस्थान तिरूपती बालाजी मंदिरात काम करणाऱ्या १३०० कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना कायमची सुट्टी देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट ३० एप्रिलला संपले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने १ मे पासून कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यास मनाई केली होती. दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या १३०० कर्मचाऱ्यांना १ मेपासून कामावर येणास नकार दिला होता. मंदिर प्रशासनाने सांगितले की, लॉकडाऊनमुळे काम बंद आहे, त्यामुळे आता या १३०० कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट ३० एप्रिलपासून पुढे वाढवू शकत नाही.

तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून तीन गेस्ट हाऊस चालविण्यात येतात. या गेस्ट हाऊसची नावे विष्णु निवासम, श्रीनिवासम आणि माधवम अशी आहेत. नोकरीवरून काढण्यात आलेले हे सर्व १३०० कर्मचारी याच गेस्ट हाऊसमध्ये अनेक वर्षांपासून काम करत होते. लॉकडाऊनमुळे सर्व गेस्ट हाऊस बंद आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट वाढविण्यात आले नाही.

 

News English Summary: Sai Baba Sansthan, one of the richest temples in the country, has slashed the salaries of its employees by 40 per cent. Security personnel, including nursing staff who are already risking their lives on meager salaries, are in financial trouble.

News English Title: Shirdi Sai Sansthan has reduced the salaries of its employees News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x