22 December 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

हेच का ते अच्छे दिन | इंधन दरवाढीवरून मुंबईतील पेट्रोल पंपांवर शिवसेनेची पोस्टरबाजी

Shiv Sena activists, PM Narendra Modi, Posters on Petrol Pump

मुंबई, २२ फेब्रुवारी: पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जून २०१४मध्ये जेव्हा मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं, तेव्हा कच्च्या तेलाचे दर ९३ डॉलर प्रति बॅरल होते. तेव्हा पेट्रोलचे दर ७१ रुपये आणि डिझेल ५७ रुपये प्रति लिटर होते. सात वर्षांनंतर कच्चा तेलाचे दर ३० डॉलरने कमी होऊन प्रति बॅरल ६३ डॉलर इतके झाले आहेत. तरीही पेट्रोलने शतक ठोकले आहे.

त्याच विषयाला अनुसरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. शिवसेना युवा शाखा अर्थात युवा सेनेने मुंबईतील पेट्रोल पंपांवर पोस्टर लावून त्यावर हेच का अच्छे दिन असा प्रश्न विचारला. त्यावर 2015 मध्ये पेट्रोलचे दर कसे होते आणि आता किती आहेत याची तुलना करण्यात आली आहे.

मुंबईतील बांद्रा परिसरात लागलेल्या पोस्टरनुसार, 2015 मध्ये पेट्रोलची किंमत 64.60 रुपये प्रति लिटर होती. आता पेट्रोलचे भाव 96.62 रुपये झाले आहेत. मुंबईत डीझेलचे भाव त्यावेळी काय होते आणि आता काय आहेत हे देखील दाखवण्यात आले आहे.

वाढत्या इंधनाच्या किमतींवरून शिवसेनेने आजच्या मुखपत्रात सुद्धा केंद्रावर निशाणा साधला. सत्ताधारी पक्ष महागाईवर मूग गिळून गप्प आहे. राम मंदिरासाठी निधी वसूल करण्यापेक्षा इंधनाच्या किमती कमी करा, किमान रामभक्तांच्या घरी चुली तरी पेटतील असा घणाघात शिवसेनेने केला. दरम्यान, मुंबईत आज पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 97.00 रुपये तर डीझेलच्या किमती 88.06 रुपये आहेत.

 

News English Summary: Shiv Sena activists directly targeted Prime Minister Narendra Modi while waving posters. Shiv Sena Yuva Shakha i.e. Yuva Sena put up posters on petrol pumps in Mumbai and asked why this is a good day. It compares how petrol prices were in 2015 and how much they are now.

News English Title: Shiv Sena activists directly targeted PM Narendra Modi while waving posters on Petrol Pump news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x