5 November 2024 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

नरेंद्र + देवेंद्र = वसुली केंद्र | इंधन दरवाढीच्या निषेधात शिवसेनेची निदर्शनं

Shiv Sena party, Protest, Fuel prices

मुंबई, ०५ फेब्रुवारी: एकीकडे वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले. राज्यभर मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. शिवसेनेकडून जागोजागी निदर्शनं करण्यात आली. कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचे निर्माण आणि विकास करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर कृषी अधिभार लावण्याची घोषणा केली. आधीच पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याविरोधात आज मुंबईत शिवसेनेने केले. ‘केंद्र सरकार तुपाशी, ग्राहक मात्र उपाशी, नरेंद्र + देवेंद्र = वसुली केंद्र, अब कि बार पेट्रोल १०० पार’ अशा घोषणा दिल्यात.

शिवसेनेकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला गेला. मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे याभागात मोठ्या संख्येने सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भायखळा भागातील आंदोलनात महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीत बसून या आंदोलनात इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला.

 

News English Summary: On the one hand, the BJP has been aggressive against the Mahavikasaghadi government on the issue of electricity bills, while on the other hand, the Shiv Sena has staged agitation against the central government across the state against the fuel price hike. Shiv Sena was seen taking to the streets against the Modi government across the state. Shiv Sena staged demonstrations in various places. The Modi government was protested by a two-wheeler funeral procession and a bullock cart morcha.

News English Title: Shiv Sena party workers hold protest over fuel prices in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x