23 December 2024 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

लॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार | CMIE अहवाल

Lockdown, CMIE report, Unemployment, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर : कोविड-१९ला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मे आणि ऑगस्ट यादरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ६० लाख पांढरपेशे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इंजिनिअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्लेषक आणि शिक्षक यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

‘सीएमआयई’ने म्हटले की, सरकारने जूनमध्येच अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू केली असली तरी, सातत्याचे निर्बंध आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत अडथळे येत आहेत. रोजगाराच्या मार्गातही असेच अडथळे निर्माण झाले आहेत.

‘सीएमआयई’ने केलेल्या ‘कंझ्युमर पिरॅमिड हाउस होल्ड सर्व्हे’मध्ये म्हटले आहे की, २०१६ पासून पांढरपेशा रोजगारांत वाढ होत होती. जानेवारी ते एप्रिल २०१६ या काळातील लाटेत १२.५ दशलक्ष पांढरपेशे कर्मचारी भरले गेले होते. मे-ऑगस्ट २०१९ या काळात त्यांची संख्या सर्वोच्च पातळीवर १८.८ दशलक्ष होती. सप्टेंबर-डिसेंबर २०१९ या काळात १९.७ दशलक्षासह ती स्थिर होती. जानेवारी-एप्रिल २०२० या काळात ती घटून १८.१ दशलक्षावर आली. या काळात लॉकडाऊनचा अंशत: परिणाम दिसून आला.

मे-ऑगस्ट २०२० या काळात मात्र पांढरपेशा कर्मचाऱ्यांची संख्या घटून १२.२ दशलक्षांवर आली. २०१६ नंतरचा हा नीचांकी आकडा आहे. मागील चार वर्षांत पांढरपेशा रोजगार क्षेत्रात जी वाढ झाली होती, ती मे-ऑगस्ट २०२० या काळात लॉकडाऊनमुळे वाहून गेली.

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी ‘सीएमआयई’च्या वेबसाइटवर लिहिले की, मे-ऑगस्ट २०२० या काळात ५.९ दशलक्ष पांढरपेशा कर्मचाऱ्यांना आपले रोजगार गमवावे लागले. मे-ऑगस्ट २०१९च्या आकड्यांशी तुलना केल्यास बेरोजगारीचा हा आकडा ६.६ दशलक्षांवर जातो. पांढरपेशांचा रोजगार नीचांकी मे-ऑगस्ट २०२० या काळात मात्र पांढरपेशा कर्मचाºयांची संख्या घटून १२.२ दशलक्षांवर आली. २०१६ नंतरचा हा नीचांकी आकडा आहे. मागील चार वर्षांत पांढरपेशा रोजगार क्षेत्रात जी वाढ झाली होती, ती मे-ऑगस्ट २०२० या काळात लॉकडाऊनमुळे वाहून गेली.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले होते. यामध्ये महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली होती. त्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले की, सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असं म्हटलं होतं.

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही. जगभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मुद्द्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, केंद्र सरकार अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या समस्येविषयी फार काही बोलताना दिसत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते.

 

News English Summary: An estimated 6.6 million white collar professional jobs, including engineers, physicians, teachers, were lost between May and August, bringing their employment to the lowest level since 2016 and wiping out the gains made over the last four years while five million industrial workers were out of work during the period, the Centre for Monitoring Indian Economy (CMIE) said.

News English Title: Six million employees lost in lockdown CMIE report Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x