19 January 2025 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

झोपडी पाडल्यापासून SRA प्रकल्पातील घरे ५ वर्षांनी विकता येणार | लवकरच नियमात बदल

SRA project, Home sale, Demolition of huts, Jitendra Awhad

मुंबई, 13 मार्च: SRA प्रकल्पातील सदनिका ५ वर्षांनी विकण्याची मुभा देतानाच हा कालावधी झोपडी पाडल्यापासूनचा गृहीत धरावा, यासाठी लवकरच नियमात बदल करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सांगितले. म्हाडा व एसआरएच्या संयुक्त विद्यमाने कोळीवाडे वगळता मुंबईतील किनाऱ्यालगतच्या झोपडपट्टयांच्या विकासाबाबत दीड महिन्यात धोरण तयार करणार असल्याचे देखील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. (rules would be changed soon so that the period from demolition of huts should be taken into account while allowing the sale of flats in the SRA project after 5 years said minister Jitendra Awhad)

याबाबत ते प्रसार माध्यमांशी सविस्तर बोलताना म्हणाले, सध्या इमारत बांधल्यानंतर पाच वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. म्हणून झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. इमारत बांधल्यानंतरचा जो पाच वर्षांचा नियम आहे तो नियम बदलून त्याची झोपडी पडल्यानंतर त्याला ते घर पाच वर्षांनंतर विकता आले पाहिजे.

कोणतीही एसआरएची योजना ही 10- 15 वर्षांच्या अगोदर तयार होत नाही. त्यामुळे त्याला घर मिळायला 15 वर्षे लागतात आणि नंतर विकायला आणखी पाच वर्षे. यामुळे घर मालकाची अडचण होते. यावर तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. तसेच बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ या महिन्यात होणार असून तीन ते चार वर्षांत काम पूर्ण होईल असेही आव्हाड यांनी सांगितले.

 

News English Summary: Housing Minister Jitendra Awhad said on Friday that the rules would be changed soon so that the period from demolition of huts should be taken into account while allowing the sale of flats in the SRA project after 5 years. Jitendra Awhad also said that MHADA and SRA would jointly formulate a policy on the development of coastal slums in Mumbai except Koliwade in a month and a half.

News English Title: SRA project home will be eligible for sale after 5 years demolition of huts said Jitendra Awhad news updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x